Benefits of Meditation | ध्यान कसे करावे | ध्यानाचे फायदे

0
774
Benefits of Meditation- ध्यान कसे करावे - ध्यानाचे फायदे
ध्यान-कसे-करावे-ध्यानाचे-फायदे-मेडीटेशन-Benefits-of-Meditation-In-Marathi

Benefits of Meditation |
ध्यान कसे करावे | ध्यानाचे फायदे

ध्यान-कसे-करावे-ध्यानाचे-फायदे-मेडीटेशन-Benefits-of-Meditation-In-Marathi-dhyan-dharna-yog-health-lifestyle-vb-vijay-bhagat
ध्यान कसे करावे – ध्यानाचे फायदे – मेडीटेशन – Benefits of Meditation In Marathi 
ध्यान केल्याने आपल्याला मन:शांती, आनंद, आरोग्ययांचे लाभ होऊन परिपूर्ण,
तणाव मुक्त आणि चिंतामुक्त जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.
आपल्या शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य लाभ आहेत.
तसेच ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी 
पटीने जास्त आहे.
शरीराला आराम जितका जास्त गहन, शरीराचे म्हणा किंवा मनाने आपले काम तितकेच 
जास्त गतिशील.

Benefits of Meditation |
ध्यान कसे करावे | ध्यानाचे फायदे

ध्यानाचे होणारे लाभ शरीरासाठी

ध्यान केल्यामुळे आपल्या शरीर तंत्रा मध्ये अनेक बदल होतात आणि आपल्या
शरीराच्या प्रत्येक भागात अधिक प्राणशक्ती भरली जाते. यामुळेआपल्याला खूपच
आनंद आणिशांतीचा अनुभव होतोआणि आपला उत्साह कित्येक पटीने वाढतो.

शरीरातील उच्च रक्तदाब कमी होतो.

मानसिक तणाव आणि त्यामुळे होणारे डोकेदुखी, अनिन्द्रा, स्नायूं, आणि सांधेदुखी च्या 
तक्रारी दूर होतात. रक्तात लॅक्टिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने मनात वेगळीच भीती 
निर्माण होते, रोगी काहीही कारण नसतांना उगाच भीत राहतो… 
ध्यानाने रक्तातील लॅक्टिक अॅसिडचे प्रमाण कमी होते. आणि भीती नाहीसी होते. 
त्याच प्रमाणे सेरोटोनीन निर्मिती वाढते, यामुळे आपला मन प्रफुल्लित राहतो आणि 
सहजच आपल्या व्यवहारामध्ये फरक पडतो.
आपली रोगप्रतिकारही शक्ती वाढते.

ध्यानाचे होणारे लाभ मनासाठी.

नियमित ध्यान केल्याने…. विनाकारण नेहमी लागणारी भीती कमी होते.
भावनात्मक स्थिरता वाढते. आनंद वाढतो. परिस्थितीचे स्पष्टपणे आकलन 
करण्याची क्षमता वाढते आणिमानसिक शांततामिळते.
एकाग्रता वाढल्यामुळे मन तीक्ष्ण होते आणि निर्णय क्षमता वाढते…
विस्तारित चेतना जर तीक्ष्णनसेल तर क्रियाशीलता अथवा प्रगती होणे शक्य नाही.
तीक्ष्ण मन आणि विस्तारित चेतना यांचा समतोल असेल तर परिपूर्णता येण्यास 
मदत होते.
आपल्यातील वृत्तींमुळेच आपण आनंदी किंवा दु:खी होतो हे ध्यान केल्याने लक्षात येते.

Benefits of Meditation |
ध्यान कसे करावे | ध्यानाचे फायदे

ध्यान कसे करावे

 

ध्यान ( Meditation ) करण्यासाठी शांत जागा, किंवा सामसूम असलेला कमरा 
निवडावा. सुखासन किंवा ज्या आसनात आरामात बसता येईल त्यासुखकारक 
आसनात बसावे. जर खाली बसायला त्रासदायक वाटत असेल किंवा बसायला दुसरा 
कोणताही त्रास असेल तर खुर्चीवर हि बसून ध्यान करता येतो.
शवासनात आपण पायाकडून डोक्यापर्यंत शरीर शिथिल करतो. इथे मात्र उलट म्हणजे
डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक असे शिथिल करीत जावे.
सुखपूर्वक आसनस्थित झाल्यावर डोळे मिटून घेऊन वर सांगितल्या प्रमाणे डोक्यापासून
पायापर्यंत अवयव एकामागून एक अवयव आठवून क्रमाने शिथिल करीत जावे.
कपाळ, कान, गाल, मान, पाठ ते नितंबापर्यंत, त्यानंतर गळ्यापासून ते पोटापर्यंत
नंतर हात व पाय असा क्रम ठेवावा. पोटाचा विचार करताना श्वासाचा विचार अवश्य 
करावा. 
ह्या सर्व प्रकाराला एक ते दीड वा जास्तीत ज्यास्त दोन मिनिटे पुरे होतात.
आता आपण साक्षी भावनेनेअभ्यास करावा. याने मन शांत राहते. त्याचा अनुभव घ्यावा.
आपण सुखकारक स्थितीत असलो तरी शवासनस्थ नसल्यामुळे झोप लागण्याची
शक्यता कमी असते. परंतु सवयीच्या अभावामुळे १५ मिनिटात आपल्याला उठण्याचे 
मन होतेच किंवा पायांना मुंग्या आल्यासारखे वाटते. नाहीतर वेळ समजण्यासाठी 
घड्याळाचा आलार्मलावण्यास काहीही हरकत नाही.
सावकाश डोळे उघडावे. हातापायाची जाणीवपूर्वक हालचाल करावी. उत्तम ध्यान 
( मेडीटेशन ) जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते व हृदयाचे ठोकेही 
मंद होतात. म्हणून मेडीटेशन मधून सावकाश बाहेर येत उभे रहाणे श्रेयस्कर होय.

ध्यान का करावे…?

ध्यानामध्ये काय शक्ति आहे…?

सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे…?

जेव्हां 100 लोक एकत्रितपणे ध्यान म्हणजेच साधना करतात तेंव्हा त्यांच्या तरंग 
जवळजवळ 5 कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून
सकारात्मकता निर्माण करतात.
आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन 
केल्यास, तो त्याच्या जवळीलअनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण 
अणुविस्फ़ोट म्हणतो.
हीच गोष्ट आपल्या ऋषी मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की,
जगातील केवळ 5 टक्केलोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत 95 टक्के
लोकांना होतो.
आपणसुद्धा जर 90 दिवस सततध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर
व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.
जर जगातील फक्त 10 टक्के लोक ध्यान करतील तर जगातील सर्व समस्या नष्ट 
करण्याची शक्ती ध्यानामध्ये आहे.
महर्षी महेश योगी यांनी 1993मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी 4000
शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास 
सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी झाले.
शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला “महर्षी इफेक्ट
असे नाव दिले. ध्यानामधील ही शक्तीआहे.
आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात
साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here