भगवंताची भेट | Good Thoughts Marathi |
सुंदर विचार |Suvichar
एका लहान मुलाच्या मनात आले कि आपण भगवंताची भेट घ्यायची
एक दिवस मन पक्के करून मुलगा कोणालाही काहीही न सांगता
एक लहानसी पिशवी त्यात एक पुरणपोळी आणि आंब्याचे रस
घेऊन घराबाहेर निघाला.
थोडा लांब गेल्यावर त्याला रस्त्याच्या बाजूला एक बाग दिसली,
त्या बागेत तो गेला, इकडे तिकडे बघितल्यावर त्याला एक म्हातारा माणुस
बागेच्या कोपऱ्यात बनलेल्या छोट्याश्या देऊळ कडे सतत बघतांना दिसला.
मुलगा ही त्याच्या शेजारी जाऊन बसला आणि दोघे हि त्या छोट्याश्या
देवळाला बघायला लागले, काही वेळाने मुलाला भूक लागली म्हणुन
त्याने पुरणपोळी खाण्यासाठी बाहेर काढली.
पुरणपोळी हातात घेतल्यावर त्याच्या लक्षात आले कि म्हातारा माणुस त्याच्याकडे
बघत आहे, मुलाला वाटले की यांनाही भूक लागली आहे म्हणून त्याने आपल्या
जवळील अर्धी पुरणपोळी म्हाताऱ्याला देण्यासाठी हसत हसत आपला हाथ पुढे केला
म्हाताऱ्यानेही हसत हसत घेतला.
भगवंताची भेट | Good Thoughts Marathi |
सुंदर विचार |Suvichar
पण म्हाताऱ्याचे हसणे मुलाला खूप पवित्र वाटले आणि त्याला एक वेगळाच
आनंद झाला. मुलाला वाटायला लागले हे बाबा पुन्हा हसावेत म्हणुन त्याने
आपल्या जवळील रस देऊ केला, म्हातारा पुन्हा हसला…!
या हसण्याने मुलाला एक वेगळाच आनंद मिळाला, ते दोघेही एकमेकाशी
काहीही न बोलता तसेच त्या दोघांनी हसत हसत सोबत जेवन केला.
हळू हळू दिवस मावळायला लागला, मुलाचाही विचार बदलला.आता त्याने ठरवले की
पुढे कुठेही न जाता आपण आपल्या घरी जावुया.
आपली रिकामी पिशवी घेऊन मुलगा निघायला लागला तोच म्हाताऱ्याने
त्याला गोड मिठी मारली. या वेळी तर मुलाला खुपच आनंद झाला.
तो आनंद घेऊन मुलगा घरी पोहचला, मुलाची आई त्याचा हा रूप पाहून
दंग झाली, कारण तिने यापूर्वी आपल्या मुलाला एवढे आनंदी कधीच
बघितले नव्हते.
भगवंताची भेट | Good Thoughts Marathi |
सुंदर विचार |Suvichar
आई काही विचारच्या अगोदरच मुलगा सांगायला लागला. म्हणाला…
“आई मी आज भगवंताच्या सोबत जेवण केला.” तुला माहित आहे का आई…!
भगवंताचे हसणे जगात सगळ्यात सुंदर आहे.
तसेच ते म्हातारे ही आनंदात आपल्या घरी पोहचले, त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच
तेज चमकत होता आणि चेहरा अगदी शांत होता, चेहऱ्यावरील शांतता पाहून
म्हाताऱ्याच्या मुलाने विचारले…. बाबा… आज काय झाले… खूप आनंदी दिसता…!
एवढे आनंदी तर मी तुम्हाला कधीही बघितलेला नाही.
म्हातारा म्हणाला… आज मी भगवंताच्या सोबत पुरण पोळी खाल्ली,
आणि तुला माहित आहे का…! भगवंत वयाने खूपच लहान आहे.
हे ही वाचा :-
Marathi Suvichar | १००+ सुंदर मराठी सुविचार | Marathi Quotes