अहंकार म्हणजे नक्की काय ? | Good Thoughts In Marathi | Quote

0
338
अहंकार-म्हणजे-नक्की-काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-vb-विजय-भगत
अहंकार-म्हणजे-नक्की-काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar

अहंकार म्हणजे नक्की काय ? | Good Thoughts In Marathi | Quote

एकदा एका कावळ्याने आपल्या पायात चांगला मोठा मासाचा तुकडा घेतला 
आणि उडायला लागला. उडता-उडता तो विचार करत होता की एखाद्या शांत
ठिकाणी थांबून मस्त या मासाचा आनंद घ्यावा.

एखादी शांत जागा शोधत असतांना त्याच्या लक्षात आले की, काही गिधाडे 
आपल्या मागे लागली आहेत. 
त्या गिधाडी पाहुन कावळा खूपच घाबरला. कावळ्याला वाटू लागले की, ही 
माझ्या मागे असलेली गिधाडे मला मारण्यासाठीच माझ्या मागे लागलेली 
आहेत. 

त्या गिधाडां पासून आपला जीव वाचविण्यासाठी सुटण्यासाठी आता कावळा 
खूप जोरात आणि खूप उंचीवरून उडायचा प्रयत्न करू लागला. पण… 
कावळ्याने त्याच्या पायात दाबून ठेवलेल्या मांसाच्या जड तुकड्यामुळे हे 
काही शक्य होईना. 

कावळ्याला चांगलाच दम भरला… मासाच्या तुकड्यामुळे त्याला काही जोरात 
आणि उंचीवर उडता येईना. ही सगळी गंमत एक गरुड बघत होता. शेवटी 
तो गरूड पक्षी उडत कावळ्याच्या जवळ आला आणि म्हणाला… 
का रे बाबा…! ही काय भानगड आहे…? तु एवढा का घाबरला आहे…? आणि 
एवढा का दमला आहे की… तू एवढ्या जोरात श्वास घेत आहे…?

तो कावळा म्हणालाहे गरूडा…! ही गिधाडे खूप वेळा पासुन माझ्या मागे 
लागली आहेत. ती माझ्या जिवावर टपली आहेत. या गिधाडी पासुन बचाव करण्यासाठी मी आणखीन उंचावरून उडायचा प्रयत्न करतो आहे.

कावळ्याचे हे बोलणे ऐकुन तो गरूड म्हणाला,  अरे ती गिधाडे तुझ्यामागे 
नाहीत, तर तुझ्या या पायात दाबलेल्या मांसाच्या तुकड्यासाठी तुझ्या मागे 
लागली आहेत. तो तुकडा जड असल्यामुळे तुला फारसे उंचावरून 
उडता पण येत नाही. फेकुन दे तो मांसाचा तुकडा आणि बघ काय होते ते…!

कावळ्याने गरुडाच्या सांगण्याप्रमाणे केले. त्याने तो मांसाचा तुकडा आपल्या
पायामधून सोडुन दिला. कावळ्याच्या मागे लागलेली सगळी गिधाडे त्या 
मांसाच्या तुकड्याकडे गेली. 
मांसाच्या तुकड्याचे कमी झाल्याने त्या कावळ्याला पण हलके वाटले
आणि त्याने आकाशात आणखीन उंच भरारी घेतली.
आपण सगळेजण कावळेच आहोत आणि असाच एक मांसाचा जड तुकडा 
आयुष्यभर आपल्या पायात पकडुन आपण जगत असतो. या मांसाच्या 
तुकड्याचे नाव आहे… अहंकार म्हणजेच मी पणा किंवा स्वतःविषयीच्या 
काही भ्रामक कल्पना.
प्रत्येकाला अहंकार हा असतोच. आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे 
अनेक जण भेटत असतात आणि आपण पण अगदी आनंदाने हरभ-याच्या  
झाडावर चढत असतो. मी एक खास व्यक्ती आहे…! मी खूप हुषार किंवा 
बुद्धीमान आहे…! मला सगळे काही कळते किंवा समजते…! 
माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे अशा प्रकारचे भ्रम अनेकांना झालेले असते. 

माझी अब्रू…. माझी प्रतिष्ठा… घराची अब्रू अशा नावाखाली अनेक जण या 
भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात. मग या साठी शत्रुत्व आले तरी 
चालते, माणसे तुटली तरी चालतात, नातेसंबंध संपुष्टात आले तरी त्याची त्यांना 
पर्वा नसते. त्यांना त्यांचा अहंकार नावाचा मांसाचा तुकडाच प्राणप्रिय असतो. 

मग कितीही गिधाडे मागे लागली तरी त्याची यांना पर्वा नसते. 
गिधाडे उंच उडुन जातात पण हे मात्र मागेच राहतात. पण ज्यांना 
अहंकार नावाचा मांसाचा तुकडा सोडणे जमते तेच उंच भरारी 
घेऊ शकतात.  
एकदा तरी आपला अहंकार बाजुला ठेऊन बघा. विसरून बघा. 
अहंकारा पासुन सुटका करून बघा…! बघा काय चमत्कार होतो ते…!

 

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-नाते
अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार

 

ज्या नात्यात अहंकार नसतो… 
तेच नाते शेवटपर्यंत टिकून राहते.
 
अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-vb-विजय-भगत

 

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार

 

फक्त अहंकारामुळे 
आपल्या आवडत्या व्यक्तीला
सोडण्यापेक्षा 
आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी 
आपला अहंकार सोडणे
कधीही चांगले.
 
अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-vb-विजय-भगत-wel-time-suvichar

 

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार

 

सर्व काही पालटून टाकते…! 
जेव्हा वेळ पालटते ना तेव्हा 
म्हणुन चांगल्या वेळात
अहंकार ठेवू नका 
आणि वाईट वेळात संयम बाळगा.
 
अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-vb-विजय-भगत-sharyat-marathi-suvichar

 

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार

 

शर्यत लावायचीच आहे तर… 
स्वतः सोबतच लावा, कारण… 
जर का जिंकलात तर…
स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल…
आणि जर का हरलात तर… 
स्वत:चाच अहंकार हराल…!
 

 

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-vb-विजय-भगत-relationship-suvichar-status
अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार
EGO
हा फक्त तीन अक्षरांचा शब्द आहे
पण तो… 
बारा अक्षराच्या शब्दाला तोडु शकतो…!
RELATIONSHIP
 

 

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-vb-विजय-भगत-ahankar-status-in-marathi
अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार

 

 

माणसे उगाच
अहंकार  बाळगतात
खरी सत्ता तर वेळेची आहे.
 

 

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-vb-विजय-भगत-swarth-mothepana-ahankar-bhagwant-suvichar
अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार

 

 

स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की… 
आनंद घेता येतो आणि देता येतो.
अपेक्षा, गैरसमज, अहंकार, 
आणि तुलना यामुळे एकमेकांतील 
नाती बिघडू शकतात… 
असे होऊ नये म्हणून… 
विसरा आणि माफ करा. 
हे तत्व केव्हाही चांगले.
 ग्रंथ समजल्याशिवाय 
संत समजणार नाही आणि 
संत समजल्याशिवाय 
भगवंत समजणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here