मृत्यू वर सुंदर कविता – मराठी छान कविता – Marathi kavita
खूपच छान असेल तो दिवस…
जेव्हा मी कायमचाच झोपणार
आणि मला उठविण्यासाठी….
माझ्या देहाला सजवत होते…
मी पूर्णतः शांत झोपलो होतो..!
अश्रूंच्या धारेने बहुतेक मी…
चिंब – चिंब भिजलो होतो..!
आंघोळ ही शेवटचीच….
परंतु गरम पाण्याने होत होती…!
ज्याला त्याला घाई होती….
डोळे भरून मला पाहण्याची..!
मृत्यू वर सुंदर कविता – मराठी छान कविता – Marathi kavita
माझे पूर्ण बालपण गेले
ज्यांच्या खांद्यावरून
पुन्हा त्यांनीच आज
उचलून घेतले दारावरून
सगळे जवळचेच होते…
कुणीही नव्हतेच तिथे परके….
मोठ्याने म्हणत होते…
नेऊ नका सारखे...!
वेगळेच काहीतरी
आज घडत होते...!
शत्रू चे पण प्रेम माझ्यावर
पडत होते...!
स्मशानभूमीत नेऊन ही…
स्नेह माझ्यावर लुटवत होते...!
मोठ्याने रडून – रडून
सगळेच मला उठवत होते...!
चार लाकडे अजून द्या
म्हणजे इतक्यात भागणार….
कुणीतरी माझ्यानेच विचारले
किती वेळ अजून लागणार….!
सरणावर झोपूनही
मी आपले मौनच पाळले होते...!
जिव लावणारे सगळेच माझे होते…
आज त्यांनीच मला जाळले होते....!
मृत्यू वर सुंदर कविता – मराठी छान कविता – Marathi kavita
Marathi Suvichar | १००+ सुंदर मराठी सुविचार | Marathi Quotes