दिवाळी सणाची माहिती आणि महत्व – Diwali Festival Information In Marathi

0
906
happy-diwali-wishesh-दिवाळीच्या-हार्दिक-शुभेच्छा-दिवाळी-सणाची-माहिती-आणि-महत्व-Diwali-Festival-Information-In-Marathi-दिवा
happy-diwali-wishesh-दिवाळीच्या-हार्दिक-शुभेच्छा-दिवाळी-सणाची-माहिती-आणि-महत्व-Diwali-Festival-Information

 

दिवाळी सणाची माहिती आणि महत्व – Diwali Festival Information In Marathi

आपल्या भारत देशात हिंदू धर्माचा साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी…!
तसे आपल्याला दिवाळी या सणा बद्दल… या पांच दिवसीय उत्सवाबद्दल माहिती असेलच 

परंतु दिवाळी विषयी आणखीन काही महत्वाची माहिती या लेखातून आपल्या नक्की होईल.

दिवाळी सणाबद्दल संपूर्ण माहिती आणि महत्त्व

दिवाळी हा सण म्हणजे दिव्याचा उत्सव. दीपावली किंवा दिवाळी हा एक खूप जुना

हजारों वर्षापासून चालत आलेला हिंदू उत्सव आहे. हा उत्सव शरद ऋतू मध्ये

प्रत्येक वर्षी साजरा केला जातो.  दिवाळी हा सण भारतातील सर्वात मोठा आणि

उज्वल उत्सव आहे. दिवाळी हा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे.

 

दिवाळी हा हिंदू धर्माचा मुख्य सण आहे. दिवाळी दिव्यानंचा सण…. हा सण दरवर्षी कार्तिक अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. दिवाळी या सणाला दीपावली असे म्हणूनही 

ओळखले जाते.
असे म्हणतात कि या दिवसाच्या रात्रीला दिवेंनी सजवलेल्या लक्ष्मीदेवी पर्यटनासाठी
पृथ्वीवर बाहेर पडतात आणि आपल्या भक्तांसोबत आनंद साजरा करतात. 
दिवाळी हा उत्सव साजरा करण्यामागचा मुख्य कारण म्हणजे भगवान श्री हरी विष्णूच्या 
रूपाने जन्मलेले भगवान श्री राम यांच्याशी संबंधित आहे.

अयोध्येच्या जनतेसाठी भगवान श्रीरामांचे स्वागत याकरिता अधिक महत्वाचे होते की… 

भगवान श्रीराम १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात परत आले होते. त्यावेळी

त्यांनी महामायावी दानव लंकापती रावण सोबत युद्ध करून त्याला मारले होते…

यामुळे प्रभू श्री राम यांचे स्वागत फार उत्साहाचे होते. 

 

भारतात असे मानले जाते की जेव्हा भगवान श्री राम अयोध्येत पोहोचले, तेव्हा हजारो तेलाचे

दिवे जाळून पूर्ण अयोध्या प्रकाशाने उजळून गेली होती आणि या उजेळानेच श्री रामाचे स्वागत

केले गेले. संपूर्ण अयोध्या हि फुलांनी आणि सुंदर रांगोळीने सजली होती.

तेव्हापासून दिवाळीला दिवांचा उत्सव म्हणतात. 

 

भगवान श्री राम यांच्या घरी त्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण भारतातील लोकांनी तेलाचे

दिवे सजविले होते म्हणूनच या सणाला दीपावली असेही म्हणतात.

दिवे लाऊन उजेड करणे हि परंपरा म्हणजे वाईटच्यावर चांगल्याची  विजयाचे प्रतीक आहे. 

 

सगळे लोकं आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी आणि लक्ष्मी पादुका काढून 

देवी लक्ष्मीचे स्वागत करतात. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी लोकं आपल्या मित्र

नातेवाईक…. आणि शेजार्‍यांना मिठाई आणि फराळाचे वाटप करतात. काही बक्षीस देतात…

 

दिवाळीला आंब्याच्या पानांची तोरण आणि झेंडूच्या फुलांचे तोरण हि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर
लावली जाते. घरासमोर अंगणात वेगवेळ्या रंगांच्या छान – छान  रांगोळ्या काढल्या जातात.
अशाप्रकारे घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात.

