बाप मुलीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काही ही करेल – सुंदर विचार

0
95
बाप मुलीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काही ही करेल...! - सुंदर विचार-marathi-suvichar-vb-good-thoughts

बाप मुलीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काही ही करेल…! सुंदर विचार

वाचल्यावर नक्कीच तुमचे डोळे पाणावतील….

बाप मुलीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काही ही करेल...! - सुंदर विचार-marathi-suvichar-vb-good-thoughts
बाप मुलीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काही ही करेल…! – सुंदर विचार

 

एका संध्याकाळची तरी अंदाजे आठ वाजलेले होते. हॉटेलमध्ये आम्ही तीन मित्र

बसून चहा घेत होतो.

 

आमच्या समोरील दुसऱ्या टेबलवर एक व्यक्ती आणि दहा वर्षांची मुलगी बसलेली होती.

त्या व्यक्तीचा शर्ट ही फाटका होता. शर्ट ची वरची दोन बटने गायब होती.

मळकी पँट, थोडी फाटकी रस्ता खोदणारा वेठबिगार असावा.

पण मुलीनी छान दोन वेण्या घातलेल्या होत्या. फ्रॉक जरा धुतलेला वाटत होता...

तिच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद आणि कुतूहल होता. 

ती सगळीकडे डोळेमोठ्ठे करून फडफडत पाहात होती… 

 

डोक्यावर थंडगार हवा सोडणारा पंखाखाली बसायला गूबगूबीत सोफा 

ती अगदी सूखावलीच वेटरने दोन स्वच्छ ग्लास थंडगार पाणी ठेवले

 

त्या व्यक्तीने वेटरला मुलीसाठी एक डोसा आना असे सांगितले…

मुलीचा चेहरा तर अजून खुलला.

 

वेटर म्हणाला… आणि तुमच्यासाठी काय आणू…?

नाही… नाही… मला काही नाही…!

 

डोसा आला चटणी सांबार वेगळागरमागरम मोठ्ठा फूललेला

मुलगी डोसा खाण्यात गुंग होती आणि तो आपल्या मुलीकडे कौतुकाने

पाहता पाहता पाणी पीत होता…! तेवढ्यात त्याचा फोन वाजला….

साधा फोन होता. आजकालच्या भाषेत त्याला डब्बा फोन म्हणतात.

फोन वर आवाज बरोबर येत नव्हता म्हणून त्याने फोन स्पीकरवर केले.

मग तो मित्राला सांगत होताआज मुलीचा वाढदिवस आहे…! म्हणूनच तिला

हॉटेलात घेऊन आलो आहे…!

 

जर शाळेत तुझा पहीला नंबर आला तर मी तूझ्या वाढदिवसाला हॉटेलात

मसाला डोसा खायला घालीन असे म्हणालो होतो

ती डोसा खात आहे…!

 

मित्र, छान… छान… अरे तू काय खात आहेस…?

मी काहीही बोलावले नाही रे…

दोघांना हॉटेलमध्ये खायला कुठे परवडणार आहे…!

 

घरी पिठले भात आहे माझ्यासाठी…!

त्याचे हे बोलणे एकून मी स्तब्धच झालो….

 

बाप कसा हि असो… श्रीमंत असो किंवा गरीब….

बाप मुलीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काही ही करेल…!

 

मी काऊंटरवर चहाचे आणि त्या दोन डोस्याचे पैसे भरले आणि सांगितले…

अजून एक डोसा आणि चहा त्या टेबलावर पाठवा...!

जर पैसे नाहीसे विचारले तर त्यांना असे सांगा की…आज तुमच्या मुलीचा

वाढदिवस आहे नातुमची मूलगी शाळेत पहिली आली नां….

आम्ही तुमचे सगळे बोलणे ऐकलेले आहे…! म्हणुन आमच्या हॉटेल कडून

खासअसाच अभ्यास कर म्हणावे….! ह्याच बिल नाही….!

पण पण… कृपाकरून फुकट हा शब्द वापरु नका

 

त्या बापाचा स्वाभिमान मला दुखवायचा नव्हता…!

 

आणि अजून एक डोसा त्या टेबलवर गेला मी बाहेरून बघतच होतो

बाप थोडा कावराबावरा झाला आणि म्हणाला

मी एकच डोसा म्हणालो होतो…!

 

तेव्हा हॉटेल चे मॅनेजर म्हणालेअहो तूमची मूलगी शाळेत पहिली आली

हे आम्ही ऐकलेले आहे… म्हणून आमच्या हॉटेल कडून तुम्हा दोघांना फ्री…!

 

बापाच्या डोळयांत पाणी आले…!

मुलीला म्हणाला बघ असाच अभ्यास केलास तर काय काय मिळतय…!

बाप वेटरला म्हणालाहा डोसा बांधून दयाल कां…?

मी आणि माझी बायको दोग बी अर्धा-अर्धा खाऊ

तिला कुठे असे खायाल मिळतेय…!

आणि आता माझ्याही डोळयांत खळ्ळकन पाणी आले… !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here