स्त्रियांच्या सुंदर छटा | स्त्रीचे जीवन दूध ते तूप | Sunder Vichar

0
251
स्त्रियांच्या सुंदर छटा | स्त्रीचे जीवन दूध ते तूप | Sunder Vichar

स्त्रियांच्या सुंदर छटा | स्त्रीचे जीवन दूध ते तूप | Sunder Vichar

 

श्रीखंड घेण्यासाठी एक डेयरी च्या दुकानात उभा होतो.

दुकानात एकाच ठिकाणी दूध, दही, ताक, लोणी, तूप

ठेवलेले होते.

ते बघून असे वाटले की…

अरे… ह्या तर सर्वच एका स्त्री च्या आयुष्याच्या अवस्था आहेत…!

पाहूया कसे ते..?

दूध

दूध म्हणजे एका स्त्री चे लग्नाच्या पूर्वीचे आयुष्य…

कुमारिका….

दूध म्हणजे मुलीचे माहेर…

दूध म्हणजे आईवडिलांशी नाते…

एकदम शुभ्र… सकस… निर्भेळ…

स्वार्थाचे पाणी टाकून वाढवता येत नाही… ते लगेच बेचव होते.

त्यावेळी मुलीला आपल्यासारखे हे जग सुद्धा स्वच्छ, सुंदर, निरागस दिसते.

दही

लग्नात दुधाला कन्यादानाचे विरजण लागले की… कुमारिकेची वधू  होते.

आणि या दुधाचे नाव आता बदलून दही असे होते…!

दही म्हणजे त्याच अवस्थेत एकदम थिजून घट्ट होणे…!

लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे

त्याच भूमिकेत थिजून राहते.

दही म्हणजे मुलीचे आपल्या लग्नाशी असलेले अगदी घट्ट नाते. या नात्यात कितीही

मारहाण करणारा… व्यसनीव्यभिचारीमनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी

असलेला नवरा असला तरीही… स्त्री त्याच्या प्रती  एवढी निष्ठा का दाखवते…?

नवरा हा पती परमेश्वर म्हणून…? नव्हे तर याचे उत्तर म्हणजे तिचे आपल्याच

लग्नाशी असलेले घट्ट नाते…!

ताक

सर्वसामान्य स्त्रिया लग्न झाल्यावर दही होतात आणि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या

रवीने घुसळल्या जातात…! ही स्त्री आता  त्यांची सून होते…!

म्हणजेच ताक होते.

जसे दूध सकस तसे ताक ही बहुगुणी.

मग ती बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती ) किंवा  खवळलेला नवरा असो

 (पित्त प्रकृती)

ताक दोघांनाही शांत करते… यांवर उत्तम उपाय असे आयुर्वेद म्हणतो.

ताक म्हणजे सुनेचे सासरशी नाते. सासरी स्त्री ताकासारखी बहुगुणी असावी

लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच…!

दुधात पाणी घातल्यावर ते बेचव होते… परंतु ताकात मात्र पाणी घातल्यावर

ते वाढतच राहते… आणि अनेक वर्ष संसारातल्या सगळ्या प्रश्नांवर कामी येते.

स्त्रियांच्या सुंदर छटा | स्त्रीचे जीवन दूध ते तूप | Sunder Vichar

लोणी

खूप वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरते. आणि

जेव्हा २० वर्षांनी जेव्हा माझे फलित काय…? असा प्रश्न ताक विचारते…

तेव्हा… नकळत मऊ, रेशमी, मुलायम, नितळ असा लोण्याचा गोळा वर

आलेला दिसतो .

हे लोणी म्हणजे आजपर्यंतचे नवऱ्या सोबतचे नाते. रवीच्या प्रत्येक घुसळणीत

ह्या नात्याचे कण कण लोणी होऊन हळूच बाजूला जमा होत असतात…

हे तिच्या लक्षातच येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरे तर…

दररोज आरशात लाजून तिला सांगत असतात. पण तिला त्यांची ही भाषा

कळतच नाही .

तरुण दिसण्यासाठी ती त्याचे तोंड काळे करते.

ताकाला पुन्हा दूध व्हायचे असते… हा वेडेपणा नाही का…?

तूप

स्त्री ची लोणी ही शेवटची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून

ठेवता येत नाही. ते आपले रूप बदलते… नव-याच्या नात्याचे प्रेम कढवून

स्त्री आता आपल्या घरासाठी… आपल्या नातवांसाठी… आजी म्हणून…

एक नवीन रूप घेते…! आणि त्याच लोण्याचे आता कढवलेले साजूक तूप होते.

 वरणभात असो… शिरा असो… किंवा बेसन लाडू असो… घरातल्या प्रत्येक गोष्टीत

आता आजी नावाचे पळीभर साजूक तूप पडते आणि जादू घडते.

 देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात

खोचलेली वात  बघितली की… मला घरासाठी येता जाता हात जोडणारी

चंदेरी केसांची आजी दिसते.

घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे तूप संपून जाते…!

हीच ती स्त्री ची अंतिम उच्च अवस्था होय.

दूध ते तूप

हा असा अनोखा स्त्री च्या आयुष्याचा प्रवास.

 स्री आहे तर श्री आहे हे म्हटलेले वावगे ठरूं नये.

 असा हा स्री चा संपूर्ण प्रवास ना थांबणारा…

सतत धावणारा… ना कावणारा…

ना घाबरणारा… कुटूंबासाठी झिजणारा…

कुटूंबाची काळजी घेणारा…

ह्या प्रवासास तथा स्री जातीस मानाचा मुजरा…!

Good Thoughts In Marathi | जबरदस्त प्रेरणादायक विचार मराठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here