आई | छान विचार मराठी |
Good Thoughts Marathi | Suvichar
एकदा मुलगा आणि सून घरात आपल्या बेडरूम मध्ये बोलत राहतात…
समोर हॉल मध्ये बसलेल्या आईचे लक्ष त्यांच्या बोलण्याकडे जाते.
मुलगा – आपण दोघेही नौकरी करतो… आपल्या नौकरी मुळे आईकडे
लक्ष देता येणार नाही. आईचे वय होत आहें… या वयात तिला काही
आजार हि झाले आहेत… आता तिच्या आजारपणाची खबरदारी आणि
काळजी कोण करेल…?
मी आज ऑफिस मध्ये हाच विचार करीत होतो, शेवटी मी विचार केला कि,
आपण आईला वृद्धाश्रमात ठेवले तर…! ते लोक आईकडे लक्ष सुद्धा देतील
आणि तिची काळजीही घेतील.
सून -अहो नौकरी करून पैसे कमवण्यासाठी पूर्ण जन्म बाकी आहे,
पण… आईंचा आशीर्वाद जितका कमावला तितका कमीच आहे.
आज आईला पैश्यापेक्षाही आमच्या सोबतीची गरज आहे.
मी जास्तीत जास्त वेळ आई सोबत घालविण्याचा प्रयत्न करते.
मी जर का नौकरी नाही केली तरीही काहीच बिगडणार नाही.
मी थांबेन आईंजवळ…! जमलेच तर घरीच क्लासेस घेईन…
त्यामुळे मला आईं जवळही राहता येईल.
मला शेजाऱ्यांकडून कळले आहे कि… तुम्हाला लहानपणी वडील नसूनही
घरकाम करून आईने लहानाचे मोठे केले आहे. त्यावेळी तुमच्याकडे व्यवस्थित
लक्ष देणार कुणी नाहीत म्हणून तुम्हाला कधी आईने शेजाऱ्यां कडे सुद्धा ठेवला नाही…!
आणि आज हे तुम्ही असे बोलता…? तुम्ही किती ही म्हणा पण…..
आई नेहमी आपल्या जवळच राहील. अगदी शेवटपर्यंत…!
आई | छान विचार मराठी |
Good Thoughts Marathi | Suvichar
हॉल मध्ये बसलेली आई आपल्या सूनेचे उत्तर ऐकून खूप रडते आणि
सरळ देवघरात जाऊन देवा जवळ उभी राहते.
आई देवाऱ्यापुढे उभी राहून देवाचे खूप खूप आभार मानते…!
मला मुलगी नव्हती म्हणून खूप भांडली देवा मी तुझ्याशी पण…
हि भाग्यलक्ष्मी, सुन म्हणून दिल्याबद्दल तुझे आभार कसे मानू मी…?
प्रत्येक स्त्री हि प्रथम मुलगी, मैत्रीण, पत्नी, सुन, आई, सासू अशा
विविध नाते बंधनातुन जाते, म्हणजे प्रत्येक नात्यातुन तिला जावेच लागते.
परंतू स्त्रीयांनी प्रत्येक भुमिकेतुन जाताना जर सामंजस्य व स्वत:च स्त्रीयांचा
आदर केल्यास… या पुरुष प्रधान संस्कृतीच्या कचाट्यातुन नक्कीच
सुटका होऊन या समाजात स्त्री अबला नक्कीच राहणार नाही.
घरातील व नात्यातील तसेच मैत्रीण, शेजारी आणि समाजातील
इतर सर्वच महिलांचा आदर करा. कारण आपल्याला सुध्दा
या संसाराच्या चक्रव्यूव्हा मधुन जायचेच आहे.
आवडल तर शेअर करायला विसरु नका.
I appreciate you sharing this blog post. Thanks Again. Cool.