सहानभूती | सुविचार |
Suvichar |
Good Thoughts In Marathi
एकदा मी आणि मित्र एका हॉटेल मध्ये जेवायला गेलो होतो.
त्या हॉटेल मध्ये तिथलाच एक वेटर आम्हाला आम्ही केलेले आर्डर
टेबलवर ठेवतांना चुकून त्याच्या कडून भाजी चा रस्सा मित्राच्या
हातावर उडतो, हाताला चटका लागतो आणि त्याचा शर्ट ही खराब होतो.
थोडा वेळ तर आम्ही घाबरून जातो पण… लवकरच सावरत हात आणि
रस्याच्या त्या शर्ट वरील डागाकडे बघत राहतो…!
त्यातच वेटर एकदम घाबरून म्हणाला, माफ करा साहेब मला…
वाॅशरूम मध्ये चला साहेब, मी हा डाग साफ करून देतो…!
त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता…
यावर माझा मित्र सहज आणि अगदी हसत हसत त्या वेटर ला म्हणाला
“ठीक आहे काका… ( वेटर वयस्कार होता ) होते कधी कधी असे.
सहानभूती | सुविचार |
Suvichar | Good Thoughts In Marathi
काका तुम्ही मला फक्त वॉशरूम कुठे आहे ते सांगा.
हा डाग मी स्वतः साफ करतो,
तुम्ही कसलीही काळजी करू नका आणि आपल्या कामाकडे लक्ष द्या.
बरेच दिवस झाले तरीही लॉड्री वाल्याने दिलेले कपडे आणुन दिले नाहीत
म्हणून आम्ही, त्याच्या दुकानात गेलो… दुकानात घाबरत घाबरत…
साहेब तुमचा एक शर्ट प्रेस करीत असतांना जळला,
असे सांगत तो जळलेला शर्ट दाखविला.
मित्र त्या वयस्कार लॉड्री वाल्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला,
काका काहीच हरकत नाही. तुम्ही या निमिताने मला एक नवीन शर्ट घेण्याचे
कारण दिलेले आहे. आणि मित्राने हसत हसत लॉड्री वाल्याचा खांद्यावर
हाथ ठेवून धीर दिला.
खूप दिवसा पासून माझा मित्र ज्या कंपनीत जॉब करीत होता त्या
कंपनीतील फाईल इकडे – तिकडे करणारे काका आले नव्हते.
म्हणून माझा मित्र त्यांच्या घरी गेला. तिथे गेल्यावर मित्राला कळले की ते
काका तर आजारी आहेत आणि काही दिवसातच त्यांच्या मुलीचे लग्नही आहे…!
मित्र पूर्ण दिवस तिथेच थांबला, आणि त्यांच्या मुलाला लग्नाच्या तयारीसाठी
त्याने मदत केली. तसेच लग्नाच्या दिवशीसुद्धा पाहुण्यांची आवभगत आणि
मानपान करण्यासाठी मित्र तयारीत होता.
या उदाहरणा वरून आपल्या लक्षात आले असेल की याला सहानभूती म्हणतात.
म्हणजे दुसऱ्यांच्या वेदनांची जाणीव होऊन त्यात एकरूप होत…
त्यांना आनंद देण्याची कला आहे.
कुणाचा तरी दिवस चांगला बनवण्याचा तो एक प्रयत्न आहे.
अत्यंत महत्त्वाची… पण… तरीही कमी लेखली जाणारी एकमेव
गोष्ट म्हणजेच सहानुभूती…!
स्वतःचे व्यक्तिमत्व खुलून दाखवणारा असा हा गुण अंगी बाळगणे
सहज शक्य आहे. त्यासाठी पैसाही लागत नाही आणि श्रमही लागत नाही.
बघा तर मग…! आजपासून कुठे सहानुभूतीने वागण्याची संधी मिळते का ते…?