Best Moral story in marathi | हुशार राजा, बोधकथा, Bodhkatha

0
388
Best Moral story in marathi | हुशार राजा, बोधकथा, Bodhkatha
best-moral-story-in-marathi-हुशार-राजा-बोधकथा

मित्रांनो ही कहाणी जगण्याला
दिशा देणारी मराठी प्रेरणादायी बोधकथा आहे.
एकदा शांत मनाने पुर्ण कहाणी नक्की वाचा.

Best Moral story in marathi | हुशार राजा
बोधकथा | Motivational Story In Marathi

मिञांनो ही एक अश्या राज्या ची
कहाणी आहे जिथे पाच वर्ष पूर्ण
झाल्यावर राजा बदलत असे.

मित्रानो कोणत्याही राजा चे जेव्हा
पाच वर्ष पूर्ण झाले… तेंव्हा त्या
राजाला बदलत असतात आणि या
जुन्या राजाला अतिशय घनदाट अशा
एका जंगलामध्ये पाठवत असतात.

जिथे खाण्या पिण्याची अजिबात सोय
नसते. आणि तिथे खूप जंगली प्राणी
असतात, जे त्यांना खाऊन टाकत
असतात.

मित्रानो त्यानंतर एका राजा चे
पाच वर्ष पूर्ण होतात आणि मग
त्या राजाला नवीन कपडे घातले
जातात आणि त्या राजाला एका
हत्तीवर बसवून त्या राजाला
शेवटचा नमस्कार करण्यासाठी
त्याला एका बोट मध्ये बसवले जाते.

आणि त्यानंतर त्या राजाला पाठवले जाते
अश्या जंगलामध्ये जिथे खाण्या पिण्यासाठी
काहीच सोय नसते आणि तिथे जंगली प्राणी
खूप असतात जे त्यांना खाऊन टाकत असतात.

मित्रानो जसे त्या राजाला त्या जंगलामध्ये
पाठवले जाते, त्यानंतर त्या राज्याचे लोक
विचार करतात की आता आमच्या राज्याचा
नविन राजा कोण बनणार…..?

Best Moral story in marathi |
हुशार राजा | बोधकथा | Bodhkatha

त्यानंतर त्या राज्यातील लोकांना कळते की
आपल्या राज्यामध्ये एक असा व्यक्ती आहे,
जो खूप हुशार आहे आणि त्याला आपल्या
राज्याचा राजा बनवला पाहिजे.

त्या नंतर त्या राज्याची सर्व लोक त्या हुशार
व्यक्तीला भेटण्यासाठी जातात आणि त्या हुशार
व्यक्तिला विनंती करतात की तुम्ही आमच्या
राज्याचे नवीन राजा बनणार काय…..?

तर तो हुशार व्यक्ती त्यांना नाही म्हणतो,
कारण त्याला आधीच सांगितले जाते की
आमच्या राज्यामध्ये दर पाच वर्षाला
राजा बदली केला जातो आणि त्या राजाला
एका अश्या जंगला मध्ये पाठवले जाते….

जिथे त्याला खाण्या पिण्यासाठी काहीच
नसते आणि त्या जंगला मध्ये खूप जंगली
प्राणी असतात जे त्यांना खाऊन टाकतात.

त्यानंतर त्या राज्याची सर्व लोक त्या
हुशार व्यक्ति ला खूप विनंती करतात
की तुम्ही खूप हुशार आणि चतुर आहात
आणि तुम्ही आमच्या राज्याला खूप
चांगल्या प्रकारे चालवाल.

त्या सर्व लोकांच्या विनंती नंतर
तो हुशार व्यक्ती त्या राज्याचा
राजा बनण्यासाठी तयार होतो.आणि
त्या राज्याच्या लोकांच्या सर्व अटींना पण
स्वीकारतो. की मला माझे पाच वर्षे पूर्ण
झाल्यानंतर मला अशा जागेवरती पाठवले
जाईल जिथे अजिबात जीवन नाही आहे.