 

 हिंदू धर्मात रांगोळीला खूपच शुभकारक मानले जाते.

                                     दिवाळीचे पाच दिवसांचे महत्व

 धनत्रयोदशी ( धनतेरस ) 

दिवाळी ( दीपावली ) या पाच दिवसीय उत्सवरुपी सणाची सुरुवात धनतेरस (धनत्रयोदशी
पासून होते. या दिवसापासून संपुर्ण घरे तेलाच्या दिव्यांनी तसेच आकाश कंदील… 
रंगीबेरंगी लहान विजेचे दिवे… पूर्ण घर हे रंगीत लाईटाची सिरीज लावून सजवले जातात
 

 

या दिवशी असे मानले जाते कि नवीन धातूची वस्तू घेणे शुभकारक असते आणि म्हणून या 

दिवशी लोकं बाजारात जाऊन सोने चांदी आणि कोणतीही नवीन वस्तू खरेदी करतात. 
तसेच या दिवशी धन्वंतरी देवीची पूजा हि केली जाते. अशी मान्यता आहे  की 
ह्या दिवशी आपल्या शरीराला निरोगी ठेवणारी श्रीमंत देवी धनवंतरी  यांचा जन्मदिवस होता. 
या दिवशीची अशीही मान्यता आहे की या दिवशी आई लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि संपूर्ण
वाईटाचा नाश होतो.

नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी हा दिवस म्हणजे पाच दिवसांच्या उत्सवाचा दुसरा दिवश. ह्या दिवसाला छोटी दिवाळी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी सगळेच आपले घर स्वच्छ करून पूर्ण घर

रंगांनी सजवितात आणि महिला मंडळी हातावर मेहंदी देखील लावतात.

 

या दिवसापासून लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ लागतात. या दिवशी लोक

त्यांच्या लाडक्या साठी… मित्रांसाठी… भेटवस्तू खरेदी करतात आणि त्यांना

त्या वस्तू भेट देऊन खूप आनंदित करतात… आणि स्वतःला ही आनंदी करतात…

लक्ष्मी पूजन/ दिवाळी

पाच दिवस चालणार्‍या या उत्सवातील तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजा. हा या सणाचा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी  आई लक्ष्मी…. भगवान 

श्री गणेश आई सरस्वती…. भगवान कुबेर यांची खूप श्रद्धापूर्वक पूजा केली जाते. 

असे म्हणतात की या दिवशी आई लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येतात आणि त्यांना त्यांच्या घरी

आमंत्रित करण्यासाठी आणि कायमस्वरुपी स्थायिक राहण्यासाठी, सर्व लोक घराच्या दारावर 

दिवे लावतात आणि सर्व दारे… आणि खिडक्या उघडून  ठेवतात. आणि नंतर पूजा झाल्यावर 
मुले घराबाहेर फटाके फोडतात आणि आई लक्ष्मीचे स्वागत करतात.

या दिवशी सर्व व्यापारीजन आप आपल्या दुकानात भगवान कुबेर आणि आई लक्ष्मीची 

श्रध्दापूर्वक पूजा करतात.
 

या महाउत्सवाचा चौथा दिवस म्हणजेच हा वर्ष प्रतिपदा म्हणून मानला जातो. ह्या दिवशी 

महाराजा विक्रम सिंहासनावर बसले होते. ह्याच दिवशी भगवान श्री कृष्णाने इंद्र देवाच्या 
कोपाने झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळातल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन 
पर्वत उचलला होता.

या दिवशी विवाहित जोडपे एकमेकांना चांगलेसे उपहार देवून आपल्या जोडीदाराला

आनंदी करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन

पूजा करतात. 

