प्रत्येक बायकोला नवऱ्याकडून या ५ अपेक्षा असतात |
Husband wife Relationship Tips | नवरा बायको नाते
मित्रांनो
प्रत्येक पत्नीच्या नवऱ्याकडून काही
अपेक्षा असतात पत्नी भावनात्मक
संतुष्ट असेल तर संसार खूप आनंदी
आणि समाधानी असतो. आयुष्यभर
कुटुंबासाठी झटणाऱ्या पत्नीच्या
काही मापक अपेक्षा वतीने पूर्ण
केल्यास… पत्नीची ओवाळून टाकते.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये असे घडताना
तुळकच दिसते तरीही काही पती
आपल्या पत्नीच्या या पाच अपेक्षा पूर्ण
करणारेही असतात.
your queries
पत्नी म्हणजे काय…?
नवरा बायकोने संसारात कोणत्या गोष्टी टाळाव्यात…?
नेहमी पत्नीच दोषी असते का….?
नातेवाईक आणि जवळच्या नात्यात कशी कटुता येते…?
पत्नीच्या दुःखात पतीने कशी साथ द्यावी….?
पत्नी आनंदी कधी राहील….?
पत्नीला आनंदी करण्यासाठी काय करावे….?
बायकोला नवऱ्याकडून कोणत्या अपेक्षा असतात…?
नवऱ्याने बायको सोबत कसे वागावे…?
नवरा बायकोचे प्रेम वाढण्याचे उपाय पत्नीला कसे संतुष्ट ठेवावे….?
पत्नीपतीकडून कोणत्या अपेक्षा करते…..?
नवऱ्याकडून प्रत्येक बायकोला
या ५ अपेक्षा असतात….!
Husband wife Relationship Tips
प्रत्येक पत्नीला स्वतःच्या पतीकडून
या पाच गोष्टींची अपेक्षा असते…!
त्या पाच गोष्टी कोणत्या ते आपण
या व्हिडिओ मध्ये पाहूया.
दुसऱ्याच्या बागेत लाडाने वाढवलेले
पुष्प नवऱ्याच्या घरची बाग आणि
संसार वेल फुलवते ती म्हणजे पत्नी
असते.
माहेरच्या लाडात उगवलेली सरिता
स्वतःच्या कक्षा रुंदावत नवऱ्याच्या
सर्व गुन्हा दोषासकट स्वतःच्या
पोटात घालून संत वाहणारी नदी
म्हणजेच पत्नी…
कुटुंबातील प्रत्येकाचे टोमणे सहन
करूनही सर्व कर्तव्य नियमितपणे
पार पाडून कुटुंबासाठी झटते…
ती म्हणजे पत्नी…
कितीही मोठ्या संकटात असाल
तर खंबीरपणे पाठीशी उभी राहते
साथ देते. ती म्हणजे पत्नी असते.
संकटाच्या वेळी तुमची सर्व नाती
तुम्हाला सोडून जातील. सर्वांनी
साथ सोडली तरी पत्नी कायम
तुमच्या सोबत असते…
बघा.. स्वतःच अस्तित्व विसरून
साखर जसी पाण्यात विरघळते
अगदी तशीच संसारात विरघळून
गोडवा निर्माण करणारी म्हणजे
पत्नीच असते.
प्रत्येक बायकोला नवऱ्याकडून या ५ अपेक्षा असतात |
Husband wife Relationship Tips | नवरा बायको नाते
पत्नीच्या नवऱ्या कडून या पाच अपेक्षा
असतात त्या कोणत्या ते आपण पाहूया..
१. सन्मानपूर्वक वागणूक तिला हवी
असते. पदरी पडलेल्या प्रतिकृती
प्रियकर जसा आहे तसा स्वीकारून
त्याच्या कुशीतच स्वतःचे अस्तित्व
शोधणाऱ्या प्रेमळ प्रेयसीची म्हणजेच
पत्नीची इच्छा असते की सन्मानाची
वागणूक मिळावी.
प्रत्येक स्त्रीचे अस्तित्व असते हे भान
ठेवूनच तिलाही योग्य तो सन्मान
मिळालाच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत
पुरुषी अहंकार न आणता स्वतःवरूनच
तिच्या अस्तित्वाचा आणि मनाचा विचार
करावा. एका संसारिक पत्नीची नातेवाईक
असो किंवा घरचे असो यांच्याकडून प्रत्येक
अपेक्षाही अपूर्णच राहिलेली असते. परंतु
पतीच्या चार गोड शब्दानेच सर्व कटू गिळून
घेऊन संसारासाठी सज्ज होत असते.
