मैत्री वर मराठी सुविचार – Quotes Of Friendship In Marathi – मित्रता सुविचार

0
948
मैत्री-वर-मराठी-सुविचार-Quotes-Of-Friendship-In-Marathi-mitrata-marathi-suvichar-on-friendship-with-images
मैत्री-वर-मराठी-सुविचार-Quotes-Of-Friendship-In-Marathi

मैत्री वर मराठी सुविचार – Quotes Of Friendship In Marathi – 

                                         मित्रता सुविचार

 

एकदा एका माकडाने… खूप दुःख झाल्यामुळे आत्महत्या करण्याचे 

ठरवले आणि तो सरळ सिंहाच्या गुफेत गेला. 
सिंह झोपलेला होता… माकडाने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले. 
तसाच सिंह रागात गरजला…
एवढी हिंमत कुणी केली… कोण आपल्या मृत्यूला बोलावीत आहे…?माकड म्हणाला… महाराज मी आपले कान ओढले आहे…!

सध्या माझ्याकडे एकही मित्र नसल्यामुळे मी खूप दुःखी आहे… 

आणि मला आता मरण पाहिजे आहे तुम्ही मला खाऊन टाका…
सिंह हसला आणि विचारले : माकडामाझे कान ओढत असतांना 
तुला कुणी बघितले तर नाही ना…?
माकड : नाही महाराज…
सिंह : तर मग ठीक आहेतू आणखी एक दोन वेळा माझे कान ओढ…
खूप बरे वाटले…

या कथेचे सार

 

मित्रांनो…

एकटा राहून जंगलाच्या राजालाही कंटाळा येतोच…! म्हणून  
आपण आपल्या मित्रांच्या नेहमी संपर्कात रहा… आणि आपल्या 
मित्रांचे सतत कान ओढत रहा 

 ग्रुपवर चॅटींग करा व्यक्तीगत चॅटींग करा 

खुप मेसेज येणे नशीबाचे समजा 
कुणीतरी आपली आठवण काढत आहे… 
चांगल्या पोस्टला लाईक करा… 
वेगवेगळ्या विषयांवर  चर्चांची देवाण घेवाण करा 
आनंद हा देण्यात घेण्यात असतो बडबड करा 
निरस होऊ नका वयाला आपल्या विसरा 
नेहमी मजा करतच रहा…!

 विश्वास ठेवा की… जर आपले मन नेहमी आनंदी असेल… 

तरच आपण नेहमी निरोगी राहू…!
कारण जगातील मैत्री हे नाते सर्वात सुंदर नाते आहे. 
जन्मताच आपल्याला लाभलेला किंवा आपण स्वतःच स्वीकारलेल्या 
कोणत्याही नात्यात तुम्ही मैत्री चे नाते मिळवा… 
तुमचे जे मूळ नाते आहे ते आता त्यापेक्षाही
सुंदर होऊन जाईल!

 

मैत्री-वर-मराठी-सुविचार-Quotes-Of-Friendship-In-Marathi-mitrata-marathi-suvichar-on-friendship-with-images
मैत्री वर मराठी सुविचार – Quotes Of Friendship In Marathi – मित्रता सुविचार

खूप व्याप असतांनाही

आवर्जून आठवण काढते
ती मैत्री असते
 
शंभर शब्द सांगत नाहीत
ते एका शब्दात कळवते
ती मैत्री असते
 
 
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात
प्रत्येकाकडे एक मित्र असतोच.
पण फक्त भाग्यशालींच्या
आयुष्यात तोच मित्र
सर्व टप्प्यांमध्ये असतो.
 
 
एक चांगला मित्र हा
जीवनाशी नाते जोडणारा
भूतकाळ विसरायला लावणारा
भविष्याच्या मार्ग दाखवणारा
आणि या वेड्या दुनियेत
समजूतदारपणा दाखवणारा असतो.
 

 

मैत्री-वर-मराठी-सुविचार-Quotes-Of-Friendship-In-Marathi-mitrata-marathi-suvichar-on-friendship-with-images -मैत्री नको चंद्रासारखी
मैत्री वर मराठी सुविचार – Quotes Of Friendship In Marathi – मित्रता सुविचार

 

मैत्री नको चंद्रासारखी

दिवसा साथ  देणारी.
मैत्री नको सावंल्यांसारखी
सतत पाठलाग करणारी.
मैत्री हवी अश्रुं सारखी
सुख दु:खात साथ देणारी.
 
ज्याच्यासाठी डोळ्यात
अश्रू यावेत
असा मित्र सहजासहजी
सापडत नाही
आणि खरंच जर का
कधी सापडला
तर तो अश्रूच येवू देत नाही.
जीवन बदलत असते
वर्गातून ऑफिस पर्यंत
पुस्तकातून फाईल पर्यंत
जीन्स पासून फॉर्मल पर्यंत
पॉकेटमनी पासून पगारा पर्यंत
प्रेयसी पासून पत्नी पर्यंत
मात्रहे मित्र तसेच राहतात.
अश्रु यावेत
असा मित्र सहजासहजी
सापडत नाही
आणि खरंच जर कधी
सापडला तर
तो कधी अश्रूच येऊ देत नाही.
 

 

मैत्री-वर-मराठी-सुविचार-Quotes-Of-Friendship-In-Marathi-mitrata-marathi-suvichar-on-friendship-with-images -कौतुक
मैत्री वर मराठी सुविचार – Quotes Of Friendship In Marathi – मित्रता सुविचार

 

जर अधिक मित्र हवे असतील
तर दुसऱ्यांच्या गुणांचे
मनापासून कौतुक करा.
 

 

मैत्री-वर-मराठी-सुविचार-Quotes-Of-Friendship-In-Marathi-mitrata-marathi-suvichar-on-friendship-with-images -मैत्री-सोबत-जीवनाची-आयुष्याची
मैत्री वर मराठी सुविचार – Quotes Of Friendship In Marathi – मित्रता सुविचार

 

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
मैत्री एक अनमोल भेट आयुष्याची
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा
मैत्री एक अतूट सोबत जीवनाची

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here