नाती कशी जपावी, नात्यांवर सुंदर विचार | Relationship Thought

2
2592
नाती-मराठी-सुविचार-good-thoughts-in-marathi-on-life
नाती-मराठी-सुविचार-good-thoughts-in-marathi-on-life

आयुष्यातील नात्यांवर सुंदर विचार | Relationship Thoughts Marathi

पोट कसेही भरता येऊ शकते. पण… काळीज भरायला
माणसाजवळ माणुस असावा लागतो…!

नाती….! भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली अगदी लहान रेषा
एखाद्या वेळी शांत बसून जीवनात येऊन गेलेल्या आणि विसरलेल्या नात्यांचा
मनातून विचार केला तर लक्षात येते की… भरपूर लोकं… ज्यांच्यामुळे आपले
मन दुखले म्हणून आपण ज्यांना आपल्या जीवनातून कमी केले होते,
पण… ते अनेकदा समर्थनीय नव्हतेच…!

त्याने आपल्या भावना दुखावल्या असे म्हणत… आपण आपल्या अहंकाराला
विनाकारणच सांभाळत बसलो आणि आपल्या जीवनातील सोन्यासारखी
माणसे आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली.

त्यांचा एखादा न आवडलेला व्यवहार… हा आपण जणू काही जन्म-मरणाचा
प्रश्न बनवून दिला. आणि या अहंकाराने नात्याचा केव्हा बळी घेतला हे
कळलेच नाही.

शेवटी नाजूक नात्यांना अहंकाराची नाही, तर प्रेमाची… आपुलकीच्या
ओलाव्याचीच गरज असते.

जीवनात आपण जसे जसे शहाणे होत जातो तसे तसे आपल्या लक्षात येते की…
भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली अगदी लहान रेषा योग्य वेळी
जाणूनच आपण वागायला हवे होते…!

भावना हि क्षमा करणारी असते पण अहंकार मात्र एका घावात दोन तुकडे
करून मोकळा होतो. आपण खूप वेळा भावना दुखावल्या म्हणत नात्यात
दुरावा निर्माण करतो. पण वास्तविकत आपला अहंकार दुखावलेला असतो.

जसे एखादी आनंदाची बातमी असेल आणि त्याने जर का ती आपल्याला
उशिरा दिली तरीही आपल्याला दुःख होतोच आणि या दुःखा पायी आपण
साधे त्यांचे अभिनंदनही करत नाही आणि हे जीवनात खुपदा घडतेच…!

जीवन जगणे म्हणजे फक्त श्वास घेणे आणि सोडणे नसते…
तर त्या जगण्यालाही स्वतःचे असे वेगळे रूप आणि अस्तित्व असते….

नाती….! भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली अगदी लहान रेषा 

कुणाचेच कुणावाचून काहीच अडत नाही…. हे जरी खरे असले तरीही
जीवनात आलेली चांगली लोकं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुर जातात
तेव्हा मात्र जर ती लोकं आपल्या जीवनात असली असती तर
आपले जगणे आणखीनच सुंदर आणि अर्थपूर्ण झाले असते…
असे मात्र आपल्याला नक्कीच वाटून जाते…!

ह्या क्षणभंगुर जीवनाचे लाड पुरवतांना आपल्या जगण्याची पातळी आपण
सांभाळायला हवी आणि म्हणूनच हे जगणे सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या
चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणे आणि अहंकारामुळे त्यांना
न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावे असे मनापासून वाटते…!

खुपदा तर आपण समोरील व्यक्तीच्या वागण्याचा अर्थ आपण आपल्या मतानुसार
काढुन घेतो… पण तसा विचार समोरच्याचा नसतोच… तो सहज आपले म्हणून
वागत असतो… परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आपल्या जीवनातून
सहजच काढून टाकतो…

आणि गंमत म्हणजे आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही…
म्हणून…… कुणाची कितीही मोठी चुक असली तरी ती जीवनापेक्षा… नात्यापेक्षा मोठी
तर निश्चितच नाही …! बघा पटतंय… का…?

नाती-मराठी-सुविचार-good-thoughts-in-marathi-on-life
नाती-मराठी-सुविचार-good-thoughts-in-marathi-on-life

नाती आणि बर्फाचे गोळे
एक सारखेच असतात.
ज्यांना बनवणे सोपे….
पण टिकवणे खूप
अवघड असते.
दोघांना वाचण्यासाठी
फक्त एकच उपाय…
कायम शीतलता ठेवा.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here