ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ
आणि विविध फायदे
अळू :- ( शास्त्रीय नाव – Colocasia esculenta, कलोकेशिया एस्क्युलेंटा ,
इंगलिश – Taro, टॅरो ) ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अरॅशिए सुरण कुळातील
वनस्पती आहे. अळू हा बारमाही उगवणारा असून, याची पाने आणि कंद
खाण्यासाठी उपयुक्त मानले जातात. तसेच अळू ही एक औषधी वनस्पती ही मानली
जाते. आपल्या महाराष्ट्रीयन लग्नसमारंभांत याच्या पानांची पातळ भाजी करतात.
त्या भाजीला कोंकणात अळूचे फदफदे असे म्हणतात. गोंदिया आणि भंडारा
जिल्ह्याल अळूच्या पानांना कोचई किंवा घुया असे म्हणतात. अळूच्या पानांवर
बेसन आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून वाफेवर उकडतात.
नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. या वड्यांना गुजरात मध्ये पात्रा म्हणतात.
ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ आणि विविध फायदे
![]() |
ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ आणि विविध फायदे |
अळू चे भाजीचा अळू , वडीचा अळू आणि शोभेचा अळू असे
तीन मुख्य प्रकार आहेत.
अळूचाच एक प्रकार आमच्याकडे ज्याला ब्रह्मरक्षस म्हटले जाते हा पण एक
अळूचाच प्रकार आहे.. साधारणतः ओल्या मातीच्या पाण्याच्या ठिकाणी
हा खूप पसरतो.
ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ आणि विविध फायदे
जर का एखादा मोठा प्लास्टिक टबात एकदा चार पाच कंद ( बुड ) लावले तर
नेहमीच आठ – दहा दिवसात २०-२५ पाने आरामात मिळतात...
एकदा बुड लावले की तेच वर्षानुवर्षे पाने देत राहतात. अळूची पाने गळ्याला
खाजवतात परंतु त्यामानाने ब्रम्हराक्षसची पाने अजिबात खाजवत नाही...
अळूचे देठ हिरवे असते तर ब्रम्हराक्षसचे देठ हा काळपट कथ्था असतो...
ह्या पानांची वडी खुसखुशीत बनते.
त्या गोलाकार कापून तळून खायची वेगळीच मजा... पानाचे बेसन पिठाचे मुट्ठे
बनवून त्याचा फोडणीचा खुरमुराही छान लागतो... तर लांब वड्यांची रस्सेदार
भाजी करू शकतो, तसेच त्याची देठे सोलून कापून चटणी देखील
खूप स्वादिष्ट वाटते.
पाने तोडतांना थोडा काळजीपूर्वक तोडावीत… कारण पानातून निघणारा
द्रव पदार्थ कपड्यांना लागला तर तो निघत नाही आणि कपड्यावर
डाग पडतो.
ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ आणि विविध फायदे
![]() |
ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ आणि विविध फायद
ब्रह्मराक्षस अळू च्या पानांचे फायदे खूप आहेत.
अळू ची पाने पावसाळ्यात खूप प्रमाणात उपलब्ध असतात. तसे हे दिवाळी पर्यंत
आरामात मिळतात. अळूचे फदफदे, ऋषीपंचमीला केली जाणारी अळूची भाजी,
कुरकुरीत अळूवड्या अशा वेग वेगवेगळ्या स्वरूपात आपण अळू ला आहारात
समाविष्ट करतोच.
अळू च्या पानांमध्ये एक प्रकारची खाज असते. म्हणून खुपजण याला खाण्याचे
टाळतात. परंतू जर का आपण त्यामधील हे आरोग्यदायी गुणधर्म जाणून घेतला तर
त्याची चव घेण्याचा मोह तुम्हांलाही आवरता येणार नाही.
म्हणूनच आहारतज्ञ कांचन पटवर्धन यांनी अळूचा आहारात समावेश करण्यामागील
दिलेली ही काही कारणे नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन ए चा भरपूर साठा :-
अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळते. सुमारे १०० – २०० ग्रॅम
अळूमधून व्हिटॅमिन ए ची दैनंदिन गरज पूर्ण होण्यास मदत होते.
अळूमध्ये १२० % व्हिटॅमिन ए आढळते. यामुळे त्वचा टवटवीत होण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी चा पुरवठा होतो :-
फक्त आंबट पदार्थांमध्येच व्हिटॅमिन सी आढळते हा समज दूर करून अळूचा
आस्वाद घ्या. कारण अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी चा सुमारे ८०% साठा असतो.
त्याचा फायदा जखम भरून निघण्यास होतो. तसेच हिरड्यांचे आरोग्य सुधारते.
व्हिटॅमिन सी ची दैनंदिन आवश्यकता पूर्ण होईल काही पैशातच…
शरीरातील आयर्नची कमतरता दूर होते :-
शरीरातील रक्ताच्या कमीपणाने वाढणारा अॅनिमियाचा त्रास थांबवण्यास अळू
खूप मदत करते.
अळूमध्ये व्हिटॅमिन सी उपलब्ध असल्याने शरीराची आयर्न शोषून घेण्याची
क्षमता सुधारते.
शरीरात कॅल्शियमचा पुरवठा करते :-
अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम चे घटक आढळतात. त्याचा फायदा हाडांची कमजोरी
कमी करण्यास मदत होते. वाढत्या वयानुसार हाडांची होणारी झीज कमी होते.
डोळ्यांना फायदा :- अळूच्या पानांचे सेवन केल्यामुळे नजर सुधारायला मदत होते.
त्याचप्रमाणे डोळ्यातील शुष्कपणाच्या दूर होऊन डोळ्यातील ओलावा वाढण्यासाठी
चांगली मदत होते.
अळूच्या पानांमधील आयोडीन घटक थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुरळीत ठेवण्यास
मदत करते.
अळू च्या पानात अनेक गुणधर्म असल्याने अनेक आजारांचा बचाव होतो.
आता आपण बघूया की…
ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ आणि विविध फायदे
आपल्या आहारात अळूचा समावेश कसा करता येईल…?
अळूच्या पानांमध्ये केवळ फायबर असतो पण जर याच्या सोबतीला डाळीचा
समवेश केला तर प्रोटीन्सचा ही पुरवठा होतो. त्यामुळे हे एक उत्तम आणि
परिपूर्ण आहार बनते. अळूवडीतही बेसनाचा समावेश असल्याने त्या अधिक
रूचकर आणि आरोग्यदायी बनतात.
अळू वडी प्रमाणेच त्याची पातळ भाजी बनवता येऊ शकते. यामध्ये अळूची पाने
डाळीसोबत शिजवून त्याचा आहारात समावेश करा.
अळूचा आहारात समावेश करताना कोणती काळजी घ्यावी…?
अळूचे पान आणि कंद यात खाज असल्याने तो स्वच्छ करून या मध्ये
आंबट वस्तूचा जास्त उपयोग करावा जेणेकरून त्यामधील खाज
पूर्णपणे निघून जाईल.
साभार 👏
![]() |
ब्रह्मराक्षसची (अळू) पाने त्याचे पदार्थ आणि विविध फायदे |
Suvichar | जीवनावर आधारित प्रेरणादायी सुंदर विचार
25+ Best Marathi Suvichar | सुविचार मराठी