नाते अर्धांगिनीचे, त्यागाचे | बायकोवर छान विचार, Bayko, Wife

2
704
आपण-आपल्या-बायकोला-किती-किंमत-द्यायची-नाते-अर्धांगनीचे-मराठी-सुविचार-पत्नी-bayko
आपण-आपल्या-बायकोला-किती-किंमत-द्यायची-नाते-अर्धांगनीचे-मराठी-सुविचार-पत्नी-bayko

नाते अर्धांगिनीचे, त्यागाचे | बायकोवर छान विचार, Bayko, Wife

आपण आपल्या बायकोला किती किंमत द्यायची…!

एका मोठ्या पदावर असलेल्या साहेबांकडे त्यांच्या घरचे काम करणारा
एक सखाराम नावाचा नावाचा नौकर होता. सखाराम आपल्या बायकोला
खूपच भीत असे.

जरी सखाराम शरीराने दिसायला धाम धचक होता तरी पण तो आपल्या बायकोला
खूपच घाबरत असे. हे त्या साहेबालाही माहित होते.

एक दिवस सखाराम साहेबांचे काम करीत असतांना त्याला त्याच्या बायकोचा फोन
येतो आणि तो खूप घाबरत घाबरत फक्त फोनवर हो म्हणत राहतो. जवळच उभे
असलेले साहेब हा सगळा प्रकार बघतात आणि फोन बंद झाल्यावाल सखाराम ला
विचारतात… सखाराम तू आपल्या बायकोला एवढा का घाबरतोस…?
त्यावर सखाराम उत्तर देतो… साहेब मी बायकोला मुळीच घाबरत नाही…
तर तिचा आदर करतो.

सखाराम चे हे शब्द ऐकून साहेब हसून म्हणाले… असे काय आहे तिच्यामध्ये…?
ती सुंदर ही नाही आहे… ती सुशिक्षित ही नाही आहे.

नाते अर्धांगिनीचे, त्यागाचे

यावर सखाराम म्हणाला…. साहेब मला काहीच फरक पडत नाही की ती कशी आहे…
पण मला सगळ्यात आपुलकीचे नाते बायकोचेच वाटते. त्याचे हे बोलणे ऐकून
साहेब म्हणाले… तु बायकोचा दास आहेस…! तिच्या पदराला तू स्वतःला बांधून घेतले
आहेस आणि इतर सगळ्या नात्यांची तुला काहीच किंमत नाही.
सखाराम साहेबांचे सगळे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि नंतर उत्तर दिले.

साहेब, आई – वडील हे नातेवाईक नसतात तर ते आपले देव असतात.
त्याच्या सोबत नाते निभवायचे नसून त्यांची पूजा करायची असते.

बहिण – भाऊ चे नाते हे जन्मापासूनच असते. मित्रतेचे नाते हे स्वार्थाचे असते.
साहेब आता आपलेच नाते पहा ना…! फक्त पैसे आणि गरजेचेच आहे.
परंतु… बायको… तिचे आपल्याशी कोणतेही नाते नसून देखील ती कायमची
आपली होऊन जाते.

बायको… आपले जन्मजात नाते, मित्र-मैत्रीण आणि आपले घर – दार सगळे सोडून
आपल्या सोबत आपल्या घरी येते आणि आपले सगळे सुख दु:ख एकत्र जगते.
आपले दुख तिचे दुख आणि आपले सुख तिचे सुख होते.
शेवटच्या श्वासापर्यत सोबत राहते. बायको म्हणजे फक्त एक नातेच नाही तर…
अनेक नात्यांची माला आहे.

बायको जेव्हा आपली सेवा करते… आपल्यावर प्रेम करते…
तेव्हा ती एका आई प्रमाणे करते.

बायको जेव्हा आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टीवर चर्चा करते
आणि मी आपली सगळी कमाई तिच्या हातात देतो.
कारण मला विश्वास आहे की… ती आपल्या घराचे
हितच साधेल तेव्हा ती एका वडिलांन सारखी असते.

बायको जेव्हा आपली काळजी घेते… आपल्या चुकांवर रागावते….
आपल्यासाठी खरेदी करते…!
तेव्हा ती आपल्या बहिणी प्रमाणे होते.

बायको जेव्हा आपल्याकडे नवनवीन मागणी करते…
नखरे करते… रुसते… हट्ट करते….
तेव्हा ती मुली सारखी होते.

बायकोवर छान विचार

बायको जेव्हा आपल्या सोबत विचार विमर्श करते…
कुटुंब चालवण्यासाठी सल्ले देते… भांडण करते….
तेव्हा ती एका मित्रा सारखी होते.

बायको जेव्हा घरातील सगळे देणेघेणे… खरेदी…
घर चालवण्याची जवाबदारी उचलते…
तेव्हा ती एक मालकीण होते. आणि

बायको जेव्हा सगळ्या जगाला विसरून एवढेच नाही…. आपल्या मुलांना देखील
सोडून आपल्या मिठीत येते तेव्हा ती प्रेमिका… अर्धांगिनी असते.
आपला प्राण आणि आत्मा होते. जी आपले सर्वस्व आपल्या स्वाधीन करते.
मी तिचा आदर करतो तर हे काही चूकीचे नाही ना साहेब…?

मग एवढा आदर तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या बायकोला द्यायलाच पाहिजे.
साहेब सखाराम चे सगळे बोलणे ऐकत होते. हे सगळे ऐकून साहेब स्तब्ध झाले.

बायकोवर छान विचार

एका निरक्षर आणि गरिबी मध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तीकडून आज जीवनाचा
नवीन विचार मिळाला होता. मालकाला हे ही कळले की एवढा आदर तर तो
आपल्या बायकोलाही देत नाही.

आपल्या कुटुंबाची काळजी घ्या… ती तुमची आयुष्यभराची काळजी घेईल.

💑💓💖💗🙏

 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here