आपली माणसे – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life

2
1422
आपली माणसे - मराठी सुविचार - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi
आपली माणसे - मराठी सुविचार - सुंदर विचार - Good Thoughts In Marathi

आपली माणसे – सुंदर विचार
Good Thoughts In Marathi On Life

नमस्कार मित्रांनो…
इतरांसाठी काहीही करतेवेळी आपल्याला सुद्धा जमेल इतकेच करावे..!

खुपदा आपण कसलाही स्वार्थ नसतांनाही खूप जणांसाठी खूप काही
करत असतो… झटत असतो…. प्रत्येक वेळी आपण आपलीच जबाबदारी
म्हणून, कर्तव्य म्हणून… पुढे पुढे करतो.. कसलाही स्वार्थ नसतांना…
पण मत भिन्नता तर दोन्ही बाजूला वेगवेगळ्या असतातच.

आपण ज्याच्या करिता करतो त्याला वाटतेही आमच्यासाठी केले…
तर त्यात काय…? ते त्याचे कर्तव्यच आहे…?

करणाऱ्याचा उद्देश चांगला असतो… आपल्या प्रयत्नांनी कुणाचे तरी
चांगले व्हावे… हा निर्मळ उद्देश असतो… परंतु गैरसमज हा खूप मोठा
शत्रू असतो. तो या निर्मळ उद्देशालाच धोका निर्माण करतो…

ज्याला समजून घ्यायचे असते… तो अगदी समजूतदारपणाने ह्या गोष्टींना
हाताळतो… पण ज्याला समजून घायचेच नसते…. तो शब्दांचे बाण चालवितो…
शब्दांनी जखमी करतो… नात्यांची खरी खीळ तर इथेच आहे…

आपली माणसे – मराठी सुविचार – सुंदर विचार
 Good Thoughts In Marathi

माझे माझे करता करता आपण आपल्यांना खूप दुखावतो…
खूप घालून – पाडून बोलतो… याचे परिणाम फक्त वाईटच होतात…
नाते दुरावले जातात… आपुलकीच्या भावना संपत जातात….
नात्यात उरलेली असते ती फक्त निराशा….

सध्या तर नाते हे आर्थिक दृष्टीतच बांधलेली दिसतात…
जसे की पैसा म्हणजेच सर्वस्व… त्याने त्या कार्यक्रमात
आहेर दिला नाही म्हणून राग…

रस्त्याने जात असतांना ओळखीचे दिसल्यावर बोलले नाही तर राग…

एखाद्या कार्यक्रमात मागे उभे राहिले नाही म्हणून राग…

निस्वार्थ प्रेम…जिवलगा… चिंता… परिवारातील प्रेम हे सगळेच
विखरत चाललेले आहे…!

एकमेकांना टाळ्या देत हास्याचे फवारे उडविणे लुप्त होत आहेत…
मामा आणि मामाच्या गावाला जाने… भाऊ बहिणींचे खोटे – नाटे भांडण…

लग्न कार्यक्रमात एकत्रित होऊन आनंद अनुभवणे… भावंडांच्या मागे उभे राहणे…
नातेवाईकांमध्ये मनसोक्त फिरणे हेही काही वर्षात कमी – कमी होत जाईल असे
वाटत आहे… अर्थात काही अपवाद आहेत ही….!

खरे पहिले तर आपण किती दिवस जगणार याची काहीच माहिती नाही..
सोबतीला आपण काय घेऊन जाणार हे ही काहीच माहीत नाही…
जिवलग अशी खूप कमी माणसे असतात जी आपली चिंता करतात..
आपला जीव ओतून आपल्याला घडवितात…

आपली माणसे – मराठी सुविचार – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi

वेळ आल्यावर आपल्या चांगल्यासाठी आपल्यावर रागावतात…
परंतु लगेच प्रेम हि करतात…. त्यांना कधीच विसरू नये..
कुणाला व्यक्त होता येते… तर कुणाला व्यक्त होता येत नाही…
ही समजूत अंगी यायलाच हवी…! जगण्यासाठी खूप कमी दिवस आहेत…
कुरकुर तर त्यानंतर ही सुरूच असणार…

दुसऱ्याला दुःखी करून आपण सुखी व्हावे ही भावना किती वाईट आहे…
जीवन जगणे म्हणजे केवळ धावण्याची स्पर्धा नाही… जगतांना जो
अनुभव मिळेल… जी उपेक्षा मिळेल… जो प्रेम मिळेल… जो आदर मिळेल…
त्याची अनुभूती घ्यावी…

जीवनात मुक्तपणाने जगावे.. आयुष्यात सगळेच रंग हवे आहेत… निराशेतही
आशा आहेच की… त्या ऊर्जेची वाट पहायची..

कोणा वाचून कोणाचे काहीच अडत नसतेच हे जरी खरे असले तरीही
आनंद मात्र आपल्या माणसांशिवाय घेताच येत नाही…!

