आनंदाला पुढे ढकलणारी माणसे | Good Thoughts In Marathi On Life | सुंदर विचार

0
726
आनंद-मराठी-सुविचार-happiness-marathi-suvichar-with-images-good-thoughts-in-marathi-on-life-आनंद

आनंदाला पुढे ढकलणारी माणसे 

Good Thoughts In Marathi On Life  

सुंदर विचार 

आनंद-मराठी-सुविचार-happiness-marathi-suvichar-with-images-good-thoughts-in-marathi-on-life-जीवन-खूप-सुंदर-होईल
आनंदाला पुढे ढकलणारी माणसे – Good Thoughts In Marathi On Life – सुंदर विचार
 
स्वभावात प्रेम…
चेहऱ्यावर हास्य…
आणि मनात आनंद जपा…
जीवन खूप सुंदर होईल.

 

दार बेल वाजली म्हणून दार उघडला तर समोर दारात गल्लीतील

लोकांच्या गाड्या धुवायचे काम करणारा धीरज उभा होता.
थोडे काम होते साहेब आपल्याकडे…
काही उसने पैसे हवेत का तुला…?
नाही साहेब… माझा मुलगा दहावी उतीर्ण झाला…!
अरे व्वा! अभिनंदन… ये धीरज आत ये…

घराच्या आत तो पहिल्यांदाच आला होता… या पूर्वी दोन चार वेळा
काही पैसे मागितले होते आणि वेळेवर परत हि केले होते…
पण ते बाहेरूनच…

[ एकदा मुलाच्या फी साठी कि पुस्तक साठी तरी पैशाची गरज असतांना
रात्री ला आला होता… मी जेवण करीत होतो… पाऊस सुरु होता…
मी त्याला दोन तीन वेळा आत बोलावले पण तो बाहेर पोर्चमध्येच
उभा राहिला… ]

मी त्याला बसायला सांगितल्यावर नको साहेब मी उभाच राहतो…
पण मी आग्रह केला तर बसला, मी पण त्याच्या समोरच बसलो…
तसाच त्याने माझ्या हातात पेढ्याचा एक बॉक्स ठेवला.

धीरज मुलाला किती मार्क मिळाले?
६५% अरे वा! खूप छान… 
[ फक्त त्याला बरे वाटावे म्हणून मी म्हटले. ]

अलीकडे नव्वद – पंच्यान्व टक्के ऐकायची इतकी सवय झाली आहे की… 
जर का ८०% ते ९०%-९५%  मार्क न मिळालेला व्यक्ती नापास 
झाल्यासारखाच त्याचा चेहरा असतो… 
परंतु धीरज खूप आनंदी दिसत होता.

साहेब मी खूप आनंदी आहे. माझ्या पूर्ण कुटुंबातील इतका शिकलेला 
पहिला माझा मुलगाच…!
ओ हो…! म्हणून पेढे वाटत आहे का…! छान…

कदाचित धीरज ला माझे बोलणे मस्करी करण्यासारखे वाटले असेल…
तो थोडा हसला आणि म्हणाला
साहेब… जर मला परवडले असते ना तर दरवर्षी मी पेढे वाटले असते.
माझा मुलगा खूप काही फार हुशार नाही हे मला माहित आहे साहेब…
परंतु… आजवर तो एकही वर्ष नापास झाला नाही…! आणि दर वर्षी
माझ्या मुलाचे दोन दोनतीन तीन टक्के वाढलेच आहेत…
हि आनंदाची गोष्ट नाही आहे का साहेब…?

माझी परिस्थिती तर तुम्हाला माहित आहे साहेब… एवढ्या वाईट
परिस्थिती मध्ये अभ्यास करून एवढे टक्के मिळवले साहेब…
तो साधा पास हि झाला असता तरी मी पेढे वाटलेच असते साहेब…
मी अगदी शांत होऊन विचारातच पडलो…

मला गप्पझाल्याचे पाहून धीरज म्हणाला…
साहेब माफ करा… बोलण्यात काही चूक झाली असेल तर…
माझ्या वडिलाची शिकवण…. नेहमी म्हणत असे…
धीरज, आनंद हा एकट्याने खाऊ नये… तो सगळ्यांना वाटावे…
हे फक्त पेढे नाही आहेत साहेब… हा माझा आनंद आहे…!

