वैवाहिक दैनंदिन जीवनातील नवरा बायकोचा गमतीदार संवाद | सुंदर विचार

0
130
नवरा-बायको-मराठी-सुविचार-marathi-suvichar-bayko-nawara-status-love-joke-vb-vijay-bhagat-good-thoughts
नवरा-बायको-मराठी-सुविचार-marathi-suvichar-bayko-nawara-status
वैवाहिक दैनंदिन जीवनातील नवरा बायकोचा गमतीदार संवाद
नवरा-बायको-मराठी-सुविचार-marathi-suvichar-bayko-nawara-status-love-joke-vb-vijay-bhagat-good-thoughts
सकाळी सकाळी एका नवऱ्याने आपल्या बायकोला उठवले आणि म्हणाला
नवरा :- अंग चल उठ… आज आपण दोघेही योगा क्लास ला जावूया…
बायको :- कशाला… आणि मला सांगा… तुम्हांला मी एवढी लट्ठ
दिसते की काय…?
नवरा :- अंग तसे काही नाही… योगा हे निरोगी राहण्यासाठी… आणि
आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी चांगले असते…
बायको :- म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे की
मी अनफिट आहे… आजारी आहे…
नवरा :- जावू दे गं… जर तुला नाही उठायचे तर…!
बायको :- याचा काय अर्थ….?
मला तुम्ही आळशी समजता की काय…?
नवरा :- नाही नाही…  तुझा गैरसमज होत आहे…
बायको :- आपले लग्न होऊन इतकी वर्षे झालीत
आणि आज तुम्ही असे म्हणत आहात की…
मी तुम्हाला समजु शकलो नाही… गैरसमज होत आहे माझा…
म्हणजे मला अक्कलच नाही आहे…  देवा…! काय हे…
नवरा :- अगं मी काही तसे म्हणालो काय…?
बायको :- म्हणजे…. मी खोटे बोलत आहे तर…
नवरा :- बरे बरे… जाऊ दे गं आता…
सकाळी सकाळी भांडण कशाला पाहिजे…
बायको :- म्हणजे मी भांडण करते… मी भांडखोर आहे…?
नवरा :- ठीक आहे… तु आराम कर आणि आता मी पण जात नाही
योगा क्लासला…. सगळे कॅन्सलच करतो…
बायको :- आता आलात रस्त्यावर…. खरेतर तुम्हाला जायचेच नव्हते..
फक्त माझ्या डोक्यावर खापर फोडायचे होते…
नवरा :- बरे आहे… आता मी एकटाच जातो योगा क्लास ला…
तू अगदी आनंदात झोप
बायको :- जा जा... तुम्ही एकटेच जा...
सेही तुम्ही एकटेच सगळी मौज करता...
कधीतरी माझी काळजी घेतली आहेतुम्ही…
नवरा :- हे बघ आता माझे डोके गरगरायला लागले…. चक्कर येत आहे मला…
बायको :- चक्कर तर येणारच…. डोके तर गरगरणारच….
एक नंबर चे स्वार्थी आहात तुम्ही.. नेहमी फक्त स्वत:पुरताच विचार करता नां..!
बायकोच्या आरोग्याची अजिबात काळजी नाही तुम्हाला…!
चक्कर तर येणारच..!
नवरा शांत
बायको झोप...
नवरा मनातच विचार करायला लागला…  

माझे चुकले तरी कुठे….?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here