1 मे – महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन – माहिती

1
86
1 मे - महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन - माहिती - maharastra din - जागतिक कामगार दिन

 

1 मे – महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन – माहिती 

1 मे - महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन - माहिती - maharastra din - जागतिक कामगार दिन - labour day - जागतिक श्रमिक दिन - vb - इतिहास - विजय भगत
1 मे – महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन – माहिती 

 

कणखर देशा… 

पवित्र देशा….

प्रणाम घ्यावा… 

माझा हा श्री महाराष्ट्र देशा…!

आपण  सर्वाना
१ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन 

आणि कामगार दिन 

यांच्या मनःपूर्वक शुभेच्छा

 

आपल्या राज्याचा वाढदिवस म्हणजे १ मे.
60 वर्षापूर्वी म्हणजेच १ मे १९६० रोजी आपल्या 
महाराष्ट्र राज्याची निर्मित्ती म्हणा किंवा 
एक स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळाली. 
 
मागील 60 वर्षात महाराष्ट्र राज्याने अशी प्रगतीची 
काश धरली की आज महाराष्ट्र राज्य 
देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे. 
 
व्यापार उद्योग म्हणातसेच कलासाहित्य ,क्रीडा
शिक्षण, आरोग्य सुविधा आणि सगळ्यात 
महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात आपले 
महाराष्ट्र राज्य आघाडीवर असल्याचे चित्र 
आपणास पाहायला मिळते.

 इतिहास 

 
१ मे तसी आपली म्हणजे हक्काची सुट्टी
महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिवस
( आंतरराष्ट्रीय श्रमिक दिन / Labour Day ) 
या दिवशी साजरा केला जातो.
 
 चला आता हे जाणून घेऊ कि या दिवशी हे दिवस 
का साजरे केले जातात आणि काय या 
मागचा इतिहास आहे…! आपण थोडक्यात समजू या. 

महाराष्ट्र दिनाचा इतिहास

 
21 नोव्हेंबर 1955 या दिवशी फ्लोरा 
फाउंटनच्या परिसरात खूप तणावाचे वातावरण होते. 
कारण महाराष्ट्राला मुंबई देण्याचे राज्य पुनर्रचना 
आयोगाने नाकारले होते. त्यामुळे 
मराठी माणसे खूप चिडली होती. 

सगळीकडे लहान मोठ्या सभांमधून या निर्णयाचा 
निषेध होत होता. शेवटी सगळ्या लहान 
मोठ्या संघटना मिळून एक विशाल 
मोर्चा सरकारचा विरोध करण्यासाठी 
फ्लोरा फाऊंटना समोरील 
चौकात येण्याचे ठरले. तसेच एका बाजूने प्रचंड 
जनसमुदाय एका चर्चगेट स्थानका कडून आणि 
दुसऱ्या बाजूने बोरी बंदरकडून मोठ मोठया घोषणा देत 
फ्लोरा फाउंटनकडे जमले. 
 
सरकारने हा मोर्चा उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज 
करण्यात आला. पण अढळ सत्याग्रहीं 
मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि 
पोलिसांना गोळीबाराचा आदेश, मुंबई 
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई 
यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि 
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक शहीद झाले. 

या शहिदांच्या बलिदानापुढे व मराठी 
माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने विचार करून शेवटी
 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. 1965 मध्ये त्या जागी
 हुतात्मा स्मारकाची (शहीद स्मारक ) उभारणी 
करण्यात आली.
 
1 मे - महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन - माहिती - labour day - maharastra day - history - विजय भगत - vb good thoughts
1 मे – महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन – माहिती 

 

 1 मे कामगार दिवस

 
तसे पहिले असता 1 मे हा दिवस 
जागतिक कामगार दिन 
 
इतिहासाची उजळणी केल्यावर 
आपल्या असे लक्षात येत कि जागतिक औद्योगिक 
क्रांतीनंतर जगभरातून मुख्यतः पाश्चिमात्य  गात 
रोजगार खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध  होऊ 
लागले. कामगारांकडे काम होते, मात्र कामगारांचे 
खूप शोषण होत असे. तसेच ते आपल्या 
कोणत्याही हक्कापासून वंचित असलेल्या त्या 
कामगारांना 12 ते 16 तास सतत काम करावे 
लागत असे. 
 
कामाच्या ठिकाणी अपघात हि व्हायचे. 
मृत्यू चे हि प्रमाण वाढलेले होते.
 म्हणून या विरोधात कामगार 
एकजूट झाले आणि त्यांनी आंदोलन केला. 
 
जवळपास जगाच्या 80 देशात याचा 
तीव्र पडसाद उमटू लागला. 
आणि शेवटी कामगाराची कामाची वेळ 8 तास 
निश्चित करण्यात आली. 
 
यानंतर कामगारांच्या हक्का संदर्भात दोन अंतराष्ट्रीय 
परिषदा झाल्या. नंतर १ मे 1811 
पासून कामगार दिन ( Labour Day ) साजरा केला 
जाऊ लागला. 
 
महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या कामगार 
दिनाला संयुक्त महाराष्टाच्या चळवळीचा संदर्भ आहे. 
संयुक्त महारष्ट्रचा लढा वेगवेगळ्या पातळीवर लढला गेला. 
 
या लढ्यात कामगारांनी घेतलेला सहभाग 
अत्यंत महात्वाचा होता. त्याच्या सहभागामुळेच 
हा लढा खऱ्या अर्थाने रस्त्या रस्त्यात लढला गेला
याच कारणामुळे 1 मे 1960 रोजी 
मराठी भाषिकासाठी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती 
झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट दिन 
बरोबरच कामगार दिन हि मोठ्या उत्साहात साजरा 
केला जाऊ लागला.
 

जय महाराष्ट्र 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here