मन एकदम भरून आले... मी उठून आत गेलो. एका रंगीत गिफ्ट
पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.
आतूनच आवाज देवून विचारले… मुलाचे नाव काय आहे धीरज…?
साहेब अजय नाव आहे माझ्या मुलाचे… धीरज म्हणाला…
प्रिय अजय,  हार्दिक अभिनंदन!
तु नेहमी आनंदात रहा – अगदी तुझ्या बाबांसारखा! 
असे मी त्या बक्षीस पाकिटावर लिहिले.

धीरज हे घ्या…
हे कशाला साहेबमाझ्याशी तुम्ही दोन मिनिटेबोललात…
यातच सगळेले…
हे अजयसाठी आहे! तो त्याच्या आवडीची पुस्तके घेईल यातुन.
धीरज काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.

चहा वगैरे घेणार का?
नाही साहेब… आता आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर आपण
काय लिहिले आहे ते जरा सांगाल का…?
मला वाचता येत नाही म्हणून…
मी हसत म्हणालो… आपण घरी जा आणि हेपाकीट अजयकडे द्या.
तो वाचून दाखवेल तुम्हाला! 

धीरज माझे आभार मानत निघालाखरा…. पण त्याचा आनंदी चेहरा
माझ्या डोळ्यासमोरून जातनव्हता.
खुप दिवसांनंतर मी एका, आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.
आता अशी माणसे खूपदुर्मिळ झाली आहेत. जर का थोडेसे कुणाशी 
बोलायला लागलो तर ते आपल्या तक्रारींचा पाढासुरु करतात.

नव्वद पंच्याण्णव टक्के मिळवून सुद्धा लहानसा तोंडकरून बसलेले
मुलांचे पालक आठवले.
हव्या त्या कॉलेजात आपल्या मुलाला/मुलीला प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी
आपला आनंद पुढे ढकलायचे म्हणे...

 आपण त्यांना हसू नये, कारण आपण सगळेच असे झालेले आहोत…
आपला आनंद पुढे ढकलणारे….!

आज माझ्याकडे वेळ नाही आहे… आज माझ्याकडे पैसे नाही आहेत…
स्पर्धेत आपला टिकाव कसा लागेल…. आज खूप पाऊस पडत आहे…
आज माझा मूड नाही आहे…! आनंदाला पुढे ढकलायच्या या सगळ्या
गोष्टी आहेत हेआधी मान्य करू या.

काही गोष्टी करून तर आपल्यालाच आनंद मिळणार आहे
तरी पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय!
हे थोडे विचित्रच नाही का…?

कितीसा वेळ लागतोमोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला..?

किती पैसे लागतात…. सूर्योदय आणि सूर्यास्त बघायला…?
 
आंघोळ करतांना गाणेम्हणता…. कोण तरी येणार आहे,
तुमच्याशी स्पर्धा करायला?

पाऊस पडत आहे…अगदी सोपेआहे, मस्त चिंब भिजायला जा!

अगदी काहीच न करता,गादीत लोळत राहायला
तुम्हाला मूड लागतो का…?

जेव्हा माणूस जन्म घेतो तेव्हात्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
रे तर… त्याच्याएका हाताच्या बंद मुठीत आनंद आणि दुस-या
हाताच्या बंद मुठीत समाधान सामावलेले असते.

माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर आनंद आणि समाधान
कुठे कुठे सांडत जाते…

आता तर आनंदी होण्यासाठी कुणावर तरीकशावर तरी….
अवलंबून राहावेलागते...

कुणाच्या येण्यावर…. कुणाच्या जाण्यावर... कुणाच्या असण्यावर….
कुणाच्या नसण्यावर. काहीतरी मिळाल्यावर… कोणीतरी गमावल्यावर..
कुणाच्या बोलण्यावर  कुणाच्या न बोलण्यावर.

