नवरा बायको Jokes – Navara Bayko Jokes – मराठी जोक्स |
आज रविवार ….!
रविवार असूनही सकाळी सकाळी लवकर उठलो आणि पोर्च मध्ये
बसलो होतो…!
दररोज सकाळपासूनच कुणालाही न भिता दिवसभर चिमण्यांचा
मुक्त संचार सुरूच राहतो…
आजही चिमणा चिमणीची एक जोडी सकाळीच हजर झाली…!
चिमणा खाली टाकलेल्या दाण्यांना टिपण्यात दंग होता…
आणि चिमणी एका कुंडीतील मिळालेली एक छोटी काडी चोचीत
पकडून सतत चिवचिव करीत होती… ती आपल्या भाषेत काय बोलत
असावी काहीच कळत नव्हते… !
मी आपला विचारच करीत होतो कि… ही चिमणी नक्की काय बोलत
असेल…?
तेवढ्यातच बायको चहा घेऊन आली…
तर मी बायकोलाच विचारले… अगं ही चिमणी अशी चोचीत काडी
धरून चिमण्याशी काय बोलत असेल…?
बायको म्हणाली, अहो… ही चिमणी आपल्या चोचीत काडी धरून
म्हणत आहे की…ए चिमण्या… तू घरात तरकाडीचे काम करत नाही…
अशाप्रकारे ती चहा ठेवून परत किचनमध्ये निघून गेली…!
आता साधी गप्पा मारायची पण सोय राहिलेली नाही आहे…!
नवरा बायको Jokes – Navara Bayko Jokes – मराठी जोक्स |
नवरा : आज थोडे मीठ भाजीत जास्त
वाटत आहे…!
बायको : भाजीत मीठ बरोबर आहे… थोडी भाजीच कमी
पडली आहे… तुम्हाला सांगितले होते ना…
थोडी भाजी जास्त आणायला…!
नवरा बायको Jokes – Navara Bayko Jokes – मराठी जोक्स |
थकलात म्हणून बायकोला चहा मागितला…
आणि कॉफी मिळाली कि समजायचे…
आज काहीतरी जड उचलाव लागणार आहे…!