वडील जाणून घ्यायचे आहेत…? |
पाच मिनिटे वेळ काढून वाचाच…!
बाप
एका मोठ्या घरात एक ८० वर्षाचे वृद्ध वडील सोफ्यावर बसलेले आहेत…
जवळच डायनिंगवर त्यांचा चाळीस वर्षाचा मुलगा पेपर वाचत नाश्ता करीत आहे.
तिथेच दहा वर्षाचा नातू देखील वडिलांसोबत नाश्ता करतोय. इतक्यात खिडकीत
मुलगा आश्चर्य चकित होतो की… वडिलांना इतके पण माहीत नाही…? की माझी
फिरकी घेत आहेत…? पण जाऊ द्या, असे म्हणत मुलगा शांतपणे उत्तर देतो…
“ बाबा, तो तर कावळा आहे “
थोड्या वेळात तो कावळा “ काव काव ” ओरडतो. यावर वृद्ध वडील पुन्हा आपल्या
मुलाला विचारतात, “ तो कोणता पक्षी आहे…? “
आता थोडा वैतागून मुलगा म्हणतो… “ अहो बाबा तो कावळा आहे “
थोडा वेळ जातो… पुन्हा वृद्ध वडील आपल्या मुलाला विचारतात…
“तो कोणता पक्षी आहे…? “ यावेळी हातातला पेपर बाजूला करून…
मुलगा थोडा चिडून म्हणतो, “ बाबा किती वेळा सांगू…?
की तो कावळा आहे… कावळा आहे म्हणून…? “
यानंतर पुन्हा पाच मिनिटे गेल्यावर पुन्हा वृद्ध वडील आपल्या मुलाला विचारतात…
“ तो कोणता पक्षी आहे…? “ यावेळी मात्र मुलाचा संयम संपतो. तो हातातला पेपर
पटकन फेकून वडिलांना जोरात म्हणतो, “ चार वेळा तुम्ही विचारले आहे आणि मी सांगितले
आहे की तो कावळा आहे. आता मला पेपर वाचू देणार आहात की नाही…?
की मी बाहेर जाऊ…?”
वृद्ध वडील हळूच उठून आतल्या त्यांच्या खोलीत जाऊन खुर्चीवर बसतात. समोर ते
नेहमी लिहीत असलेली रोजची डायरी असते. त्यातले एक पान काढून वाचत असतांनाच
त्यांचा लाडका नातू हळूच तिथे येतो. आजोबाच्या मागून तोही डायरी वाचू लागतो.
आणि अचानक पुढे होऊन ती डायरी उचलून तो पळत बाहेरच्या खोलीत वडिलांकडे येतो.
त्या डायरीतील “ते” पान वडिलांसमोर धरतो. वडील वाचू लागतात….
“ आज सकाळी पेपर वाचत असतांना माझा ५ वर्षाचा माझा मुलगा
माझ्या मांडीवर येऊन बसला. समोरच्या झाडावर एक कावळा येऊन काव काव करू
लागला. मुलाने मला २५ वेळा विचारले की ते काय आहे…? कोणता पक्षी आहे…?
आणि मी ही हातातला पेपर बाजूला करून २५ वेळा त्याला उत्तर दिले. आणि प्रत्येक
वेळी मी त्याला उत्तर दिल्यावर जवळ घेऊन पापा देत गेलो. यात आमचा अर्धा तास
खूप छान गेला…! “
वडील जाणून घ्यायचे आहेत…? |
पाच मिनिटे वेळ काढून वाचाच…!
बाप
डायरीतील पुढची अक्षरे पुसट होत गेली. कारण चाळिशीतल्या त्या मुलाच्या डोळ्यातून
अश्रू ओघळत होते आणि ते थेंब डायरीच्या पानावर पडत होते…!
वृद्धपण म्हणजे जणू दुसरे बालपणच असते. म्हणून आपण ज्यांच्यामुळे घडलो…
मोठे झालो… त्या वडिलांना त्यांच्या वृद्धपणी “लहान” समजून वागवले तर
घराघरात सध्या पेटलेले वाद निम्म्याने कमी होतील.
नात्यात जीवन जन्मते आणि जीवनात नाती फुलतात.
म्हणून नात्याला जपायचे…!
वडील जाणून घ्यायचे आहेत…? – पाच मिनिटे वेळ काढून वाचाच…! |
बाप नावाची चादर…
जेव्हा आयुष्यातून निघून जाते
तेव्हा प्रत्येक सकाळ ही
जबाबदारीची जाणीव करून देते.
|
वडील ही एक अशी व्यक्ती आहे
जी आपले संपूर्ण आयुष्य…
मुलांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी घालवते.
|
आईला बहुतेकदा रडतांना पाहिले आहे
पण ज्या दिवशी वडील रडतात
त्या दिवशी काळजावर वार झाल्यासारखे
वाटते…!
वडील जाणून घ्यायचे आहेत…? – पाच मिनिटे वेळ काढून वाचाच…! |
कितीही मोठे संकट आले तरी…
हसुन जो संकटाशी लढायला
शिकवतो…
तो वडील असतो.