23 झोपे संबंधी धर्म शास्त्रातील नियम – शांत मनाने वाचा

0
212
झोपे संबंधी धर्म शास्त्रातील नियम - शांत मनाने वाचा
झोपे संबंधी धर्म शास्त्रातील नियम - शांत मनाने वाचा

23 झोपे संबंधी धर्म शास्त्रातील नियम

सध्या भौतिक व्यस्ततेमुळे लोकं रात्री उशीरा झोपतात. आणि
सकाळी उशिरा उठतात. ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात.
व्यवहारात असंतुलनामुळे सामाजिक वातावरण देखील कुप्रभावित होते.
चांगली झोप आमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक
आहे. आणि योग्य जागरण आमच्या चेतनेचा विकास आणि जीवनात यश
गाठण्यासाठी आवश्यक आहे. नियमाने चालणे आवश्यक आहे. तर जाणून
घ्या 23 झोपेसंबंधी धर्मशास्त्रातील नियम – झोप आणि जागरण याचे नियम
जाणून घेणे आवश्यक आहे. #marathi

झोपेचे नियम

नियम 1 :-
झोपण्यापूर्वी दररोज पाच-दहा मिनिटे ध्यान करून मग झोपावे.
योग निद्रेत झोपू शकत असाल तर योग्य ठरेल.

नियम 2 :-
रात्री प्रथम प्रहरी झोपून जावे.

नियम 3 :-
ओले पाय करून झोपू नये. कोरडे पाय करून झोपल्यास
लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो.

नियम 4 :-
पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये.
( पदमपुराण )

नियम 5 :- पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. शिक्षणात प्रगती होते.

23 झोपे संबंधी धर्म शास्त्रातील नियम

नियम 6 :-
पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होते.

नियम 7 :-
उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो. सतत मृत्युभय राहते.

नियम 8 :-
दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य वाढते.

नियम 9 :-
देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये.

नियम 10 :-
नग्न अवस्थेत झोपू नये. (धर्मसूत्र)

नियम 11 -:
विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ
झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे. (चाणक्य नीती)

23 झोपे संबंधी धर्म शास्त्रातील नियम

नियम 12 :-
झोपलेल्या व्यक्तीस
अचानक उठवू नये.

नियम 13 :-
निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे
3:40 ते 4:28 च्या दरम्यान उठले पाहिजे ( देवी भागवत )

नियम 14 :-
सुनसान ओसाड घरात तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये.

नियम 15 :-
तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडाने झोपू नये. (महाभारत)

नियम 16 :-
दिवसा कधीही झोपू नये. परंतु ज्येष्ठ महिन्यात 1 तास 48 मिनटे झोपू शकता.
( दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते. )

नियम 17 :-
सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असाह्य होतो. (ब्राह्मवैवर्त पुराण)

नियम 18 :-
सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपले पाहिजे.

नियम 19 :-
डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

नियम 20 :-
यम आणि दृष्ट देवतांचे निवास्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे
पाय करून झोपू नये. त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि त्यामुळे
मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरण शक्ती कमी होते. शिवाय
बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते.

नियम 21 :-
हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये.

नियम 22 :-
पलंगावर बसून खाणे तसेच पिणे अयोग्य तसेच अशुभ मानले जाते.

नियम 23 :-
झोपतांना वाचन करु नये.आणि असे केल्याने नजरदोष निर्माण होतो.

आता जाणून घ्या… उठण्याचे नियम :-

1. ब्रह्म मुहूर्तात उठणे सर्वात योग्य आहे. सूर्योदयाहून किमान
दीड तासापूर्वीची वेळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्त असते.

2. अती विचार… कल्पना… करणे हे अर्धजाग्रत अवस्थेचा भाग आहे.
हे जागरणाच्या विरुद्ध आहे.

3. दिवास्वप्न बघू नये. दिवास्वप्न बघितल्याने मनाची दृढता संपते.

4. मन भटकत असल्यास ध्यान रूपात मनोरंजन करता येऊ
शकते. याने जागरणाची रक्षा होईल.

5. नशा आणि तामसिक भोजन यामुळे जागरण खंडित होते.
हे शास्त्र विरुद्ध कर्म आहे.

6. ध्यान किंवा साक्षी भाव यात राहिल्याने जागरण वाढते.

या सर्व नियमांचे अनुसरण केल्याने कीर्ती वाढते. तसेच निरोगी
व दीर्घायुष्य लाभते.

23 झोपे संबंधी धर्म शास्त्रातील नियम –
झोप आणि जागरण याचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे.
#marathi #धर्मशास्त्र #अध्यात्म

निवांतपणे वाचा हे मराठी सुविचार स्टेटस | मनाला खूप आनंद देतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here