राम नाम महिमा | Good Thoughts In Marathi |
Sunder Vichar
एकदा एका भक्तांने तुलसीदासांना विचारले की…
महाराज आपण श्री रामाचे इतके गुणगान गाता…!
तर प्रभु श्री रामाने स्वतः तुम्हाला कधी तरी दर्शन दिले आहे का…?
त्यावर तुलसीदास म्हणाले हो… दर्शन दिले आहे.
भक्त :- मला ही प्रभु श्री रामाचे दर्शन घडवाल का…?
तुलसीदास :- हो नक्कीच असे म्हणुन त्या भक्ताला
तुलसीदासांनी खुपच समर्पक उत्तर दिले…!
ते उत्तर एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवनारे होते.
बघा…
तुलसीदास म्हणाले, हे तर खुप सोपे आहे. आपण प्रभु श्री रामाचे दर्शन
स्वतः मध्येच घेऊ शकतो. तुमच्या नावात काय प्रत्येकाच्या नावांतही
शेवटी आपल्याला प्रभू श्री रामाचे दर्शन नक्कीच घेता
येईल…!
मी तुम्हाला एक सुत्रश्लाेक सांगतो. या सुत्रश्लाेका प्रमाणे कोणाच्याही नावाला
ते सुत्र लागु होईल… भक्त :-कोणते सुत्र…?
तुलसीदासांचे राम नाम गणित | राम नाम महिमा
Good Thoughts In Marathi
तुलसीदास :-
|| नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण ||
|| तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम ||
वरील सुत्राप्रमाणे…
आता कुणाचेही नांव घ्या…
त्या नावाची अक्षरे माेजा…
1] त्याला ( चतुर्गुण ) 4 ने गुणा…
2] त्यात ( पंच तत्व मिलन ) 5 मिळवा…
3] त्याची ( द्विगुण प्रमाण ) दुप्पट करा…
4] आलेल्या संख्येला ( अष्ट सो भागे ) 8 ने भागा….
पुर्ण भाग जात नाही….
दरवेळेस बाकी 2 शिल्लक राहतेच…
ते दोन म्हणजेच राम ही दोन अक्षर आहेत.
बसत नाही ना विश्वास…! चला एक उदाहरण घेऊ या…!
उदाहरण… माझे नाव आहे – विजय
अक्षरे आहेत 3
1] 4 ने गुणा 3 × 4 = 12
2] 5 मिळवा 12 +5 = 17
3] दुप्पट करा 17 × 2 = 34
4] 8 ने भागा 34 ÷ 8 = 4 पुर्णांक… बाकी मात्र 2…
नेहमी बाकी दोनच अक्षरे उरतील ती दोन अक्षरे म्हणजे….
राम
राम नाम महिमा | Good Thoughts In Marathi | Sunder Vichar
जय श्री राम…
तुलसीदासजीची जय हो…!
सुत्रश्लोकातील संख्यांना सुद्धा तुलसीदासांनी फार महत्व दिले आहे…
हेही एक विशेष आहे.
चतुर्गुण… म्हणजेच ४ पुरुषार्थ..
पंच तत्व… म्हणजेच पंचमहाभौतिक…
द्विगुण प्रमाण म्हणजेच माया आणि ब्रह्म असे दोन
अष्ट सो भागे म्ह. आठ दिशांनी… आठ प्रकारची सौभाग्ये…
आता प्रत्येकाने स्वतःच्या नावाने हे तपासुन पहा….
आपल्यालानक्की विस्मयकारक वाटेल
पण बाकी नेहमी…
2 च येईल
तुलसीदासांच्या बुद्धिचातुर्याची ओळख पटते….
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे !!
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे !!