बायकोवरचे प्रेम म्हणजे नक्की काय…? | Sunder Vichar | Bayko

1
933
बायकोवरचे प्रेम म्हणजे नक्की काय...? | Sunder Vichar | Bayko
nawara-bayko-prem-sandesh-suvichar

बायकोवरचे प्रेम म्हणजे नक्की काय…?
Sunder Vichar | Bayko

बायकोच्या घाई गडबडीत मदत म्हणून
सकाळी सकाळी नवरा स्वतः डब्यातल्या
पोळ्या भरतांना
त्याच्या बोटाला लागलेला चटका  आणि बायकोने
त्यावर मारलेली फुंकर आणि हे बघून
हळवा झालेला नवरा…!
म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!
घरातील पाहुणे मंडळी गेल्यावर
नवरा सुद्धा थकला असूनही
बायकोला आवरा आवर करू लागणे
म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!
बायको आजारी असल्यावर…
आपण आज मस्त खिचडी भात खाऊया
म्हणणे आणि जेवल्यावर सर्व भांडे स्वतः उचलून
बेसीन मध्ये ठेवणे… पाण्याच्या बॉटला भरने
म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!
ऑफिस मध्ये
लंच झाल्यावर मित्रांमध्ये जेवतांना…
ती जेवली असेल का…?
म्हणून बायकोला फोन करूनच
नंतर नवऱ्याने जेवण करणे
म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!
ऑफिसमधून संध्याकाळी येतांना
गिरणीतले दळण घेऊन येणे
आणि काही भाजीचा आणू का…?
असे बायकोला फोन करून विचारणे
म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!

बायकोवरचे प्रेम म्हणजे नक्की काय…?
Sunder Vichar | Bayko

सुट्टीच्या दिवशी आज तुला सुट्टी म्हणत…
बायको उठायच्या अगोदर
दाराबाहेरचा सकाळचा पेपर…
दूध स्वतः घेणे आणि
बायकोसाठी चहा बनवणे
म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!
बाहेर पडल्यावर गर्दीत
बायकोचा हात नवऱ्याच्या हातात
अजूनच घट्ट – घट्ट होणे
म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!
यायला उशीर झाल्यावर बायको जेवायला
थांबली असतांना… पहिला घास आपल्या
बायकोला भरवने म्हणजे सुद्धा
बायकोवरचे प्रेमच…!
ती धडपडल्यावर बायकोला ओरडून…
स्वतः हळवे होणे म्हणजे सुद्धा
बायकोवरचे प्रेमच…!
कधी बायको वैतागलेली असतांना शांत राहने…
आणि ती रडवेली झाली की… सगळा राग विसरून
तिला मिठीत घेणे म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!
वयाच्या साठव्या वर्षी सुद्धा
बायकोच्या औषधांचा वेळ जपणे…
आणि बायको झोपल्यावर
तिचे पांघरून सावरून नंतरच
नवऱ्याने झोपणे म्हणजे सुद्धा
बायकोवरचे प्रेमच…!

बायकोवरचे प्रेम म्हणजे नक्की काय…?
Sunder Vichar | Bayko

प्रत्येक वेळी बोलून दाखवल्यावरच
प्रेम सिद्ध होत असते असे नाही आहे…
प्रेमाच्याही पलीकडे असते
ती काळजी…. माया…!
बायको तर असतेच महान जी निःस्वार्थपणे
आयुष्यभर नवऱ्याची साथ देते.
पण नवरा म्हणजे तिच्या आयुष्यातला तो
ऑक्सिजन आहे जो तिच्या सोबत असतो
आयुष्याच्या शेवट पर्यंत…!

Also Read :-

बायकोच्या कष्टाची जाणीव | बायकोवर सुंदर विचार

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here