बायकोवर कविता | बायको सुविचार | बायको साठी प्रेम संदेश | Bayko
बायकोवर-कविता-बायको-सुविचार-bayko-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-vb-good-thoughts |
जगात हजारों नाती तयार करा पण…
त्या हजारों नात्यांमध्ये एक नाते,
असे तयार करा की…
जेव्हा हजारों विरोधात जातील तेव्हा…
ते एक नाते तुमच्या सोबत असेल…!
ते म्हणजे बायको.
आज त्यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झालेत. २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
एकमेकांना देत… चालत आहेत. नवऱ्याने आपल्या प्रिय बायकोचा हात हातात घेऊन
चालता चालताच म्हणाला,
अनिता, मला एकदा तुझे जवाबदारी चे बूट घालून चालायचे आहे.
अनिता म्हणाली…
नको रे, सोपे नाही आहे ते…
तू तुझे कष्ट झेलतोच आहेस… आणि
आपला जीवनाचा प्रवास ही खुप सुखात चालला आहे.
तो खुप हट्ट करायला लागला…
त्याचा हट्ट म्हणून तिच्या बुटा मधला त्याचा प्रवास सुरु झाला.
हिरवळी वर चालता चालता
अचानक त्याला काही खडे टोचू लागले.
करियरसाठीचा विरोध…
नोकरीची वणवण…
लग्न ठरल्यावरची द्विधा…
माहेर सुटल्याचे दुःख…
आयुष्याचा संघर्ष…
त्याचा पायाला जाणवू लागला.
गरोदर पणातील अस्वस्थता
बाळंतपण… त्रास आणि नंतर तो गोंडस स्पर्श…
रात्रीचे जागरण… नोकरीतली ओढाताण…
तरीही तिने नेहमी त्याच्यासाठी
सुंदर दिसण्याचा केलेला प्रयत्न…
त्याच्यासाठी वेळ काढायची तिची धडपड…
कधी टोमणे… तर कधी कौतुक… जबाबदाऱ्यांचे ओझे
जाणवत होते थोडे थोडे.
फक्त तिचेच बूट घालून सुद्धा काही अव्यक्त सल देखील आता टोचत होते पायाला,
कधी चटके देखील बसले…
त्याला असह्य झाल्याने त्याने झटकन बूट काढून टाकले आणि म्हणाला,
कसे चाललीस तु एवढे…?
अनिता हसली… म्हणाली… फक्त तुझ्यासाठी…
आपल्या लेकरासाठी… आपल्यासाठी… आपल्या संसारासाठी…!
बायकोवर कविता – बायको सुविचार – bayko – सुंदर विचार – Good Thoughts In Marathi
बायकोवर-कविता-बायको-सुविचार-bayko-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-vb-good-thoughts |
बायकोवर कविता – बायको सुविचार – bayko – सुंदर विचार- Good Thoughts In Marathi
बायको या शब्दाला फोडले तर…
“बा” म्हणजे तुमच्या बाजूने भक्कमपणे उभी राहणारी.
“य” म्हणजे येईल त्या परिस्थितीला तोंड देणारी आणि
“को” म्हणजे कोणासाठी नाही तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी…!
सुख-दुःखात साथ देणारी, म्हणून तिला बायको असे म्हटले जाते.
बायको म्हणजे एक संसारासाठी सतत तेवणारी ज्योत असते.
बायकोवर-कविता-बायको-सुविचार-bayko-सुंदर-विचार-Good-Thoughts-In-Marathi-vb-good-thoughts |
पत्नी पती साठी…
कारण संसाराचा धावा जमवण्यात,
तुम्ही कधी युवराज सिंग तर कधी विराट कोहलीची
आणि हेचअंतिम सत्य ही आहे.
तर पती पत्नी साठी…
प्रगतीच्या धावांचा तक्ता हलतोय
कायम प्रेरणा देते.
[…] नावाचे वादळ | बायकोवर कविता | Bayko Suvichar | […]