बायकोच्या कष्टाची जाणीव | बायकोवर सुंदर विचार | baayko, wife

2
1209
बायको-bayko-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-vb-good-thoughts-in-marathi-on-wife
बायको-bayko-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-vb-good-thoughts-in-marathi-on-wife

बायकोच्या कष्टाची जाणीव | बायकोवर सुंदर विचार | baayko, wife

माझ्या बायकोला घरी पोळ्या करण्यासाठी बाई ठेवायची इच्छा झाली.
म्हणून तिने एका बाईला विचारले…

त्या कामवाल्या बाईने हो किंवा नाही सांगण्याआधी एक प्रश्नावलीच
समोर ठेवली.
घरात किती लोकं आहेत…?
पोळ्या एक वेळ बनवायचे आहे का दोन्ही वेळा…?
एकूण तुम्हाला किती पोळ्या करवून घ्यायच्या आहेत…?

तिला तिच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरे दिल्यावर ती म्हणाली…
एक वेळ येणार आणि १२ पोळ्या बनविणार…
महिन्याचे ८०० रूपये घेणार…
बायको तिला मी विचार करून सांगतो म्हणाली…

बायकोवर सुंदर विचार

ती गेल्यावर माझ्या बायकोने हिशोब केला तर
तिच्या असे लक्षात आले की मागिल
१४-१५ वर्षात आपण ८-१० लाख रुपयांच्या
फक्त पोळ्याच लाटल्या आहेत.

बायकोच्या कष्टाची जाणीव

मित्रानो,
हे वाचल्यावर नक्की तुम्हाला हसू येईल. हरकत नाही
पण नंतर लक्षात येईल की… आपण नकळत का होईना
किती दुर्लक्ष करत असतो घरच्या स्त्री च्या कामाकडे….

हे झाले केवळ पोळ्याचे गणित…!
याच हिशोबाने कपडे धुण्यासाठी कामवालीला किती द्यावे लागले असते…
घर सफाई… भांडे धुणे व इतर कामे… या सगळ्याचा हिशोब केला तर
डोकेच कामातून जाईल रे बाबांनो…!

ज्यांच्या घरी अशा हाऊसवाईफ आहेत त्यांनी तर विचार करावाच.
पण ज्यांच्या घरी बायको, घर आणि नोकरी
असे दुहेरी भूमिका करते… त्या नवऱ्यांने तर जरूर जाणीव ठेवावीच…!

जर तुम्हाला जाणीव झाली म्हणजे आजच आता ही पोस्ट वाचून
घरी गेल्यावर आपल्या पत्नीची सेवा करावी…
तिला कांदे भाजी चिरून द्यावी असे नाही….

पण कमीत कमी मला तुझ्या कष्टाची जाणीव आहे…
हे तरी तिच्यापर्यंत पोचले तरी तिला ते पुरेसे होईल…!

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here