मराठी सुविचार | योग्य दिशा | Sunder Vichar Marathi |suvichar

0
492
मराठी सुविचार | योग्य दिशा | Sunder Vichar Marathi | suvichar

मराठी सुविचार | योग्य दिशा
Sunder Vichar Marathi
suvichar

आयुष्यात वेगापेक्षा… 
दिशा महत्त्वाची आहे.
जर दिशा योग्य नसेल तर… 
वेगाच्या काहीच उपयोग नाही.

एक हष्ट-पुष्ट आणि पिळदार शरीराचा व्यक्ती स्टेशन वर उतरला

आणि त्याने टैक्सीवाल्याला विचारले की… मला साई बाबांच्या

मंदिरात जायचा आहे.

टैक्सीवाला म्हणाला ३०० रुपये लागतील.

त्यावर तो व्यक्ती म्हणाला जवळच तर आहे…

इतक्या जवळ जायचे ३०० रुपये…!

नको – नको असू दे… मी आपले सामान घेऊन स्वत:च जाईन.

तो व्यक्ती आपले सामान घेऊन खूप दूर पर्यंत चालत राहिला.

काही वेळाने त्याला पुन्हा तोच टैक्सीवाला दिसला…

त्या व्यक्तीने टैक्सीवाल्याला विचारले की…

आता तर मी अर्ध्या पेक्षा जास्त रस्ता पार केला आहे.

आता आपण किती पैसे घेणार…?

टैक्सीवाला म्हणाला ६०० रुपये.

तो व्यक्ती टैक्सीवाल्याला म्हणाला की… आधी २०० रुपये

आणि आता एवढे अंतर कापल्यावरही ४०० रुपये…!

हे असे कसे…?

तेव्हा टैक्सीवाला म्हणाला… साहेब, एवढे अंतर आपण

साई मंदिराच्या विरुद्ध दिशेने काढले आहे…!

तो व्यक्ती काहीही न बोलता आपल्या सामानासोबत

गुपचुपपणे टैक्सीत बसला.

मराठी सुविचार | योग्य दिशा | Sunder Vichar Marathi | suvichar

मित्रांनो…

आयुष्यात आपण कोणतेही काम करायच्या

आधी काहीही विचार न करता निर्णय घेत असतो…

आणि हाती घेतलेले काम करण्यासाठी खूप परिश्रम ही

करतो… तसेच त्या कामात खूप वेळ ही घालवतो आणि

शेवटी ते काम अर्ध्यावरच सोडून देतो.

नेहमी एक लक्षात ठेवा की… कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी

पूर्णपने विचार करा, आणि हे काम आपल्या जीवनातील लक्षाचा

एक भाग आहे.

जर आपल्या कामाच्या सुरुवातीची दिशा योग्य असेल तरच आपल्याला

यश मिळणार आणि जर का आपल्या कामाच्या सुरवातीची दिशा योग्य

नसेल तर… आपण कितीही परिश्रम घेतले तरी पण फळ मिळणार नाही.

म्हणूनच योग्य दिशा निवडा आणि परिश्रम करा..

नक्की यश तुमच्याच हातात असेल.

कामाची योग्य सुरुवात म्हणजे अर्धे यश मिळालेच समजा…!

जगा इतके की… जीवन कमी पडेल…
हसा इतके की आनंद कमी पडेल… 
काही मिळेल किंवा नाही मिळेल… 
तो नशिबाचा खेळ आहे…! 
परंतु प्रयत्न इतके करा की… 
भगवंताला देणे भागच पडेल.
Also Read :-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here