चला पुन्हा जुना खेळ खेळू | टाईम प्लीज | Sunder Vichar मराठी

0
727
चला पुन्हा जुना खेळ खेळू | टाईम प्लीज | Sunder Vichar मराठी
चला पुन्हा जुना खेळ खेळू | टाईम प्लीज | Sunder Vichar मराठी

चला, पुन्हा जुना खेळ खेळू | टाईम प्लीज | Sunder Vichar मराठी

चला… पुन्हा जुना खेळ खेळू… 

काही म्हणा… परंतु लहानपणीच्या खेळांमधला
जो टाईम प्लीज नावाचा प्रकार होता ना…
तो म्हणजे आपल्याला खूपच आवडायचा.

वरवर पळवाट म्हणून वापरले जाणारे हे तंत्र…
वेळ आली तर… आपल्या आवडत्यावर
राज्य आले की… त्याला मदत करणारी
एक आधार तंत्र पण व्हायची…!

जर धावता धावता दम लागला तर पाठीवर
धप्पा पडायच्या आत… टाईम प्लीज…!

किती सहज आणि सोपा रस्ता होता ना, निसटून जाण्यासाठी…!
ते पण समोरच्याच्या डोळ्यासमोर… परंतु तरीही खेळातून
कधी आपण वगळले गेलो नाही…!
( आणि गंमत म्हणजे टाईम प्लीज म्हणतांना थुंकी लावून
पालथ्या तळव्यावर म्हणावे लागायचे… परंतु
आज पर्यंत त्यामागचे तर्क काही कळले नाही…! )

एकंदरीत खेळ किंवा वेळ कोणतीही असो
टाईम प्लीज ला कोणीही कधी अडवले नाही…!

चला पुन्हा जुना खेळ खेळू

आता हळू हळू मोठे झालो… खेळ बदलले आणि वेळ ही…
वेळेची कधीही पर्वा ना करणारे खेळ… आज पैशाच्या
आणि वेळेच्या मागे धावण्याचे झाले आहेत…!
आणि टाईम प्लीज ची ओळख देणारी
मात्रा आज मात्र हरवून बसलो.

धावायचे किती… थांबायचे कुठे आता हे सगळे
आता आपल्या हातात राहीलेले नाही…!
असे जीव जडलेले खेळ मागे पडून
ते जीवघेणे कधी झाले हे ही कळलेच नाही.

चला पुन्हा जुना खेळ खेळू

शरीर…. मन… आत्मा… सगळीकडे तीच धावाधाव.
शरीराचा मनाशी… मनाचा शरीराशी आणि त्यात
भर म्हणून आत्मा तर मग आहेच…!
यांचा नुसताच लागोपाठ लपंडाव सुरू आहे…!

अंधार आता अंधार वाटत नाही…! उजेडात काही दिसत नाही…
आणि वाट्याला येते ते फक्त पडणेच…!

कधी जमिनीवर पडतो तर कधी पडल्या जातो…!
आणि अगदी थकल्या भागल्या आवाजात म्हणावेसे वाटते…
टाईम प्लीज…! टाईम प्लीज…!

पण ते आज शक्य नसते… आणि आता ते कधीच शक्य नसते…!
खरोकर शक्य नसते…? मन पुन्हा पुन्हा विचारते…
खरोकर शक्य नसते…?

चला पुन्हा जुना खेळ खेळू

मित्रा….
आपल्या कामातून थोडा वेळ काढून जरा स्वतः कडे बघूया…
कुठे आलो आहोत आपण…? नक्की काय करत आहो आपण…?
जे आपल्याला हवे आहे… ते करत आहो की…
फक्त… आपली गरज भागवत आहेत जगण्याची…!
चला… पुन्हा जुना खेळ खेळू…
टाइम प्लीज…. एकदा म्हणून तर बघू…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here