बापाची मुलीला सासरी जातांना भेट | डोळ्यात अश्रुधारा आणणारा सुंदर लेख || Good Thoughts In Marathi

0
929
बापाची मुलीला सासरी जातांना भेट | डोळ्यात अश्रुधारा आणणारा सुंदर लेख || Good Thoughts In Marathi
बापाची मुलीला सासरी जातांना भेट | डोळ्यात अश्रुधारा आणणारा सुंदर लेख || Good Thoughts In Marathi

 

बापाची मुलीला सासरी जातांना भेट |  

डोळ्यात अश्रुधारा आणणारा सुंदर लेख || Good Thoughts In Marathi 

 
नमस्कार मित्रांनो, VB Good Thoughts  या ब्लॉगवर 
आपले पुन्हा मनापासून स्वागत आहे.

 ही पोस्ट वाचल्यावर नक्कीच डोळे ओले होतील….  

 

image Credit

बापाची मुलीला सासरी जातांना भेट

 
 एक मुलगी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या बापाच्या घरी
( माहेरी ) येते. आपल्या माहेर घरी मुलगी पंधरा दिवस अगदी सुखात 
मनासारखे जगते. पंधरा दिवस कसे गेले तिला काही कळत नाही… 
आणि सासरचे तिला घ्यायला यायचे निमंत्रण येते.

आई – वडीलाने सगळी तयारी करून दिली. आणि मुलगी पुन्हा सासरी
जायला निघाली. बापाने मुलीला परत सासरी जात असतांना 
एक धूप – अगरबत्तीचा पॅकेट दिला. आणि मुलीला सांगितले कि
मुली उद्या पूजा करतेवेळी ही धूप लावशील. लक्षात ठेव.

आई ने हे बघितले… त्यावर लगेच बोलली…. आपली मुलगी पहिल्यांदाच
सासरी जात आहे आणि तुम्ही तिला धूप – अगरबत्ती चा पॅकेट देत आहात…. 
काही मोठी वस्तू द्यायला पाहिजे. तसाच बापाने आपल्या खिशात हाथ
घातला आणि जेवढे रुपये होते सर्व आपल्या लाडकीच्या हातात
असलेल्या धूप – बत्तीच्या पॅकेटवर  ठेवले.

सासरी आल्यावर रीतीप्रमाणे सासूने सुनेचे स्वागत केले. घरात
आई –वडिलाने दिलेल्या सगळ्या वस्तू बघितल्या आणि वडिलांनी
दिलेला धूप-बत्ती पॅकेट बघितल्यावर तोंड वाकडे केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी पूजेला बसली आणि तिने बाबाने दिलेला
धूप-बत्तीचा पॅकेट उघडला.त्या पॅकेटच्या आत एक पत्र होते.

त्या पत्रात लिहिलेले होते की…. मुली हा धूप स्वतः जळत असतो…
परंतु संपूर्ण घराला सुगंधी करून जातो. इतकेच नाही तर आजुबाजुच्या
वातावरणाला ही सुगंधीत करून टाकतो.

 मुली तू काही काळनवऱ्यावर रुसशील कधी सासु-सासऱ्यांवर नाखूष 
होशीलकधी न कधीनणंद अथवा जाऊ चे बोलणेऐकून घ्यावे लागणार.
तर कधी शेजाऱ्यांची वागणूक बघून चिडशील…. त्यावेळी हि माझी भेट
नक्की लक्षात ठेव. 
 
धूप-बत्ती जशी स्वतः जळत असतांना संपुर्ण घर
आणि आजूबाजूच्या वातावरणाला सुंगधीबनविते…. 
अगदी तशीच.. मुली तू आपल्या सासरला बनव…

मुलगी त्यापत्राला वाचुन जोरजोरात रडू लागली. 
सुनेचे रडणे ऐकून सासू धावतच पूजा घरात आली. मागोमाग 
नवरा आणि  सासरे देवघरात डोकावून बघू लागले…

ती फक्त जोर जोरात रडत होती. सासू जवळ बसली आणि विचारले…. 
बाळा…! तुझा हात भाजला का…?
ती रडत रडत नाही म्हणाली….

नंतर नवरा म्हणाला….
मग काय झाले आहे ते तरी सांग….

तुला कुणी काही म्हटले का…? सासरे विचारायला लागले.

सासू आजुबाजुचे सामानात काही आहे का ते बघायला लागली.
 तेव्हा वळणदार अक्षरात लिहलेल्या पत्रावर सासूची नजरेला गेली.
ते पत्र वाचताच सासूने ते पत्र आपल्या नवऱ्याच्या हातात देवून
सुनेला स्वतःमिठीत घेतले.

सासऱ्याने, चष्मा नसल्यामुळे ते पत्र आपल्या मुलाच्या हातात दिले.
आणि बोलले बघ तर काय आहे या कागजात….
सगळी गोष्ट समजताच संपूर्ण घरचे एकदम  स्तब्ध झाले.

स्तब्धता तोडत सासू म्हणाली…. अरे या पत्राला फ्रेम कर…
 माझ्या मुलीला मिळालेली ही सर्वात महागडी अशी भेट आहे.
 
देवघराच्या बाजुलाच याची फ्रेम लाव.  सासूबाई म्हणाली.

आणि त्यानंतर ती फ्रेम धूप-बत्ती चा पॅकेट संपला तरीही…..
नेहमी सुगंध पसरवत राहीली….  यालाच संस्कार म्हणतात.
 
 

संस्कार || सासरी जातांना मुलीला बापाने दिलेली अनमोल भेट || Good Thoughts In Marathi On Life || sunder vichar || VB Good Thoughts || suvichar marathi

 

 

संस्कार | Sunder Vichar Marathi | आवडलेला सुंदर विचार

 

एकदा बघा डोळे नक्कीच पानावतील | Good Thought

 

 

 

                

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here