ग्रामीण भागात घरातील पशूंना विशेषतः गाई बैल म्हशी… आणि बकरी यांना सजवून 
त्यांना दिवाळीचे मिष्टान्न खायला देतात.

भाऊबीज

पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवाचा शेवट भाऊ-बहिणींमध्ये अमर्याद प्रेम आणि अतूट 
बंधनातून होते. दिवाळी सणाचा पाचवा दिवस आपल्याला भाऊबीज नावाने माहित आहे
 

भारतातील काही राज्यांमध्ये या दिवसाला टीका देखील म्हणतात. हा दिवस रक्षाबंधना सारखाच आहे पण याची प्रथा वेगळ्या आहेत. भाऊबीजच्या  दिवशी कुटुंबातील सर्व सर्वं बहीण- भाऊ एकत्र येऊन काही वेळ घालवतात आणि काही संस्मरणीय क्षण तयार करतात. परंपरेनुसार या दिवशी बहीण आपल्या भावाची पूजा करते आणि भाऊ आपल्या बहिणीला त्याची आवडती भेटवस्तू देते. 

या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करते आणि बहिण ही देखील 
आपल्या भावाच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देते.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 

 
पहीला दिवा लागला आज दारी…
सुखाची किरणे येई घरी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

 
happy-diwali-wishesh-दिवाळीच्या-हार्दिक-शुभेच्छा-दिवाळी-सणाची-माहिती-आणि-महत्व-Diwali-Festival-Information-In-Marathi-दिवा
दिवाळी सणाची माहिती आणि महत्व – Diwali Festival Information In Marathi

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा…
दु:खाला सीमा नाहीत आणि
सुखाला मर्यादा ठरलेल्या आहेत़.
पण… आनंद साजरा करण्यासाठी
कोणत्याही कारणांची गरज नसतेच…!
आणि भरभराटीचा आनंद
समाधानाशिवाय घेता येत नाही़.
म्हणून, लक्ष्मी माऊली तुमच्या
मनात चिरंतन समाधानाची ज्योत
प्रज्वलित करो आणि त्या ज्योतीच्या
किरणोत्सर्गातून प्रगतीचे  मार्ग प्रशस्त होवो,
हीच दीपचरणी प्रार्थना़…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

 

 

happy-diwali-wishesh-दिवाळीच्या-हार्दिक-शुभेच्छा-दिवाळी-सणाची-माहिती-आणि-महत्व-Diwali-Festival-Information-In-Marathi-दिवा
दिवाळी सणाची माहिती आणि महत्व – Diwali Festival Information In Marathi

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

happy-diwali-wishesh-दिवाळीच्या-हार्दिक-शुभेच्छा-दिवाळी-सणाची-माहिती-आणि-महत्व-Diwali-Festival-Information-In-Marathi-दिवा
दिवाळी सणाची माहिती आणि महत्व – Diwali Festival Information In Marathi

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

happy-diwali-wishesh-दिवाळीच्या-हार्दिक-शुभेच्छा-दिवाळी-सणाची-माहिती-आणि-महत्व-Diwali-Festival-Information-In-Marathi-दिवा
दिवाळी सणाची माहिती आणि महत्व – Diwali Festival Information In Marathi

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

शुभ दिपावली       

मी आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास
आणि आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या
खूप खूप  हार्दिक शुभेच्छा

 

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे…
लक्ष्मीच्या पावलांनी घर, सुख समृध्दीने भरू दे…
दीपावलीच्या शुभक्षणांनी
आपली संपूर्ण स्वप्न साकार व्हावीत…
ही दिवाळी आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
व त्या आठवणीने आपले जीवन
अधिकाधिक सुंदर व्हावे…

 

धनलक्ष्मी… धान्यलक्ष्मी… धैर्यलक्ष्मी…
शौर्यलक्ष्मी… विद्यालक्ष्मी…
कार्यलक्ष्मी… विजयालक्ष्मी…
राजलक्ष्मी… या दिवाळीत
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा
वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here