ह्या आनंदासाठीच सण… समारंभ.. गणेशोत्सव.. नवरात्र… दसरा… दिवाळी..
संक्रांति… होळी… असतात…!

कौतुक करणारे… पाठीवर हात ठेवणारे… कुणीतरी हवेच ना…!
आपल्या दुःखाच्या वेळी डोळ्यात अश्रू येणारी…
आपले विजय डोळे भरून पाहणारी
माणसे ही पाहिजेतच आजूबाजूला… !

नाहीतर विजय… पैसा खूप मिळवला परंतु…
माणसेच नसतील प्रेम करणारी…
तर …. त्या सारखा कंगाल तोच…!
खरे आहे ना…?

मराठी सुविचार – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi

स्वतःवर विश्वास ठेवा….!
एखाद्या अडचणीत देवाने
तुमचे लगेच ऐकले की…
तुमची श्रद्धा वाढते.
उशिरा ऐकले की….
तुमची सहनशक्ती वाढते.
पण ऐकलेच नाही तर
देवाला ठाऊक आहे….
ही तुमची अडचण
तुम्हीच सोडवू शकता….!

गरजा.. इच्छा… आणि अपेक्षा
यांचे वादळ दारातून येताच…
प्रेम… माया… आणि आपुलकी
खिडकी मधून बाहेर जातात.
राहतात फक्त आणि फक्त
चार भिंती. एका या खोट्या आशेत
की एक दिवस नक्की सर्व ठीक होईल.

वेळेला वेळ देणारा माणूस
वेळेवर भेटला की
चांगली वेळ यायला
वेळ लागत नाही. त्यासाठी
कितीही वेळ लागला तरी चालेल.

आयुष्यात असे नाते बनवा की….
त्यांना खोटे बोलण्याची
गरज पडणार नाही
आणि तुम्हाला
खरे जाणुन घेण्याची….

आठवणी खरचं खूप खास असतात
नाही का…. कधी आपण
दुःखातल्या क्षणांना आठवून हसतो
तर कधी सुखातल्या क्षणांना आठवुन रडतो….

मराठी सुविचार – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi

घरच्या लक्ष्मीला खुश ठेवा
मंदीरातील लक्ष्मी आपोआप
खुश होईल

घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे ज्ञान
देण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे दान
बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे सत्य
करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर
ती आहे दया
सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे अहंकार…

सुगंध देणारे आयुष्य संपले की
मागे फक्त राख उरते
ज्या राखेला परत कधीच
सुगंध येत नाही.

चुकीच्या लोकांच्या नात्यात
अडकून उदास राहण्यापेक्षा
अनोळखी लोकांत राहून
आनंदी राहिलेल कधीही चांगले.
मानवी नात्यांत
जर सवात मोठा शत्रू
कुणी असेल तर तो म्हणजे
गैरसमज

परिस्थिती नावाची शाळा
जीवनात
सगळे काही शिकविते….
अगदी जगायला सुद्धा.

जर बघण्याची
नजर प्रामाणिक असेल…
तर नजरेला दिसणारी
प्रत्येक गोष्ट
सुंदर दिसते.

आळसाला
तुम्ही आजचा दिवस
बहाल केला की…
तुमच्या उद्याचा दिवस
त्याने चोरलाच म्हणून समजा.

कोणी कोणाचे नसेल म्हणून….
जगणे काही थांबत नाही.
आणि कोणी कोणाचे असेल
म्हणून मरणे काही लांबत नाही…

मराठी सुविचार – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi

आपली माणसे – मराठी सुविचार – सुंदर विचार

इतरांवर इतका विश्वास करा की…
तुमची फसवणूक करतांना..
ते स्वतःला दोषी समजतील..
आणि इतरांवर इतके प्रेम करा की…
त्यांना तुम्हाला गमवायची नेहमीच
भीती राहिल…!

आपली-माणसे-मराठी-सुविचार-सुंदर-विचार-vb
आपली-माणसे-मराठी-सुविचार-सुंदर-विचार

चांगली माणसे आणि जीवाला जीव देणारे
मित्र मिळणे म्हणजेच दुसरें – तिसरे काही नसून…
आपल्याला जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे.

आपली-माणसे-मराठी-सुविचार-सुंदर-विचार-vb
आपली-माणसे-मराठी-सुविचार-सुंदर-विचार

काही शब्द असे असताना की…
ते नेहमीच ऐकावेसे वाटते.
काही नाते एवढे गोड असतात की…
ते कधीच संपु नये असेच वाटते…
आणि काही माणसे अशी असतात की…
ते नेहमीच आपलेच असावे असे वाटते.

आपली-माणसे-मराठी-सुविचार-सुंदर-विचार-vb
आपली-माणसे-मराठी-सुविचार-सुंदर-विचार

आपली माणसे – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here