Husband wife Relationship Tips – नवरा बायको नाते
२. दोषासोबतच गुणांकडे सुद्धा लक्ष द्यावे
जी व्यक्ती मनापासून काम करते निर्णय
घेते तीच चुकत असते. बरे का…
वर्षानुवर्षे गॅरेजला लावलेल्या गाडीचा कधी
अपघात झालेला पाहिलाय का तुम्ही….?
पत्नी मध्ये संसार करताना अनेक दोष
आपल्यासमोर येतात त्यामुळे ती खूपच
चुकीची ठरू शकते. परंतु तिची एकच
अपेक्षा असते.. की तिच्या चांगल्या कामाचे
कौतुक करावे चार कौतुकाचे शब्द तिच्याही
मनाला आनंद देतात ज्या नवऱ्यामध्ये हा गुण
आढळतो… त्याची पत्नी नेहमी आनंदी राहते.
३. भांडणामध्ये दोघांनीही एक पाऊल
मागे घ्यावे. ज्या घरातील नवरा बायको
स्वतःच्या चुका मान्य करून कबूल करतात
त्या नवरा बायकोचे प्रेम कधीही संपत नाही
किंवा कमी होत नाही.
Husband wife Relationship Tips
मुळातच ना नाते टिकवणे ही प्रक्रिया
दोन्ही बाजूंनी व्हायला हवी. पुरुषांना
प्राधान्य असल्यामुळे चूक जरी
पुरुषाची असली तरी स्त्रीचीच आहे
असे दर्शवले जाते. नेहमी माघार
बायकोनेच नाही तर नवऱ्यानेही घ्यावी.
नाते आणखी मजबूत होईल.
४. चवथी अपेक्षा म्हणजे मुले आणि समाज
यांच्यापुढे अपमान करू नये. बघा प्रत्येक
घरात जगातील प्रत्येक नवरा बायकोचे
कमी जास्त किरकोळ भांडणे ही होतच
असतात. आणि हे पण तितकच खरे आहे
की हे भांडण श्रीखंडासारखे आंबट गोड
असते. एका स्त्रीला अपमानाची भीती वाटत
नाही. परंतु मुलांसमोर आणि समाजापुढे
केलेला अपमान स्त्रीला गर्भगळीत करतो.
तिचा आत्मविश्वास कमी करतो म्हणून एकच
विनंती आहे बाहेरच्या लोकांसमोर किंवा
मुलांसमोर बायकोचा अपमान कधीच करू
नका.
५. दुःख आणि आजारपण…
असे म्हणतात पत्नीचे खरे रूप नवऱ्याच्या
आर्थिक संकटात दिसत असते. तर
नवऱ्याचा खरा स्वभाव पत्नीच्या आजारपणात
दिसतो. पत्नी आजारी पडते तेव्हा सर्व घराचे
चक्र थांबते. पत्नीच्या आजारपणात किंवा
दुःखात बायकोला सर्वात जास्त कोणाचा
आधार हवा असतो तर तो नवऱ्याचा हवा
असतो. संसारासाठी सतत झटणाऱ्या पत्नीला
अशा वेळेला नवऱ्याने हातात हात देऊन
सांभाळले तर ती जन्मभरासाठी समाधानी
होऊन जाते. तिच्या असण्याला अस्तित्वाला
खऱ्या अर्थाने अर्थ मिळतो.
प्रत्येक बायकोला नवऱ्याकडून या ५ अपेक्षा असतात |
Husband wife Relationship Tips | नवरा बायको नाते
मित्रांनो… एक स्त्री शारीरिक त्रासापेक्षा
मानसिक त्रासाने खूप थकते. अनेक
वेळेला नवरा बायको मध्ये इतरांमुळेच
गैरसमज होत असतात. अशावेळी
एकमेकांना समजून घेऊन योग्य ती
चर्चा करणे.. संयमाने… धीराने.. गैरसमज
दूर करणे योग्य असते. पत्नी अशी व्यक्ती
आहे… जिच्या असण्याने आयुष्यात वसंत
बहरतो. आणि नसल्याने फाल्गुणांमधील
उदासीनता जाणवते. नवऱ्याकडून अतिशय
मापक अपेक्षा ठेवणारी प्रत्येकासाठी
झिजणारी आणि काहीही झाले तरी संसाराला
जपणारी म्हणजे…. पत्नी असते. स्वतःच्या
जीवातून एक नवा जीव निर्माण करणारी…
विश्वनिर्माती म्हणजे पत्नी असते. माहेरच्या
उंबरठ्या बाहेर पडल्यावर वेदना पिऊन
सासरचे गोडवे गाणारी थोर स्त्री म्हणजेच
पत्नी असते. माहेरी गेल्यावरही उरात
सासरी परतिची धास्ती आणि ओढ असणारी
सुद्धा पत्नीच असते. बघा मित्रांनो.. आयुष्यभर
संपून आनंदाच्या प्रवासाला निघतानाही
सासरकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता….
