सुंदर बोधकथा | Good Thoughts In Marathi | Marathi Kahani

0
676
सुंदर बोधकथा | Good Thoughts In Marathi | Marathi Kahani
सुंदर बोधकथा - Good Thoughts In Marathi - Marathi Kahani - Story - Marathi Suvichar

सुंदर बोधकथा – Good Thoughts In Marathi – Marathi Kahani – Story – Marathi Suvichar

भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे एकदा जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी रस्ता
नाही समजल्याने ते तिघेही रस्ता चुकले.

ते जंगल खुपच घनदाट होते, त्यांना जंगलातील ना पुढे
जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला की,
आता आपण येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून समोर जायचे.

जंगलात वाट चुकुन चालता चालता तिघेही खुप दमलेले होते, पण…
जंगलात सुरक्षित रात्र काढण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.

पहिली पाळी सात्यकीची, दुसरी बलराम आणि शेवटी भगवान श्रीकृष्ण असे ठरले.

सात्यकी ने पहारा देणे सुरू केले, काही वेळातच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की
एक माणूस पहारा देत आहे आणि दोन माणसे झोपलेली आहेत. तो पिशाच्च झाडावरून खाली उतरला
आणि सात्यकीला मल्लयुद्धासाठी आव्हान करू लागला.

पिशाच्चाने केलेले आव्हान पाहून सात्यकीला क्रोध आला आणि क्रोधाने जसा पिशाच्चावर धावून गेला…
तसाच पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत चांगलेच मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येत होता तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होत होता व ते
सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.

सुंदर बोधकथा – Good Thoughts In Marathi – Marathi Kahani – Story – Marathi Suvichar

एका प्रहरा नंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने बलरामांना त्या
पिशाच्चाबदल काहीही सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास आव्हान दिले. बलरामही
क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार बलरामांना वाढलेला  दिसून आला.
ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितकाच त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे.
शेवटी तो ही प्रहर संपला व आता पहाऱ्याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.

त्या दोघां प्रमाणे पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना ही आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित
करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापला व जोर जोरात ओरडून श्रीकृष्णांना
बोलावू लागला पण श्रीकृष्ण मंदस्मित करत आपल्या मनाला शांत ठेवले. आणि तसेच
शांत भावात उभे राहिले.

तसेच एक आश्चर्य झाले…! जसे जसे पिशाच्चाला क्रोध यायचा तसतसा त्याचा आकार लहान होत जायचा.
अशीच रात्र संपत गेली आणि पहाट होता होता त्याचा आकार अगदी लहान झालेला होता.
आता तो एक लहानसा कीडा झाला.

भगवान श्रीकृष्णांनी त्या छोट्या कीड्याला उचलून आपल्या उपरणण्यात बांधुन ठेवला.
सकाळ झाल्यावर तिघेही पुढील प्रवाशाला निघाले. चालता चालता सात्यकी व बलरामांनी
रात्रीची कहाणी सांगितली, त्यावर श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला आणि म्हणाले…
तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हते कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला
जिंकण्यासाठी शांती हेच औषध आहे. क्रोधाने फक्त क्रोध वाढतो मात्र.
मी एकदम शांत राहिलो कसलाही प्रतिकार दिला नाही, म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता
या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.

तात्पर्य : क्रोधावर फक्त संयमानेच विजय मिळविता येतो.क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत 
नाही, तर…शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते. क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे 
नसून,  आपल्या विचारातच वसत असते.

मराठी सुविचार – चांगले विचार – Good Thoughts In Marathi On Life

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here