त्या नंतर तो हुशार व्यक्ती त्या राज्याचा
नवीन राजा बनतो. तीन दिवसानंतर तो
नवीन राजा आपल्या लोकांना विचारतो की
“कोणते आहे ते ठिकाण जिथे पाच वर्ष पूर्ण
झाल्यानंतर राज्याला पाठवले जाते.”

त्या जागेची माहिती घेतल्यानंतर
तो राजा आपल्या लोकांसोबत
त्या ठिकाणी भेट देतो आणि तिथे
जाऊन पाहतो की तिथे खूप राजांची
मृतदेह पडलेले आहेत. आणि ते जंगल
इतके घनदाट असते की तिथे वेगवेगळ्या
प्रकारची जंगली प्राणी राहत असतात.

हे सर्व पाहिल्यानंतर तो राजा आपली
बुध्दी चालवतो आणि एक जबरदस्त
नियोजन करण्याचा विचार करतो.

मित्रानो तो नवीन राजा
त्या पाच वर्षामध्ये एक
जबरदस्त नियोजन करतो
आणि त्या योजनेवर वर
लगेच काम करायला
सुरुवात करतो.

जेव्हा तो राजा हे पाहतो की
हे खूप घनदाट जंगल आहे
आणि येथे खूप जंगली प्राणी
आहेत आणि माझे पाच वर्ष
पूर्ण झाल्यानंतर मला येथे
पाठवले जाणार आहे….

तेव्हा राजा असा विचार करतो की
“पाच वर्षानंतर मला तर या महालात
अजिबात राहायचे नाही आहे आणि
यासाठी मला काही तरी केले पाहिजे.”

त्यानंतर तो नवीन राजा पहिल्या वर्षी
त्या जंगला मधील सर्व झाडे कापून
काढतो आणि त्या जागेवरच्या अश्या
सर्व वस्तूंना काढून टाकतो, ज्यामुळे
ते जंगल एवढे घनदाट दिसत होते.
आणि तेथील सर्व जंगली प्राण्यांनाही
तेथून काढून टाकतो.

दुसऱ्या वर्षी तो राजा त्या जागे वरती
अजून काम करतों आणि त्या जागेला
असे बनवतो की ते जंगल वाटले नाही
पाहिजे. तिसऱ्या वर्षी त्या राजा ने
त्या जागी शेती चे काम सुरू केले
आणि चौथ्या वर्षी त्या ठिकाणी मोठा
महाल आणि रस्ते बनवणे सुरू केले.

मिञांनो पाचव्या आणि शेवटच्या वर्षी
त्या राजाने त्या ठिकाणावरती घरे
बांधण्यासाठी आणि तिथे लोकांना
राहण्यासाठी पण व्यवस्था करुन
दिली. आणि राजा हे सर्व काम
करण्यासोबत तो बचत ही खूप करत
होता आणि खर्च ही खूप कमी करत होता.

कारण पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर
त्या ठिकाणी सोडल्यावर ते सर्व
पैसे तो खर्च करू शकेल “ज्याला
तो गेल्या पाच वर्षा पासून तयार
करत होता.

Best Moral story in marathi |
हुशार राजा | बोधकथा | Bodhkatha

मित्रानो त्या नंतर जसे त्या राजाचे
पाच वर्षे पूर्ण होतच असतात,
तेव्हा तो राजा आपल्या राज्यातिल
माणसांना असे म्हणतो की….

माझे पाच वर्षे आता पूर्ण होणारच
आहेत. तर तूम्ही मला आता त्या
जागेवर पाठवून द्या, ज्या जागेवर
तुम्ही मला पाठवणार होता.

तेव्हा त्या राज्याचे सर्व लोक त्याला
असे म्हणतात की अजुन तुमची
पाच वर्ष पूर्ण झाली नाही आहेत.
आणि पाच वर्ष पूर्ण होण्यासाठी
अजूनही दहा दिवस बाकी आहेत.

मित्रानो त्या राजाला खूप उत्साह
होत असते, कारण राजाला त्या
ठिकाणी पाठवणार होते…. जिथे
गेल्या पाच वर्षांपासून त्याने त्याच्या
खाण्यापिण्याची आणि राहण्याची
तयारी आधीच करून ठेवली होती.