माहेरची साडी नेसून मार्गक्रमण करणारा
देह सुद्धा पत्नीचाच असतो. बायको बद्दल स्त्री
बद्दल हे विचार तुम्हाला आवडले तर कमेन्ट
मध्ये फक्त हो म्हणून म्हणा… धन्यवाद.
Husband Wife Quotes In Marathi – नवरा बायकोचे अनोखे प्रेम
साधे सोपे जगावे दिलखुलास हसावे..
न लाजता रडावे… राग आला तर
चिडावे…. पण झाले गेले तिथल्या
तिथेच सोडावे…!
प्रत्येक बायकोला नवऱ्याकडून या ५ अपेक्षा असतात |
Husband wife Relationship Tips | नवरा बायको नाते
उत्तम बायकोची 20 लक्षणे – 20 Good Habits of Wife –
Husband Wife Relationship
उत्तम बायकोची 20 लक्षणे
बायकोमध्ये हे गुण असतील
तर घरात वाद कधीच होणार
नाहीत.
१. संसार म्हणजे नवरा बायको
दोघेच नसून संपूर्ण कुटुंब असते
तर संपूर्ण कुटुंबाशी प्रेमाने वागने.
२. सासर मधील वडीलधाऱ्या लोकांना
उलट उत्तर देऊ नये. व त्यांच्यासमोर
उर्मट वागू नये.
३. घरातील स्त्रीने किंवा बायकोने
नेहमी मनमिळाऊ असावे.
४. जर तुमच्या नवऱ्यावर एखादे मोठे
संकट आले तर नवऱ्याच्या पाठीमागे
खंबीरपणे तुम्ही बायको म्हणून उभे
राहिले पाहिजे. त्याला आधार दिला
पाहिजे. समजून घेतले पाहिजे.
५. प्रत्येक स्त्रीला जबाबदाऱ्या सांभाळून
छंद आणि स्वतःचे कर्तुत्वाकडे लक्ष देता
आले पाहिजे.
Husband wife Relationship Tips
६. सासरमध्ये दुसऱ्यांना शहाणपण
शिकवण्याचा प्रयत्न करू नये.
७. स्त्रीने नेहमी स्वतःबरोबर दुसऱ्याच्या
आनंदात भर कशी पडेल यासाठी प्रयत्न
केले पाहिजेत.
८. घरातील गोष्टी किंवा घरातील
वाद विवाद बाहेर जाऊन सांगू नये.
९. आपल्यामुळे घरात भावाभावामध्ये
किंवा बहिण भावामध्ये किंवा
मायलेखांमध्ये भांडण होईल असे वर्तन
ठेवू नये.
Husband wife Relationship Tips – नवरा बायको नाते
१०. घरामधील शूल्लक तक्रारी नवऱ्याला
वारंवार सांगू नका. कारण त्यामुळे त्यांचे
कामाकडे दुर्लक्ष होऊन यश प्राप्त करू
शकणार नाही.
११. नवरा जर कोणत्या काळजी मध्ये
असेल… टेन्शनमध्ये असेल तर त्यांची
चौकशी करून त्यांना मानसिक आधार
देणे बायकोचे प्रथम कर्तव्य आहे.
१२. माहेरच्या लोकांसमोर चुकूनही
आपल्या नवऱ्याचा अपमान करू नये.
१३. जर नवऱ्याबरोबर भांडण झाले
तर लगेच माहेरी निघून जाणे चुकीचे
आहे. कारण नवरा बायकोतील भांडण
हे माहेरी सांगितल्यामुळे आपल्याच
नवऱ्याची बदनामी होते व त्यांच्या
कमीपणा होतो.
१४. आपल्या घरातील सासू – सासरे
दीर – जाऊ नणंद इतर कोणतेही
नातेसंबंधांची बाहेर जाऊन निंदा
करू नये.
Husband wife Relationship Tips – नवरा बायको नाते
१५. नवरा जर रागात असेल त्यावेळेस
बायकोने शांत राहणे योग्य असते.
कारण भांडण हे जास्त लांबत नाही
संसार म्हटले तर स्त्रीने
समजूतदारपणाने घेतलेच पाहिजे.
