Bayko Suvichar | बायको नावाचे वादळ |
बायकोवर कविता | सुविचार
बायको नावाचे वादळ….! – बायकोवर कविता |
बायको नावाचे वादळ दोस्ता…
मोठे विचित्रच असते.
नवरा नावाच्या इकडेतिकडे
भिरभिरणा-या फुलपाखराला
हे वादळ… एकाच फुलामध्ये गुंतवून ठेवते.
जर का आपण आजारी पडलो…
तर या वादळाला झोपच लागत नाही.
जर आपण बाहेरगावी गेलो…
तर तेव्हा हे वादळ
शरीराने जरी घरात असते….
पण मनानेती आपल्याभोवती फिरत असते.
जेव्हा आपण उदास असतो नां
तेव्हा या वादळाच्या ओठावर
हसु फुलत नाही.
आपण आनंदात असतांना
या वादळाचे दु:ख चेह-यावर येत नाही.
Bayko Suvichar | बायको नावाचे वादळ |
बायकोवर कविता | सुविचार
थोडक्यात काय तर….
या वादळामुळेच आयुष्यात आपल्या चैतन्य आहे.
बाहेरच्या लखलखाट दुनियेत कितीही फिरलो…
तरी संध्याकाळी घरी जाण्याची जीओढ लागते नां
त्याचे कारण हे वादळच आहे.
खरे महत्व या वादळाचे
साठीनंतरच्या वयातच समजते…!
जरी सगळे जग विरोधात गेले
तरी ही हे वादळ आपला हात सोडत नाही.
जेव्हा पोटात आपल्या घास जातो….
तेव्हाच या वादळाला ढेकर येतो.
आपल्या उतरत्या वयात आपल्याला
जगायचे कारण फक्त आणि फक्त
एकच असते… ते म्हणजे हेच वादळ…!
पाहीजेच दोस्ता पाहीजेच
प्रत्येकाच्या आयुष्यात