जसे त्या राजाची पाच वर्षे पूर्ण होताच
त्या राजाला ही नवीन वस्त्रे परिधान
करण्यात येतात. आणि त्या राजाला
शेवटचा निरोप देण्यासाठी त्याला
हत्तीवर बसवून त्याला त्या ठिकाणी
पाठवले जाते.

परंतु त्या राज्यातील लोकांनी
असे पाहिले की , राजाला त्या
ठिकाणी पाठवले जात आहे
तरी ही तो राजा खुश आणि
हसत जात आहे.

मित्रानो याअगोदर दर पाच वर्षानंतर
असे होत होते की जेव्हा पण त्या
राज्यातील राजाचे पाच वर्ष पूर्ण होत
होते… तेव्हा ते सर्व राजे रडत रडत
जात होते. परंतु हा हुशार राजा
हसत हसत जात आहे.

मित्रानो जेव्हा लोकांनी त्या
हुशार राजाला विचारले की
तुम्ही हसत का आहात…..?
म्हणजे तुम्ही इतके आनंदी
का आहात….?

तेव्हा तो हुशार राजा सर्वांना
सांगतो की जेव्हा “तुम्ही ह्या
जगा मध्ये येता म्हणजेच
जेव्हा तुमचा जन्म होतो….
तेव्हा सर्व जग खुश असते
आणि तुम्ही रडत असता…

परंतु जाता जाता असे काही
तरी करून जायचे की संपूर्ण
जग रडेल आणि तुम्ही
हसत हसत जाल.”

Best Moral story in marathi |
हुशार राजा | बोधकथा | Bodhkatha

मित्रानो हे वाक्य तुम्ही
खूप वेळा लोकांच्या
तोंडून ऐकले असेल.

अगदी त्याच प्रमाणेच
त्या राजाने तसे केले..
त्याने आपले आयुष्य
अशे बनवली होती की
तो हसत हसत त्या
ठिकाणी जात होता.

मित्रानो त्यानंतर तो राजा म्हणतो
की याच्या आधी जितके राजा आले
होते… ते त्या पाच वर्षा मध्ये राज्य
चालवण्यात, ऐश आणि मौज मस्ती
करण्यामध्ये एवढे हरवून जात होते की,
ते हे विसरून जात होते की पाच वर्षानंतर
त्यांना एका अश्या ठिकाणी पाठवले जाणार
आहे की जिथे त्यांना मरावे लागणार आहे.

परंतु मी या पाच वर्षामध्ये त्या जागेला
व्यवस्थित केले, कारण मला माहित
होते की पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर
मला तिथे पाठवले जाणार आहे.
एक अश्या ठिकाणी जिथे जीवन
नाही आहे. म्हणून मी त्या वरती
काम केले आणि माझ्याकडे काम
करण्यासाठी हीच वेळ होती.

मी राज्याचा राजा नक्की होतो
पण मी हे विसरलो नाही की
माझी येणारी वेळ कशी असणार
आहे. म्हणून मी माझ्या भविष्याचे
नियोजन केले आणि त्या वरती
काम करणे सुरू केले.

मित्रानो तो हुशार राजा
जेव्हा राज्य सोडून जातो
तेव्हा तो आनंदाने जातो.

जाताना तो आपली बचत पण
आपल्या सोबत घेऊन जातो…
जी त्याने गेल्या पाच वर्षामध्ये
केली गेली होती.

राजा बनल्यानंतर त्याने जास्त
खर्च पण केला नव्हता आणि
त्या राजाने आपले भविष्य
सांभाळले आणि त्यावर
त्याने काम केले.

मित्रांनो ह्या कहाणी मधून
आपल्याला हे शिकायला मिळते
की “आपणाला आपल्या
आयुष्यामध्ये थोडीच वेळ मिळते
आपल्या आयुष्याला चांगल्या
प्रकारचे बनवण्यासाठी.”

मित्रानो जर तुम्ही पण माझ्या
वयाचे असाल म्हणजेच तुमची
वय अठरा ते पंचवीस वर्षाच्या
मध्ये आहे तर ही वय तुमची
सुवर्णकाळ आहे.