१६. जर नवरा कमी कमवत असेल
तर त्याला समजावून घेणे व सुखी
संसारासाठी adjustment करणे
खूप गरजेचे आहे. नवरा बायको
दोघांनीही जे असेल त्यात समाधान
मानून संसार सुखी करावा.
१७. जर सासरमध्ये अपमान होत
असेल तर त्याचे उत्तर योग्य
भाषेत व मर्यादे मध्ये राहून द्यावे.
१८. सासरमध्ये जर सतत चूक काढत
असतील तर थोडे दिवस किमान
ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करा.
आणि सर्वांचे मन जिंकण्याचा प्रयत्न
करावा. तसे नाही झाले तर दुसऱ्यांना
बोलण्यापेक्षा आपल्या कामातून स्वतःचे
वेगळे अस्तित्व निर्माण करा.
१९. सुखी संसार हवा असेल
तर लहान-सान तक्रारी करू नये.
२०. नवरा जर तुमच्याशी पूर्वीपेक्षा वाईट
वागत असेल… तर त्यांच्या मनात
तुमच्याविषयी काही गैरसमज झाला
आहे का..? याची विचारपूस करून घेणे
व त्याचा खुलासा करून योग्य बाजू मांडणे.
Bayko | उत्तम बायकोची 20 लक्षणे | 20 Good Habits of Wife |
Husband Wife Relationship | Sunder Vichar
चांगल्या नवऱ्याची २० लक्षणे | 20 Good Habits of Husband
husband wife relationship | best lines
चांगल्या नवऱ्याची २० लक्षणे
प्रत्येक स्त्रीला असा नवरा मिळाला
तर तिचे जीवन सुखी…. आनंदी….
आणि समाधानी होते…!
१. एक आदर्श पती हा बायको बरोबर
नेहमी प्रामाणिक व एकनिष्ठ राहतो.
२. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
एक आदर्श नवरा / पती आपल्या
बायकोवर कधीही संशय घेत नाही
तिला पूर्ण स्वातंत्र्य देऊन तिच्यावर
विश्वास ठेवतो.
३. आदर्श पती आपल्या बायकोला
कधी रागाने मारहाण करत नाही.
४. चार चौघात बायकोचा अपमान
न करता एकांतात तिची समजूत
काढतो.
५. एक आदर्श नवरा बायकोला
मानसन्मान देतो. कारण घरातील
इतर कोणाकडूनही जरी मानसन्मान
मिळाला नाही, तरी नवऱ्याकडून तो
मिळावा ही बायकोची प्रामाणिक
अपेक्षा असते.
चांगल्या नवऱ्याची २० लक्षणे | 20 Good Habits of Husband
husband wife relationship | best lines
६. बायको ज्या वेळेला आजारी
असते तिची तब्येत बरी नसतांना
तिची चिडचिड आणि अस्वस्थता
समजून घेतो. या दिवसात तिची
काळजी घेतो.
७. स्वतः बायकोचे कौतुक करून
आणि तिच्यातील चांगल्या गुणांचे
कुटुंबात व घराबाहेर सुद्धा तोंड
भरून कौतुक करतो.
८. एक चांगला नवरा कुटुंबाच्या
भविष्याबद्दल आणि महत्त्वाच्या
नियोजनाबद्दल आणि एखाद्या
महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बायकोशी
चर्चा करतो. तिचे मत विचारतो.
तिला महत्व देतो.
९. बायकोचे आणि घरातील लोकांचे
जर भांडण लागले… तर स्वतःच्या
घरच्यांचे व बायकोचे मत सुद्धा….
तिची बाजू तिचे म्हणणे समजून घेतो.
१०. जुनी भांडणे आणि घडून गेलेल्या
गोष्टी उगाळत न बसता आनंदी आणि
उज्वल भविष्यासाठी बायकोची साथ देतो.
चांगल्या नवऱ्याची २० लक्षणे | 20 Good Habits of Husband
husband wife relationship | best lines
११.आपले कुटुंब घरदार सर्व काही सोडून
तुमच्या घरी आलेली आणि तुमच्या घराला
तिन सर्वस्व मानलेली बायको रागावलेली
असेल तर… तिची हळुवार समजूत काढा.
१२. तिची जर चिडचिड राग राग होत
असेल तर कारण विचारा. घर काम
मुलांचा अभ्यास ही काही फक्त बायकोची
एकटीची जबाबदारी नाही…! हे जाणतो
आणि हातभार लावतो.
१३. बायकोच्या प्रगतीला हातभार
लावून तिला प्रोत्साहन देतो.
१४. दिवसभर घरातच वावरणाऱ्या
बायकोचे मन प्रसन्न करण्यासाठी
तिला किमान विकेंडला किंवा जमेल
तसे बाहेर फिरायला नेतो.
