त्रासाची खुंटी – Good Thought In Marathi –
Sunder vichar
मामांच्या ऑफिसात त्यांच्याच लांबच्या नात्यातला एक भाचा कामाला होता.
त्यांचे नाते जरी दूरचे असले तरी कामात मात्र दोघे काम मिळून करायचे…
पूर्ण प्रामाणिकपणाने.
सध्या ऑफिसच्या कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप
वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग
हे रोजचेच झालेले.
मामांना परिस्थिती पाहून वाटायचे…
आता सहन होत नाही…! ऑफिसमध्येही
खूपच त्रास होत आहे आणि आणि घरीही
शांतता नाही….
असे स्वतःशीच बोलत मामा घरी
जायला निघाले.
त्यांचा भाचा ही घरी जायच्या तयारीत होता…
दोघेही ऑफिसच्या बाहेर सोबतच आले.
मामाने भाच्याला म्हटले… चाल माझ्यासोबत
आज मी घरी सोडतो तुला…
भाचा मामाच्या कार मध्ये बसला…
त्रासाची खुंटी – Good Thought In Marathi –
Sunder vichar
भाच्याचे घर ऑफिस पासून थोड्याच अंतरावर होते
रस्ता दोघांचा एकाच होता… १० मिनिटांत भाच्याचे
घर हि आले, वेळ कसा गेला हे दोघांनाही कळले नाही.
गाडीत दोघेही मौनच होते, पण विचारांचा गोंधळ
दोघांच्याही डोक्यात होताच. घरी पोहोचल्यावर
भाच्याने मामाला चहा घेऊन जा असे म्हटले.
तसा उशीर झालेला होता, तरीपण मामा गाडी बाहेर
आलेच कारण घराजवळ येऊनही आत न जाणे बरे
दिसले नसते म्हणून फक्त पाच मिनिटांकरिता येतो
असे मामा म्हणाले.
घराच्या दाराशी भिंतीवर एक खुंटी होती. भाच्याने त्या खुंटीवर
हात फिरवला… काहीतरी केले…. मामा बघत होते पण त्यांना
ते काही कळले नाही. नंतर त्याने दाराची बेल वाजवली.
दार उघडताच भाच्याच्या चेहर्यावरचे भाव एकदम बदलूनच गेले.
त्याने हसत आपल्या बायकोला म्हटले, पोहचलो एकदाचा.
किती छान वाटत आहे… आता तू मामांसाठी छान
चहा आण पाहू.
समोर आलेल्या आपल्या पोरांना घट्ट मिठी मारली
व खिशातून चॉकलेट काढून पोरांना दिले.
मामांना हे सर्व पाहून प्रचंड आश्चर्याचा धक्काच
बसला.
त्रासाची खुंटी – Good Thought In Marathi –
Sunder vichar
ऑफिसमध्ये वैतागलेला हा माणूस अचानक
एका क्षणात कसा काय एवढा आनंदी झाला…?
गाडीतले मौन, विचारांची मारामारी खरी होती
की हे घरातले हसणे – खिदळणे आणि आनंद…?
मामांना प्रश्नच पडला. चहा घेऊन मामा निघाले.
भाचा मामांना सोडण्यासाठी गाडीपर्यंत आला.
गाडीत बसता बसता मामांनी भाच्याला विचारले…
बेटा मला तुझ्या दोन गोष्टी कळल्या नाहीत…!
तू त्या भिंतीवरील खुंटीला काय केलेस…?
आणि घरी पोहोचताच तुझे मौन पळून गेले. काय हे…?
त्यावर भाचा म्हणाला, मामा मी दरदिवशी घरी आलो
की या खुंटीवर माझे सर्व त्रास टांगतो आणि नंतरच
घराच्या आत जातो. त्यामुळे मी घरी पोहोचताच
प्रसन्न होतो…!
दुसर्या दिवशी घरून निघतांना पुन्हा आपले त्रास
त्या खुंटीवरून उचलतो. पण मामा काल टांगलेले
काही पडतात रात्रभरात आणि सकाळी कधीकधी
त्रास खुंटीवर सापडतच नाहीत.
Also Read :-
125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी
255+ Marathi Suvichar | आत्मविश्वास वाढविणारे मराठी सुविचार