मित्रानो ह्या सुवर्णकाळा मध्ये
तुम्हाला जेवढा पण जोश मिळत
आहे आणि तुमच्यामध्ये जेवढा पण
उत्साह आहे ती तुमच्या दुसऱ्या
वया मध्ये नसते. म्हणून ह्या
वयामध्ये मध्ये तुम्हाला एवढी
मेहनत करायची आहे की तुमचे
पुढचे भविष्य चांगले झाले पाहिजे.

कारण मित्रानो जर तुम्ही ह्या
वयामध्ये फक्त मौजमजा आणि
फुकट वेळ वाया घालवत असाल
तर, पुढे भविष्यात असे होऊ शकते
की तुम्हाला पण बाकी राजानं प्रमाणे
एक अश्या जंगलामध्ये जावे लागेल
म्हणजेच अश्या गरिबी मध्ये जगावे
लागेल जिथे तुम्हाला तुमची गरिबीच
खाऊन टाकेल.

मित्रानो जर तुम्ही त्या हुशार
आणि अलौकिक बुद्धीमत्ता
असलेल्या राजा प्रमाणे आपल्या
आयुष्याचे नियोजन केले आणि
त्यावर काम करणे आता पासूनच
सुरू केले तर तुमच्या येणाऱ्या
काळामध्ये तुमचे आयुष्य तुम्ही
चांगल्या प्रकारे जगू शकाल.

मिञांनो अगदी त्या हुशार आणि
चतुर राजा प्रमाणे… ज्याने
आपल्यासाठी त्या घनदाट
जंगलाचे रूपांतर एका राज्या
मध्ये केले होते….!

एक संपूर्ण असे एक वेगळे
राज्य बनवले होते.

मित्रांनो, तुम्ही तुमच्या
आयुष्यातील राज्य बनवत
आहात की फक्त तुमच्या
आयुष्याच्या राज्याला फक्त
जंगलच जंगल बनवत
आहात…..?

मित्रानो ही कहाणी तुम्हाला
तुमच्या आयुष्यभर लक्षात
राहणार आहे.

Best Moral story in marathi |
हुशार राजा | बोधकथा | Bodhkatha

जरी दहा वर्षानंतर जर कोणत्या
व्यक्तीने तुम्हाला ही कहाणी
ऐकवली तरी तुम्ही म्हणाल की
हि कहाणी मी आधी कुठे तरी
ऐकली होती.

कारण मित्रानो कहाणी
आपल्या लक्षात राहते
पण कुणी बोललेले आपण
काही दिवसानंतर
विसरून जातो.

हुशार राजा | Best Moral story in marathi | बोधकथा |
Motivational Story In Marathi | bodhkatha

!! जीवनाची किंमत !!
( जीवनात हरल्यासारखे
वाटत असेल तर नक्की बघा..)

एकदा एक व्यक्ती एकटाच उदास
बसला होता. आणि विचार करत
होता की… देवाने त्याच्याकडे यावे.
देवाला समोर पाहून त्या व्यक्तीने
विचारले… ” आयुष्यात खूप अपयश
आले. आता मी निराश झालो आहे.
हे परमेश्वरा… मला सांगा माझ्या या
जीवनाची किंमत काय आहे….?

देवाने त्या माणसाला लाल रंगाचा
चमकणारा दगड दिला. आणि
म्हणाला…. जा या दगडाची किंमत
शोध. तुलाही तुझ्या आयुष्याची
किंमत कळेल. पण लक्षात ठेव..
की हा दगड विकायचा नाही.

तो लाल चमकदार दगड घेऊन
ती व्यक्ती प्रथम एका फळ
विक्रेत्याकडे गेली आणि म्हणाली…
भाऊ तुम्ही हा दगड कितीला
विकत घ्याल….? फळ विक्रेत्याने
त्या दगडाकडे काळजीपूर्वक
पाहिले आणि म्हणाला…
माझ्याकडून दहा संत्री घ्या
आणि हा दगड मला द्या.
तो माणूस म्हणाला की नाही
मी हा दगड विकू शकत नाही.