१५. ऑफिस किंवा कंपनीतील
कामाचा ताण… राग… बायको
मुलांवर गाऊन काढत नाही.
१६. बायकोला योग्य ते स्वातंत्र्य देतो
तिला गुलामाप्रमाणे स्वतःच्या बंधनात
ठेवत नाही.
१७. ऑफिस किंवा कामाच्या ठिकान
चे किस्से बायको सोबत शेअर करतो.
बायको घर काम करते म्हणून तिला
कमी लेखक नाही. तिचे काम सुद्धा
तितकेच महत्त्वाचे आहे, हे तो जाणतो.
चांगल्या नवऱ्याची २० लक्षणे | 20 Good Habits of Husband
husband wife relationship | best lines
१८. बायको ही नेहमी नवऱ्याच्या
घरच्यांचा आदर करते. त्यांना
मानसन्मान देते. त्यांच्या आनंदाचा
विचार करते. म्हणून चांगला नवरा
हा बायकोच्या माहेरच्या लोकांचा
आदर करतो.
१९. एक लक्षात घ्या जो पुरुष योग्य
पती असतो. त्याला माहीत असते की
संसार हा एकजुटीने समजूतदारपणाने
होतो. त्यामुळे तो बायकोशी योग्य
वर्तणूक ठेवतो.
२०.बायकोच्या नवऱ्याकडून काही अपेक्षा
असतात. तशाच नवऱ्याच्याही बायको
कडून काहीतरी अपेक्षा असतात. आणि
त्या नवऱ्याच्या अपेक्षेनुसार बायको जर
वागली तर नवरा कधीही तिच्याशी
गैरवर्तन करत नाही. त्याचबरोबर नवराही
तिच्याशी व्यवस्थित वागला तर बायकोही
काही चुकीचे वागत नाही. सुखी संसाराची
हेच रहस्य आहे की… नवरा बायको
एकमेकांना समजून घेतात. एकमेकांच्या
अपेक्षा पूर्ण करतात…
चांगल्या नवऱ्याची २० लक्षणे |
20 Good Habits of Husband |
husband wife relationship | Good Thoughts
नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये जर एखादा विचार
तुम्हाला पटला नसेल… तर त्याबद्दल क्षमा असावी.
पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मात्र
मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला
तर जास्तीत जास्त लोकांना शेअर जरूर करा. तसेच चॅनल वर
नविन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
#goodhabits
#marathisuvichar
#beautiful
नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये जर एखादा विचार
तुम्हाला पटला नसेल… तर त्याबद्दल क्षमा असावी.
पण ही पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर मात्र
मला कमेंट करून नक्की सांगा आणि पोस्ट आवडली
तर जास्तीत जास्त लोकांना शेअर जरूर करा. तसेच संकेतस्थळावर
नविन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
Please Support Me
Your Queries
नवरा कसा असावा
चांगल्या नवऱ्याची लक्षणे
योग्य पती कसा शोधावा
योग्य पतीची लक्षणे कोणती
नवरा बायको प्रेम
husband tips
how to husband handle tips
wife husband relationship
नवरा कसा सांभाळावा
नवऱ्याच्या काही अपेक्षा
चांगली बायको म्हणजे काय
चांगली बायको
चांगल्या बायकोची लक्षणे काय असतात
husband wife motivational video
wife good habits
good habits for wife in marathi
good habit
good thought
happy thought
motivational speech marathi
motivational speech
inspirational quotes
Marathi quotes
marathi motivational speech
husband wife relationship
husband wife good habits
सुखी संसार कसा करावा
सुखी संसाराचे रहस्य
बायकोची जबाबदारी
चांगली बायकोची लक्षणे कोणती
संसारासाठी आवश्यक गोष्टी
स्त्रीची चांगली लक्षणे
स्त्रीने नेहमी आनंदी कसे राहावे
संस्कार सुविचार
चांगले संस्कार
मराठी सुविचार
सुविचार दाखवा
नवरा बायको नाते
नवरा बायको मधील प्रेम सुविचार
#motivation #wife #wifeandhusbandrelationship #bestlines #positivethoughts #marathisuvichar #goodhabits #happiness #husband
#bayko #SUVICHAR #happiness #emotional #navara_bayko
#wife #husband #emotional #SUVICHAR #motivational #bestlines #husbandwife #utsahijeevan #reletionshiptips #wifeandhusbandrelationship #happiness #goodvibes #navarabayko
हे हि वाचायला आवडेल
Wonderfully written article. What a fantastic creature. Thank you for sharing.VB Good Thoughts