“घालीन लोटांगण” या प्रार्थनेचे
रहस्य तुम्हाला माहित आहे का….?
कोणतीही आरती झाल्यानंतर
एका लयीत व धावत्या चालीत
ही प्रार्थना म्हटली जाते.
घालीन लोटांगण प्रार्थनेचे महत्त्व
मराठी ज्ञान – god prayer
अतिशय श्रवणीय व नादमधुर
असल्याने खूपच लोकप्रिय आहे.
सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात
तल्लीन होऊन जातात.
आज आपण या प्रार्थने मधील
वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ
समजावून घेऊ. ही प्रार्थना
चार कडव्याची आहे व पाचवे
कडवे हा एक मंत्र आहे.
वैशिष्ट्ये :-
१. प्रार्थनेतील चारही
कडव्यांचे रचयिता
वेगवेगळे आहेत.
२. ही चारही कडवी
वेगवेगळ्या कालखंडात
लिहिली गेली आहेत.
३. पहिले कडवे मराठीत
असून उरलेली कडवी
संस्कृत भाषेत आहेत.
४. बऱ्याच जणांना असे
वाटते की ही गणपतीची
प्रार्थना आहे. पण ही सर्व
देवांच्या आरती नंतर
म्हटली जाते.
५. यातील एकही कडवे
गणपतीला उद्देशून नाही.
६. वेगवेगळ्या कवींची व
वेगवेगळ्या कालखंडातील
कडवी एकत्र करून ही
प्रार्थना बनवली गेली आहे.
आता आपण प्रत्येक कडवे
अर्थासह पाहूया.
घालीन लोटांगण प्रार्थनेचे महत्त्व
मराठी ज्ञान – god prayer
१. घालीन लोटांगण
वंदीन चरण l डोळ्यांनी
पाहिन रूप तुझे |
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |
भावे ओवाळीन म्हणे नामा |
वरील कडवे संत नामदेवांनी
तेराव्या शतकात लिहिलेली
एक सुंदर रचना आहे
अर्थ :-
विठ्ठलाला उद्देशुन
संत नामदेव म्हणतात…
तुला मी लोटांगण घालीन
व तुझ्या चरणांना वंदन
करीन. माझ्या डोळ्यांनी
तुझे रूप पाहिन एवढेच
नाही तर तुला मी प्रेमाने
आलिंगन देऊन अत्यंत
मनोभावे तुला ओवाळीन.
२. त्वमेव माता च पिता त्वमेव |
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |
त्वमेव सर्व मम देव देव |
हे कडवे आद्य शंकराचार्यांनी
गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे.
ते संस्कृत मध्ये आहे. हे
आठव्या शतकात लिहिले
गेले आहे.
अर्थ :-
तूच माझी माता व पिता
आहेस. तूच माझा बंधू
आणि मित्र आहेस.
तूच माझे ज्ञान आणि
धन आहेस. तूच माझे
सर्वस्व आहेस.
३. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |
बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात |
करोमि यद्येत सकल परस्मै |
नारायणापि समर्पयामि ||
हे कडवे श्रीमद भागवत
पुराणातील आहे. ते व्यासांनी
लिहिलेले आहे.
अर्थ :-
श्रीकृष्णाला उद्देशून…
हे नारायणा… माझी काया
व माझे बोलणे… माझे मन…
माझी इंद्रिये… माझी बुद्धी…
माझा स्वभाव… आणि माझी
प्रकृती यांनी जे काही कर्म
मी करीत आहे ते सर्व मी
तुला समर्पित करीत आहे.
४. अच्युतम केशवम रामनारायणं |
कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |
श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |
जानकी नायक रामचंद्र भजे ||
वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या
अच्युताकष्ठम् मधील आहे.
म्हणजेच आठव्या शतकातील आहे.
घालीन लोटांगण प्रार्थनेचे महत्त्व
मराठी ज्ञान – god prayer
अर्थ…
मी भजतो त्या अच्युताला…
त्या केशवाला….
त्या रामनारायणाला….
त्या श्रीधराला…. त्या माधवाला…
त्या गोपिकावल्लभाला…
त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो
त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.
हरे राम हरे राम |
राम राम हरे हरे |
हरे कृष्ण हरे कृष्ण |
कृष्ण कृष्ण हरे हरे |
हा सोळा अक्षरी मंत्र
‘कलीसंतरणं’ या
उपनिषदातील आहे.
( ख्रिस्तपूर्व काळातील
असावे ) कलियुगाचा
धर्म हे हरिनाम संकीर्तन
आहे. याशिवाय कलियुगात
कोणताच उपाय नाही.
हा मंत्र श्री रामकृष्णाला
समर्पित आहे.
अशी ही वेगवेगळ्या कवींची
वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण
असलेली प्रार्थना अत्यंत
श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य
व चाल अलौकिक आहे.
रचना कोणाची असो हे गातांना
भक्त तल्लीन होतात व त्यांचा
भाव देवा पर्यंत पोचतो.
अर्थ समजून म्हटले तर
आरती मध्ये भाव येतात…!
राम कृष्ण हरी
घालीन लोटांगण प्राथनेचे महत्त्व | मराठी ज्ञान |
bhajan | god prayer | importance of prayer | ram
गुरुस्तोत्र
।।गुरुस्तोत्र।।
अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १॥
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ २॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ३॥
स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित्सचराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ४॥
चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ५॥
सर्वश्रुतिशिरोरत्नविराजितपदाम्बुजः ।
वेदान्ताम्बुजसूर्यो यः तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ६॥
चैतन्यश्शाश्वतश्शान्तः व्योमातीतो निरञ्जनः ।
बिन्दुनादकलातीतः तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ७॥
ज्ञानशक्तिसमारूढः तत्त्वमालाविभूषितः ।
भुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ८॥
अनेकजन्मसम्प्राप्तकर्मबन्धविदाहिने ।
आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ९॥
शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः ।
गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १०॥
न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः ।
तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ११॥
मन्नाथः श्रीजगन्नाथः मद्गुरुः श्रीजगद्गुरुः ।
मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १२॥
गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् ।
गुरोः परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १३॥
त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ १४॥
॥ इति श्रीगुरुस्तोत्रम् ॥
Also Read :-
125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
Navratri | नवरात्रीच्या उपासना मागील इतिहास | घटस्थापना
Your Quaries
#ganpatibappamorya #ganpati #harekrishna #viral #marathi #मराठी #ganpati #ganpatibappamorya #god prayer #krishna #shreekrishna #ram #harekrishna
छान माहिती आणि वाचायला सोपी
धन्यवाद जी