प्रत्येक नवरा बायको साठी | शेवटी आपण दोघेच तर असू | बोधकथा

0
403
प्रत्येक नवरा बायको साठी - शेवटी आपण दोघेच तर असू - बोधकथा
प्रत्येक नवरा बायको साठी - शेवटी आपण दोघेच तर असू - बोधकथा

शेवटी आपण दोघेच तर असू …
(प्रत्येक नवरा बायको साठी)

प्रत्येक नवरा बायको साठी |
शेवटी आपण दोघेच तर असू |
बोधकथा

नवरा बायकोच्या प्रेमामध्ये
आर्थिक परिस्थिती हे कारण
कधीच दुःखाचे ठरत नाही.
ठरू देखील नये.

त्याने तिची भावना जपावी
तिने त्याचे मन ओळखावे.
सुंदर जगण्याला अजून
काय हवे….?

लग्नाच्या दोन वर्षांनतर सहजच
बायकोच्या मनात एक विचार
आला…. की जर आपण आपल्या
नवऱ्याला सोडून गेलो तर आपल्या
नवऱ्याची काय प्रतिक्रिया असेल.

तो काय करेल….? आणि नवऱ्याची
परीक्षा घेण्यासाठी तिने आपल्या
मनातील विचार एका कागदावर
लिहिले… की मी तुमच्या सोबत
राहून कंटाळले आहे.

प्रत्येक नवरा बायको साठी | शेवटी आपण दोघेच तर असू | बोधकथा
प्रत्येक नवरा बायको साठी | शेवटी आपण दोघेच तर असू | बोधकथा

या संसाराचा मला आता वीट
आला आहे. मी आता तुमच्या
सोबत राहू शकत नाही. त्यामुळे
मी आता हे घर सोडून जात आहे.
आणि तिने तो कागद टेबलवर
ठेवला आणि बेड खाली जाऊन
लपली.

काही वेळानंतर नवरा
ऑफिस मधून घरी आला.
परंतु बायको कुठेही दिसली नाही.
त्या टेबलवर एक कागद दिसला
त्याने तो कागद वाचला आणि
काही वेळ तो एकदम शांत झाला.

आणि काही वेळाने त्यानेही
कागदावर काहीतरी लिहिले
आणि जोरजोरात शिट्टी वाजवून
तो आनंदाने नाचू लागला.

त्यानंतर त्याने कपडे बदलले
आणि आपल्या मैत्रिणीला फोन
लावला. आज मी मुक्त झालो
आहे. कारण आज माझ्या
बायकोला ‘कळून चुकले आहे
की ती माझ्या लायक नव्हती.
आणि ह्याच कारणामुळे ती
कायमची घर सोडून गेली आहे.

प्रत्येक नवरा बायको साठी |
शेवटी आपण दोघेच तर असू |
बोधकथा

त्यामुळे मी आता मुक्त झालो
आहे. आणि तुला भेटण्यासाठी
मी समोरच्या बागेत येत आहे,
तू लवकर आवरून समोरच्या
बागेत ये आणि नवरा बाहेर
निघून गेला.

अश्रू भरलेल्या डोळ्यांनी बायको
बेड खालून बाहेर आली. आणि
थरथरत्या हाताने तिने तो कागद
उचलला आणि ती तो कागद
वाचू लागली. त्यामध्ये असे लिहिले
होते की अगं वेडाबाई, बेड खालून
तुझे पाय दिसत आहेत.

तू लवकर चहा बनव.
मी समोरच्या दुकानातून
ब्रेड घेऊन येत आहे.
माझ्या आयुष्यात आनंद
तुझ्या येण्यामुळे आहे.

अर्धा आनंद तुला सतावण्यामध्ये
आहे. तर अर्धा आनंद तुला
मनावण्यामध्ये आहे.

प्रत्येक नवरा बायको साठी |
शेवटी आपण दोघेच तर असू |
बोधकथा

प्रत्येक नवरा बायको साठी | शेवटी आपण दोघेच तर असू | बोधकथा
प्रत्येक नवरा बायको साठी | शेवटी आपण दोघेच तर असू

शेवटी तर आपण
दोघेच असु…

आपण जरी भांडलो….
रागाराग केला…..
एकमेकांवर तुटून पडलो…
एकमेकांवर दादागिरी
करण्यासाठी…..

शेवटी तर आपण
दोघेच असु…

जे बोलायचे ते बोल,
जे करायचे ते कर
एकमेकांचे चष्मे
शोधण्यासाठी…..

शेवटी तर आपण
दोघेच असु…

मी रूसलो तर तु मला मनव,
तु रुसलीस तर मी तुला मनवीन
एकमेकांचे लाड करण्यासाठी

शेवटी तर आपण
दोघेच असु…

जेव्हा नजर कमी होईल,
स्मरणशक्ती पण कमी होईल
तेव्हा एकमेकांना….
एकमेकांमध्ये शोधण्यासाठी

शेवटी तर आपण
दोघेच असु…

गुडघेदुखी जेव्हा वाढेल,
कुठे बाहेर फिरणे ही थांबेल
तेव्हा एकमेकांच्या पायाची
नख कापण्यासाठी…..

शेवटी तर आपण
दोघेच असु…

“माझे रिपोर्ट्स अगदी
नाॅर्मल आहेत. I am All
right” असे बोलुन एकमेकांना
छेडण्यासाठी,

शेवटी तर आपण
दोघेच असु…

जेव्हा आपली साथ सुटेल….
अंतिम निरोपाची वेळ येईल
तेव्हा एकमेकांना माफ
करण्यासाठी,

शेवटी तर आपण
दोघेच असु…

शेवटी तर फक्त आणि फक्त
आपण दोघेच असु…..!

Dedicated to all lovely Couples…

Also Read :-

Navra Bayko Status | नवरा तो नवराच असतो | नवरा बायको स्टेटस

Marathi Story | माझ्याबद्दल तुला काय वाटते..? | नवरा – बायको

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here