जगण्यातली सहजता | सुंदर विचार | छान विचार मराठी | Suvichar

0
764
जगण्यातली सहजता - सुंदर विचार - छान विचार मराठी - Suvichar
मराठी-सुविचार-जगण्यातली-सहजता-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar

जगण्यातली सहजता | सुंदर विचार | छान विचार मराठी | Suvichar

जगण्यातली सहजता अनुभवायची असेल तर
आपणही थोडे सहज आणि सोपे बनवून जावे. 
निरागसपणे वावरायचे असेल तर
आपणही थोडे निरागस बनून रहावे.
एका मित्राने आपल्या लग्नाला पंचवीस पूर्ण झालेत म्हणून जवळच्या वीस मित्रांना 
सहपरिवार बोलावले. जवळपास पन्नास लोक जमले. लग्नाच्या वाढदिवसाचा 
कार्यक्रम पार पडला. नंतर सगळ्यांना तो जेवणाकडे घेऊन गेला. 
 
जेवणाचे टेबल सजले. जेवण बनविणाऱ्या आचारीने इतर पदार्था सोबत छान पैकी 
सुगंधीत तांदळाचा पुलाव बनविला होता. पन्नास ताट सजवून सगळ्यांना वाढण्यात 
आले… पण पुलावाच्या सुगंधाने प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले होते…
 
आता जेवायला सुरुवात होणार तोच जेवण बनविणारा आचारी बोलायला लागला… 
कृपया ऐका… तांदळामध्ये एक लहानसा पांढरा खडा पडलेला आहे… आणि तो 
तांदळाच्याच आकाराचा आणि रंगाचा असल्याने मला सापडला नाही.
थोडा काळजी ने पुलावाचा आनंद घ्या…! जर को तो खडा दाताखाली आल्यास 
आपल्याला त्रास होऊ शकतो…..
 
आता पूर्ण जेवण चांगला आहे… सोबत असलेला सुगंधीत आणि चवदार पुलाव
पण आहे. तरीपण जेवणाचा आनंद निघून गेलेला आहे.
जेवतांना आता लक्ष चवीकडे नाही तर आपल्या प्रत्येक घासाकडे आहे. आता घास 
हळुवारपणे खाल्ला जात आहे…! काय माहित तो खडा याच घासाला आपल्यालाच
आला तर…
 
आता सगळ्यांच्या जेवणातला आनंद गेला. जो तो सावध झाल्याने गप्पा गोष्टी विनोद 
काहीही झाले नाही. सर्वांनी शेवट पर्यंत जेवण केले अगदी शेवटचा घास देखील 
सावधपणे घेतला. सर्वांनी आपल्याला खडा न आल्या बद्दल सुस्कारा सोडला.

हात धुतले तेव्हा कुणाच्या तरी लक्षात आले
… अरे खडा तर कुणालाच आला नाही.
आचारीला बोलावले त्याला विचारले तू तर म्हणाला होतास की खडा येईल
आचारी म्हणाला… मी बहुतेक सगळेच खडे काढलेले होते…. पण एखादा खडा
राहिला असेल असे वाटले म्हणून तुम्हाला सावध केले…
 
सगळे एकमेकांकडे बघू लागले. अतिशय उत्तम स्वादिष्ट झालेल्या जेवणावर त्या 
नसलेल्या खड्या मुळे काहीच गप्पागोष्टी झाल्या नाहीत.
जेवण करून सगळे थकलेले होते. कारण प्रत्येक घास खाण्यातली सहजता गेली
होती. जबड्याच्या हालचालीतली सहजता गेली होती म्हणून जेवण जेवणे कष्टदायी
झाले होते.

जगण्यातली सहजता | सुंदर विचार

 
तात्पर्य : सध्या कोरोनामुळे आपली अवस्था पुलावातल्या खड्यासारखी झाली आहे. 
कुणाला हा खडा येईल हे सांगता येत नाही. जगण्यातील सहजता गेली आहे.
अगदी मदत करणारा हात देखील कोरोनाचा असेल कादूधवालाभाजीवाला
किराणावाला जीवनावश्यक वस्तू देताना वस्तू बरोबर काय देईल याची शंका घेऊन 
जगतोय आपण.

पूर्वी जर शींक आली तर वाटायचे की नक्की कुणीतरी आपली आठवण काढत आहे….!
आणि जर का आता शींक आली की वाटते देवाने आपली फाईल बाहेर काढली 
की काय…! माहीत नाही किती दिवस चालेल हे ….!
पण जगण्यातली सहजता किती महत्वाची आहे हे आता कळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here