आनंद – एकदा विचार करून बघा – छान विचार – Sunder Vichar Marathi
स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की…
आनंद घेता ही येतो आणि
देता ही येतो.
जर का आपण कुणाला आवडत असलो तर ही आपल्यासाठी
एक सुखद भावना असते. परंतु जर का आपण कुणालाही आवडत नाही.
तर या सारखा दुसरा आनंद नाही…! नक्की तुम्हाला विचित्र वाटत असेल…
परंतु तुम्ही चांगल्या प्रकारे विचार केला तर ही गोष्ट समजेल.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या कामाचे नेहमी कौतुकच व्हावे असे वाटत असते.
आपण साधासा एक शर्ट जरी घेत आहो तर, आपण तो शर्ट वापरला तर
दुसऱ्यांना कसा वाटेल याचाच विचार करत असतो.
सांगायचे म्हणजे आपण पूर्ण आयुष्यभर
लोकांकडून प्रमाणपत्र जमा करीत असतो.
आपण आपल्या आनंदासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतो.
समजा ज्यावेळी तुम्ही लोकांना आवडत नाहीत…! किंवा लोक तुम्हाला
स्वीकारत नाहीत त्यावेळी तुम्ही स्वतःच्या आत पहायला शिकता.
हे असे स्वतःच्या आत पाहणे म्हणजेच खरा आनंद. आणि अध्यात्म हि
हेच सांगते…!
यानंतरच आपल्याला कळते की आनंद हा आपल्या शरीराच्या पलीकडे असतो.
जेव्हा आपण आपल्या मधील मी ला सहजपणे स्वीकारतो तेव्हा आपोआपच
आपण या जगालाही सहजपणे स्वीकारतो… बस…..
या अवस्थेत आल्यावर आपले बहुतेक दुख नाहीसे होतात…!
सतत चांगले दिसण्याचा… चांगले वागण्याचा… आपला मन असतो.
परंतु जर का प्रत्येक्षात आपण तसे नसलो तर…?
एखाद्या वेळी तुम्ही खोटे खोटच हसून बघा….
तुम्हाला हसण्यातही दुख वाटणार…
कारण ते नैसर्गिक नसते…! बनावटी हास्य असते…!
जेव्हा आपण आपल्याच आतमध्ये पाहतो तेव्हा खरे तर आपल्याला
आपलेच दर्शन घडते. जसे आपण आरशा समोर उभे असल्यास
आपल्याला तसे आपणच दिसतो.
इतर वेळी आपण इतरांच्या नजरेने स्वतःकडे पाहत असतो.
स्वतःची स्वतःला ओळख पटणे म्हणजेच जीवन कळणे नाही का…?
बघा पटतंय का….!
आमचे पुण्य – sunder Vichar – आंतरिक आनंद
एक विशेष ट्रेन भाविक यात्रेकरूंना घेवून तिर्थयात्रेला निघाली. जवळपास एका
तासानंतर सगळे भाविक एकमेकांसी बोलू लागले, विशेष म्हणजे सगळेच भाविक
प्रवाशी वयाने पन्नास – पंचावन्न च्या वरच होते.
बोलता – बोलता सहजच विषय पुण्यसंचयाचा निघाला.
सगळे आपापले जीवनातल्या घटना सांगत…. आयुष्यात आपण
काय पुण्याचे काम केले ते सांगत होते.
खालील सीटवर खिडकी जवळ अमोरा समोर दोन गृहस्थ बसले होते
आणि खिडकीतून बाहेर बघत होते…
त्यामधून एक गृहस्थ, जे चांगलेच महाग कपडे घातलेले होते….
रुबाबदार आवाजात आणि खिडकी बाहेरून दिसत असणाऱ्या
पर्वतांकडे बोट दाखवत म्हणाले…
हे पर्वत दिसत आहेत तुम्हाला…? माझे पुण्य या पर्वता एवढे आहे.
मी गावचा मोठा पाटील आणि आजपर्यंत माझ्या वाड्यावरून कुणीही
रिकाम्या हाताने परत गेलेला नाही आहे. पूर्ण गाव मला दानवीर म्हणून
ओळखतो. दान करणे हेच माझ्या कुटुंबाची ओळख आहे.
समोरील सीटवर बसलेले आणि साधे कपडे घातलेले गृहस्थ शांतच होते.
पाटलाने त्यांना विचारले…. तुम्ही काय करता…?
मी शिक्षक होतो. मागील महिन्यात सेवानिवृत्त झालो आहे…
शिक्षक… पाटलांच्या शब्दात टिंगल उडविण्याचा भाव होता…
पाटील म्हणाले, शिक्षक… म्हणजे सहा तास काम करायचे आणि महिन्याला
पगार मोजून घ्यायचा. तुम्हाला कुठे दानधर्म करायला जमणार…?
खरे आहे ना…!
ते शिक्षक हसत म्हणाले… हो पाटील साहेब खरे आहे…
मस्त गप्पा रमल्या होत्या… ट्रेन हि भर वेगात धावत असून ट्रेन ने बराच अंतर
पार केलेला होता.
अचानक ट्रेन थांबली. गार्ड ला विचारपूस केली असता कळले की…
समोर १५ किलोमीटर अंतरावर लोकांनी मोठे गोंधळ उचललेले आहे…
रेल्वेचे रूळ उखडण्याचाही प्रयत्न झाला आहे… आज तरी यासमोर ट्रेन जाणार
नाही हे निश्चित आहे.
गार्ड ने दिलेली माहिती एकूण सगळे चिंतीत झाले, कारण ट्रेन ज्या स्टेशन मध्ये
थांबली होती, त्या स्टेशन च्या जवळील गावात धर्मशाळा, हॉटेल, लॉज अशी
कोणतीही व्यवस्था नव्हतीच. आता राहायचे तरी कुठे…?
त्या स्टेशन चे स्टेशनमास्तर खूप चांगले होते… त्यांनी प्रतीक्षालय, गावातील त्यांच्या
ओळखीच्या घरी… अशा जागी यात्रेकरूची सोय करून दिली.
यात्रेकरूंची व्यवस्था करत असतांना स्टेशनमास्तरांचे लक्ष शिक्षकांवर जातो आणि
बघताच त्यांच्या पायावरच कोसळतो…
सर, मला ओळखले…? मी कृणाल देशमुख वडील वारल्यानंतर शिक्षण सोडण्याची वेळ
आली होती. तुम्ही दहावीची परीक्षा फी भरली म्हणून पुढे शिकलो. स्टेशनमास्तर झालो.
शिक्षकाचे डोळे भरून आले. आपल्या सरांची बॅग हातात घेऊन कृणाल त्यांना आपल्या
घरी घेऊन जात होता. त्यांनी कृणालला थांबवले… एका मिनिटात आलोच…!
अस्वस्थपणे उभ्या असलेल्या जमीनदाराला ते म्हणाले…
पाटील साहेब… माझे पुण्य पर्वताच्या एवढे निश्चितच नाही.
मी दानधर्मही केला नाही.
मी जे केले त्याला कर्तव्य म्हणतात. ज्या कामासाठी पगार घेतला.
ते काम पूर्ण निष्ठेने केले. या कृणाल सारखे शिष्य त्या कर्तव्यनिष्ठेची फळे आहेत.
हे विद्यार्थी असे पायावर वाकले ना…! की मग तिर्थयात्रेचे पुण्य आमच्या
खात्यावर जमा होत असते. आता माझ्यासोबत येता की थांबताय…?
जमीनदार खालमानेने त्यांच्यामागून निघाला..
योगः कर्मसु कौशल्यम्…..