बोधकथा मराठी – मदतीची साखळी – Marathi Bodhkatha
हायवे वरून एक स्त्री आपल्या महागड्या कारने शहराकडे जात असते.
रस्त्यावर अचानकपणे तिची कार बंद पडते.
आकाश ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त
करण्याची काहीच माहिती नसते. ती आजूबाजूला मदत करण्यासाठी कुणी तरी आहे का
म्हणून पाहते… पण तिला कुणीही तिथे दिसत नाही.
ती स्त्री मदतीसाठी इतर गाडयांना हात दाखविते पण कोणताच गाडी चालक गाडी थांबत नाही.
खूप वेळ जातो… आता मात्र स्त्री घाबरते आणि डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात.
तेवढयात धनपाल नावाचा माणूस तिच्या जवळ येतो . त्याला पाहून ती स्त्री प्रथम तर घाबरून जाते.
पण धनपाल म्हणतो घाबरू नका ताई… मी प्रयत्न करून पाहतो… आणि गाडी दुरूस्तीच्या
कामाकडे वळतो.
मदतीची साखळी – बोधकथा मराठी
काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची गाडी सुरू होते. ती स्त्री धनपाल ला खूप खूप धन्यवाद देते.
आणि धनपाल ला म्हणते ” माझी खूप मोठी समस्या तुम्ही सोडविली आहे… सांगा, मी या बदल्यात
तुम्हाला किती रुपये देऊ…?
” तेंव्हा धनपाल म्हणतो…. काही नको…. खरेतर हे माझे काम नव्हतेच मी तर तुम्हाला मदत केली.
मलाही एका माणसाने मदत केली होती आणि त्याचा कोणताही मोबदला त्यांनी न घेता आपणही
इतरांना अशीच मदत करा असे सांगितले आणि मी ही आपणास मदत केली.
तुम्हीही अशीच मदत करा. हाच माझा मोबदला समजा. हे ऐकून त्या स्त्रिला खुप छान वाटले
आणि तिनेही हसत मी ही अशीच मदत नक्की करेन असे वचन देऊन हसतमुखाने निरोप घेऊन
निघून गेली.
तसा खूप वेळ प्रवास व थकव्यामुळे तिला भूक लागली होती. तिने एका हॉटेल जवळ जेवण्यासाठी कार
थांबविली आणि हॉटेलमध्ये जाऊन जेवणाची ऑर्डर दिली.
जेवण टेबलवरती येण्यास थोडा वेळ लागणार होता. ती स्त्री आता जरा निश्चिंत झाली होती आणि सहजच
हॉटेल मधील शो पीस , सुंदर टेबल, स्वच्छतेकडे व उत्साहाने व हसतमुखाने सेवा देणाऱ्या वेटरकडे पाहू
लागली . तेवढयात तिचे लक्ष तिला सेवा देणाऱ्या एका उत्साही लेडी वेटरकडे गेले.
ती हसतमुखाने त्या स्त्री सेवा देत होती. ती वेटर ७ महिन्याची गरोदर आहे हे त्या स्त्री ने समजून घेतले
आणि लगेच तिच्या मनात विचार आला आपण हिला मदत करायलाच हवी.
हिला सध्या पैश्याची खूप गरज असणार म्हणूनच ती गरोदर असतानाही काम करत आहे. तिने आपल्या
पर्समधून काही नोटा व एक चिठ्ठी लिहून पॉकेट मध्ये ठेवली. जेवण झाल्यानंतर बील रक्कम व टिप
म्हणून एक पॉकेट त्या स्त्री ने त्या वेटरच्या हातात दिले. काउंटरला तिने बिल दिले व पॉकेट उघडून
पाहिले तर… त्यात एक चिठ्ठी व काही नोटा होत्या, तिने चिठ्ठी वाचली तर त्यात लिहीले होते…
तु खूप उत्साही आहेस, गरोदर असूनही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देते.
बोधकथा मराठी – मदतीची साखळी
तुला खरे तर आराम करायला हवा पण तुला पैश्याची खूप गरज असल्याने तू काम करत आहेस .
मलाही अशीच एका माणसाने मदत केली म्हणून मी तुला मदत करत आहे. तु ही अशीच मदत कर.
मदतीची ही साखळी तोडू नकोस. तिने त्या पॉकेटातील नोटा मोजल्या तर त्यात चक्क दहा हजार रुपये
निघाले. एवढी मोठी रक्कम पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने मनोमन त्या मदत करणाऱ्या
स्त्री ला धन्यवाद दिले.
तिची कामाची शिफ्ट संपल्यानंतर ती घरी गेली. घरी तिचा नवरा नेहमीसारखाच चिंतातूर होऊन
काळजी करत होता. ती नवऱ्याजवळ त्याच्या मिठीत गेली व म्हणाली आता माझ्या डिलेव्हरीची
काळजी करू नका… आज मला एका स्त्री ने खूप मदत केली आहे. घडलेला प्रसंग सांगितला…
दोघांनाही खूप आनंद झाला.
तो काळजी करणारा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून तो असतो धनपाल…!
ह्यालाच म्हणतात ‘ क्रिया तशी प्रतिक्रिया ‘
मित्रांनो,
नैसर्गिक न्याय तत्व असतेच… आपण जे इतरांना दयाल तेच आपल्याला परत मिळते.
आपणच जर दुसऱ्याला दुःख दिले, त्रास दिला तर आपल्या ला दुःख आणि त्रासच मिळणार.
मदतीची साखळी – बोधकथा मराठी
आपण जर दुसऱ्याला नेहमी मदत केली, सुख दिले आनंद दिला तर आपल्यालाही
आनंद आणि सुख मिळणारच. आपल्यालाही नेहमीच इतरांकडून मदतच मिळणार.
कितीही संकटे जिवनात आली तरी मदतीला अगणित हात धावून येणार हे मी छातीठाकपणे सांगतो.
म्हणून आपण नेहमीच दुसऱ्यांना सुख, आनंद देऊया मदत करु या… आपल्यालाही तेच मिळेल जे
आपण दुसऱ्याला देऊ….
सुख , आनंद, मदत दया आणि सुख, आनंद, मदत मिळवा हेच तर आहे नैसर्गिक न्याय तत्व अर्थातच
” क्रिया तशी प्रतिक्रिया ”
मदतीची साखळी
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी
लांबलेला एक हात ….
प्रार्थनेसाठी जोडलेल्या
दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.
नेहमी कुणाची तरी मदत करत जा
कदाचित तुम्ही असे एकच आहात….
जे मदत करू शकतात….!
कुणाची मदत करत असतांना
त्याच्या डोळ्यात बघू नका…
कारण त्याचे झुकलेले डोळे
तुमच्या मनात
गर्व निर्माण करू शकतो.
आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी
नेहमी कृतज्ञ रहा.
जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे
“सल्ला”
एका कडे मांगा हजार जन देतील.
जगातील सर्वात महाग वस्तु म्हणजे
“मदत”
हजार जणांकडे मागा
कदाचित एखादाच करेल….