अडणी – शंख ठेवण्याचे आसन | पूजा पाठ माहिती
शंख ठेवण्यासाठी जे आसन वापरले जाते त्याला अडणी असे म्हणतात.
शंख ठेवण्याचा आसन हा एक प्रकारे कासवाच्या रुपात असतो.
पूजेच्या ठिकाणी ( देवघरात ) आपण शंख ठेवतो…
त्याला कासवाच्या पाठीवर ठेवायची पध्दत आहे.
कासव (कुर्म ) हा विष्णु भगवानाचा साक्षात अवतार आहे. तसेच कासवाला
विष्णु भगवानाचे वरदान ही आहे. कासव हा सत्वगुणप्रधान आहे…
त्यामुळे त्याला स्वतःची कुंडलिनी जागृत करता येते.
विष्णु भगवानाच्या अर्शिवादाने कासव मंदिरात गाभाऱ्याच्या समोर
देवा कडे पाहात असतो.
भगवान विष्णुने समुद्रमंथनात कुर्म अवतार घेतला तसेच
विष्णु भगवानच्या हातात नेहमी शंख राहतोच.
विष्णु भगवानाचा आणि कासवाचा अगदी जवळचा संबंध आहे.

देवघरात असलेली अडणी ( कासवाची ) ही देवा कडे तोंड करुन ठेवावी.
कासवाचे तोंड हे देवाच्या पायाकडे पाहते असावे. तोंड वर असेल तर
कुंडलिनी जागृत असलेला कासव असतो.
मादी कासव ही आपल्या पिलांना दुध पाजत नाही. फक्त ती आपल्या
पिल्लांना वात्सल्य भावनेने पाहते आणि तिच्या पिल्लांचे पोट भरते.
याच प्रमाणे आपण देवळात गेल्यावर भगवंताने आपल्याकडे वात्सल्य
नजरेने पाहावे आणि आपल्या वर भगवंताची कृपा व्हावी…
एवढीच अपेक्षा असावी.
मागे गणपतीपुळे ला जातांना ही माहिती माझ्या वाचनात आली…
आणि मी एक अडणी विकत घेतली. मला ही माहिती तसेच अडणी ची
फोटो आपल्यासोबत शेयर करतांना आनंद होत आहे.
अडणी – शंख ठेवण्याचे आसन | सुंदर माहिती
[…] […]