मग तो माणूस एका भाजी
विक्रेत्याकडे गेला आणि त्याला
म्हणाला… भाऊ तू हा लाल दगड
कितीला विकत घेणार….? भाजी
विक्रेता म्हणाला माझ्याकडून
बटाट्याची पोती घे आणि हा दगड
मला विक. पण देवाच्या
म्हणण्यानुसार ती व्यक्ती म्हणाली
नाही मी ते विकू शकत नाही.

मग त्या व्यक्तीने तो दगड
सोनाराच्या दुकानात नेला.
जिथे अनेक प्रकारचे दागिने
होते. त्या व्यक्तीने तो दगड
सोनाराला दाखवला आणि
त्या सोनाराने त्या दगडाकडे
काळजीपूर्वक पाहिले आणि
मग म्हणाला… मी तुला एक
कोटी रुपये देतो. हा दगड
मला विक. त्यानंतर त्या
व्यक्तीने सोनाराची माफी
मागितली आणि सांगितले
की मी हा दगड विकू शकत
नाही. सोनार पुन्हा म्हणाला…
ठीक आहे… ठीक आहे…
मी तुला दोन कोटी देतो..
हा दगड मला विक.

सोनाराचे बोलणे ऐकून
त्या व्यक्तीला धक्काच
बसला. मात्र त्याने
सोनारालाही नकार
दिला. आणि पुढे तो एका
हिरे विक्रेत्याच्या दुकानात गेला.

हिऱ्याच्या व्यापाऱ्याने दहा मिनिटे
त्या लाल चमकदार दगडाकडे
पाहिले आणि मग एक मलमलचे
कापड घेऊन तो दगड त्यावर
ठेवला. नंतर त्या व्यापाऱ्याने त्या
दगडावर डोके टेकवले आणि
म्हणाला… हे तुला कुठून मिळाले.
हे जगातील सर्वात मौल्यवान रत्न
आहे. जगातील सर्व संपत्ती जरी
गुंतवली तरी हा दगड विकत
घेता येणार नाही.

हे ऐकून त्या व्यक्तीला खूप
आश्चर्य वाटले आणि तो थेट
देवाकडे गेला आणि देवाला
झालेले सगळे सांगितले.
मग त्याने देवाला विचारले…
हे देवा.. आता मला सांगा
माझ्या या जीवनाची किंमत
काय आहे…? देव म्हणाला….
फळविक्रेते…. भाजीविक्रेते…
सोनार… आणि हिरे व्यापारी
यांनी तुला जीवनाचे मूल्य
सांगितले होते.

अरे माणसा….
काहींसाठी तू दगडाच्या
तुकड्यासारखा आहेस तर
काहींसाठी तू मौल्यवान
रत्नासारखा आहेस.

प्रत्येकाने आपापल्या
माहितीनुसार त्या दगडाची
किंमत सांगितली. पण त्या
हिरे व्यापाऱ्याने हा दगड
ओळखला. तसे काही लोक
तुमची लायकी ओळखत
नाहीत… त्यामुळे आयुष्यात
कधीही निराश होऊ नका.

मंडळी या जगातील प्रत्येक
माणसामध्ये काही ना काही
कौशल्य असते. जे योग्य वेळी
विकसित होते पण त्यासाठी
कठोर परिश्रम आणि संयम
आवश्यक असतो….!

मित्रांनो, कथा कशी वाटली ते
कमेंट्स च्या माध्यमातून नक्की
कळवा.. post ला लाईक
आणि शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद

Also Read :-

Marathi Story 

मराठी बोधकथा संग्रह – Moral Story In Marathi | Bodh Katha

 

Your queries :

marathi stories, marathi stories only, marathi moral stories
मराठी कथा, मराठी बोधकथा, मराठी प्रेरणादायी कथा, मराठी कथा गोष्टी

#मराठीstories, #मराठीकथा, #मराठीबोधकथा, #हृदयस्पर्शीकथा, #moralstories
#hearttouchingstory #marathistories #marathimoralstories

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here