मराठी बोधकथा – भगवंताचा शोध – Marathi Kahani | Moral Story
एक लहानसा मुलगा, त्याने असे ठरवले आहे की, आज त्याला भगवंता बरोबर जेवायचे आहे.
काही खाण्याच्या वस्तू आणि पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन तो भगवंताच्या शोध घेण्यासाठी
घराबाहेर पडला.
चालता चालता रस्त्याच्या बाजूला त्याला एक बाग दिसली. तो त्या बागेत गेला. त्या बागेत
काही लोक होती. कुणी बसलेले होते तर कुणी हलके व्यायाम करीत होते.
मराठी बोधकथा
त्याला समोर बसलेले एक आजोबा दिसले आणि त्यांच्या बाजूला एक बाक रिकामे होते.
तो मुलगाही चालून चालून थकलेला होता… म्हणून थोडी विश्रांती घेण्यासाठी
त्या बाकावर जाऊन बसला.
ते जवळचे आजोबा सतत मुलाकडे बघत होते… मुलाचे लक्षही त्या आजोबा कडे गेल्यावर
मुलाला वाटले की या आजोबांना तहान लागलेली आहे आणि यांच्याकडे पाणी नाही आहे…
म्हणून त्याने जवळचे पाणी त्यांना दिले. ते पाणी प्याले आणि बाटली परत देतांना हसले…
इतके सुंदर हसणे तो पहिल्यांदाच बघत होता. नंतर त्याने त्यांना खाऊ दिला…
ते परत तसेच हसले…त्यांचे ते हास्य बघुन तो मोहुन गेला…
भगवंताचा शोध
तो उठला. दिवस सरत आला होता. आता त्याला घरी परतायचे होते.
तो तिथून निघाला. थोडे पुढे गेला… वळून पाहिले तर ते आजोबा गोड हसत होते…
तो धावत त्यांच्याकडे आला. त्यांना मिठी मारली. आजोबानेही लाडाने त्याला
कुशीत घेतले. घराच्या दिशेने तो निघाला. घरी पोचला.
आज तो खूपच खुश दिसत होता.
आईने विचारले तसा तो म्हणाला,
देव कितीतरी थकला होता आई…!
भुकेला, तहानेलाही होता. तरी खूप गोड हसत होता.
Marathi Kahani
इकडे ते आजोबा घरी पोहोचले….
केवढे आनंदी…! केवढे तृप्त…! रोजचा शीण नव्हता.
एकटेपणाची बोच नव्हती.
त्यांच्या मुलाला सारेच अनपेक्षित होते.
कुठे होतात बाबा दिवसभर…?
त्याने आपल्या वडिलांना विचारले. त्याचे बाबा दैवी तंद्रीतच होते…! म्हणाले….
मला वाटत होते त्यापेक्षा खूप तरुण आहे देव…! तरुण कसला….? बालकच…!
न मागता मला सारे दिले. प्रेमाने मिठीही मारली…!
आजोबांच्या देहावर वसंत ऋतू अवतरला होता.
केवढा आनंद…! केवढी तृप्ती…! केवढे समाधान…!
ही लहानशी गोष्ट मी वाचली आणि दिवसभर त्या मुलाचा आणि म्हाताऱ्या आजोबाचा
चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत राहिला.
Moral Story
सारे अध्यात्म एक छोट्याशा गोष्टीत ठासून भरल्याचे मला जाणवले.
हजार धर्मग्रंथांचे सार एकाच गोष्टीत…!
देव माणसाच्या मनात जेवठा असतो…
त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि
आपल्या चांगल्या कर्मातला देव सर्वान दिसत आसतो.