रे तर… आपल्या आतमध्ये आनंदाचा कधीही नाआटणारा झरा वाहत 
आहे… कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावे…!
इतके असून सुद्धा आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत…! 
पाण्याच्या टँकरची वाट बघत!
जोपर्यंत हे वाट बघणेआहे तोपर्यंत ही तहान भागणेअशक्य आहे…!
इतरांशी तुलना करत आणखी पैसे आणखी कपडे आणखी मोठेघर आणखी वरची जागा… आणखी टक्के...!
या आणखी च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती
लांब आलो आहो आपण!

जीवन खूप सुंदर आहे.
 
आनंद-मराठी-सुविचार-happiness-marathi-suvichar-with-images-good-thoughts-in-marathi-on-life-आनंद
आनंदाला पुढे ढकलणारी माणसे – Good Thoughts In Marathi On Life – सुंदर विचार

 

 

ज्यांच्याशी बोलल्याने
तुम्हाला आनंद होतो…
त्याच्याशी तर बोलाच,
पण… ज्याला तुमच्याशी बोलण्याने
आनंद मिळतो
त्यांच्याशी अधिक बोला.

आनंद-मराठी-सुविचार-happiness-marathi-suvichar-with-images-good-thoughts-in-marathi-on-life-खरा-आनंद
आनंदाला पुढे ढकलणारी माणसे – Good Thoughts In Marathi On Life – सुंदर विचार

 

खरा आनंद दुसऱ्यांना
देण्यात असतो…
घेण्यात किंवा
मागण्यात नसतो.

 

आनंद-मराठी-सुविचार-happiness-marathi-suvichar-with-images-good-thoughts-in-marathi-on-life-समाधान

आनंदाला पुढे ढकलणारी माणसे – Good Thoughts In Marathi On Life – सुंदर विचार

 

जीवनात छोट्या छोट्या गोष्टीत 
समाधान मानून हसायला शिका… 
कारण कुणालाही माहीत नाही की… 
मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधानाने
हसु टिकवता येईल का…!

 

आनंद-मराठी-सुविचार-happiness-marathi-suvichar-with-images-good-thoughts-in-marathi-on-life-आनंद-घ्या -आनंदित-करतो

आनंदाला पुढे ढकलणारी माणसे – Good Thoughts In Marathi On Life – सुंदर विचार

 

 

आनंदा पेक्षाही मोठा

असा एक आनंद आहे.

तो त्यालाच मिळतो…

जो स्वतःला विसरून
इतरांना आनंदित करतो.
 

 

आनंद-मराठी-सुविचार-happiness-marathi-suvichar-with-images-good-thoughts-in-marathi-on-life-आनंद-घ्या

आनंदाला पुढे ढकलणारी माणसे – Good Thoughts In Marathi On Life – सुंदर विचार

 

 

आपल्या कामात
आनंद निर्माण केला की 
त्याचे ओझे वाटत नाही…

आनंदाला पुढे ढकलणारी माणसे – Good Thoughts In Marathi On Life – सुंदर विचार

 

 

आनंद शोधू नका, आनंद निर्माण करा…
कारण आनंद निर्मितीवर
जीएसटी 0% आहे.
स्वत:चा शोध स्वतः मध्येच घ्या…
बाकी सगळे तरgoogle-logo-VB-Good-Thoughts-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-सुविचार-images-happiness-आनंदवर आहेच…!

आनंद-मराठी-सुविचार-happiness-marathi-suvichar-with-images-good-thoughts-in-marathi-on-life-फक्त-आनंद-शोधा
आनंदाला पुढे ढकलणारी माणसे – Good Thoughts In Marathi On Life – सुंदर विचार

 

फक्त आनंद शोधा…. 

गरजा तर
जीवनभर संपणार नाहीत.
आनंद-मराठी-सुविचार-happiness-marathi-suvichar-with-images-good-thoughts-in-marathi-on-life-आनंद-घ्या
आनंदाला पुढे ढकलणारी माणसे – Good Thoughts In Marathi On Life – सुंदर विचार

 

 

नसलेल्या गोष्टींपेक्षा

असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या…
कारण पूर्ण चंद्रापेक्षा 
अर्धचंद्र हा अधिक सुंदर दिसतो.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here