Best Motivational Thoughts In Marathi – मराठी सुविचार

0
201
Best Motivational Thoughts In Marathi - मराठी सुविचार
Best Motivational Thoughts In Marathi - मराठी सुविचार

Best Motivational Thoughts In Marathi –
मनाला आनंदीत करणारे सुंदर सुविचार –
प्रेरणादायी मराठी सुविचार

परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात.
शब्दांनाही कोडे पडावे अशी गोड माणसे असतात.
किती मोठे भाग्य असते जेव्हा ती आपली असतात…..!

आणि मित्रांनो तुम्ही आपली आहात… या परिवारातील आहात.
आजही मी तुमच्यासाठी खूप सुंदर असे नवीन सोपे मराठी सुविचार,
सुंदर सुविचार घेऊन आलो आहे. हे प्रेरणादायी सुविचार तुम्हाला
नक्की आवडतील.
या sunder suvichar in marathi मधून तुम्हाला कोणता
marathi suvichar आवडला हे मला कॉमेंट करून नक्की कळवा.

Best Motivational Thoughts In Marathi – मराठी सुविचार

आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर “स्वाद” आणि “वाद”
या दोन्हीचा त्याग केला पाहिजे. “स्वाद” सोडला तर
“शरीराला” फायदा आणि “वाद” सोडला तर “नात्याला” फायदा.

motivational thoughts in marathi - मराठी सुविचार
आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर – sunder suvichar in marathi

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल. पण माझ्यामुळे कोणाचे
नुकसान व्हायला नको. ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस
योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.

आयुष्यात झालेल्या चुकांमुळे जर आपण प्रयत्न करणे थांबवले तर
ते मात्र चुकीचे आहे. त्या चुकांतून शिकणे आणि पुढे जाणे म्हणजे
आयुष्य आहे….!

स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा
पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची
इच्छा निर्माण झाली पाहिजे…..

motivational thoughts in marathi - मराठी सुविचार
सुंदर प्रेरणादायी सुविचार मराठी – सोपे सुविचार मराठी

बोलण्यापूर्वी “शब्द” आणि पेरण्यापूर्वी “बी” कोणते वापरणार याचा
जरूर विचार करा. नंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही. कारण
परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहात.

बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला
दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते.

जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगले सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना तुमच्यातले वाईट सांगायला सुरूवात करतात.

संत” आणि “वसंत” मध्ये एक साम्य आहे. जेव्हा वसंत येतो…
तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा “संत” येतात… तेव्हा “संस्कृती”
सुधारते.

motivational thoughts in marathi - मराठी सुविचार
motivational thoughts in marathi – मराठी सुविचार

ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते
तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो.

हिम्मतीने हारा.. पण हिम्मत हारू नका… प्रत्येकजण हिरा
बनवूनच जन्माला घातला जातो. पण चमकतो तोच जो
घणाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो.

खेळ शिकायचा असेल तर बुध्दिबळाचा शिका. कारण
त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्या
माणसाचा पराभव करत नाही.

Best Motivational Thoughts In Marathi – मराठी सुविचार

motivational thoughts in marathi - मराठी सुविचार
sunder vichar in marathi – चांगले विचार

संयम ठेवा आणि कधीच हार मानू नका.
मोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतोच.

सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही…
परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्की मिळेल…!

आयुष्य आपल्या सामर्थ्यावर जगायला हवे.
दुसऱ्याच्या खांद्यावर तर केवळ अंत्ययात्राच निघते.

सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात
तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवले
तर आयुष्यभर आपण सुखी राहू.

मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही. पण साखरेचा एक
कण जरी असला तरी मुंग्या लागतात. माणसाचे ही तसेच आहे.
गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील. पण मिठासारखा
खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही…! ” ज्याची वाणी
गोड त्याचे आयुष्य गोड असते “

जगणे खूप सुंदर आहे. त्यावर हिरमुसू नका… एक फूल उमलले नाही
म्हणून रोपाला तुडवू नका… सगळे मनासारखे होते असे नाही.
पण मनासारखे झालेले विसरू नका. सुटतो काही जणांचा हात
नकळत. पण धरलेले हात सोडू नका.

” हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा.
जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा.
आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड रहा. कारण
संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा
हिरा ठरतो.

जे हक्काचे आहे ते झगडुन देखील मिळवावे. पण ज्यावर हक्क नाही
ते स्वीकारू नये.

जात हा अपघात आहे. त्याबद्दल “गर्व” कधीच करू नका.
कारण… “काळ” आणि “वेळ” आल्यावर जातीचे नाही तर
“माणुसकीचे” रक्त कामाला येते.

ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे.
परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान अमृत आहे.

वाढत्या वयापेक्षा, वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात…
सुख आपल्या हातात नाही. परंतु सुखाने जगणे हे नक्की आपल्या
हातात आहे.

Best Motivational Thoughts In Marathi – मराठी सुविचार

motivational thoughts in marathi - मराठी सुविचार
good thoughts in marathi

एका मिनीटात तुमचे आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनीट
नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचे आयुष्य नक्की
बदलु शकतो.

आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.
आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे. की…..
भविष्याचा विचार करत बसायचे. की…आलेला क्षण जगायचे
हे आपण ठरवायचे

आपली चांगली वेळ जगाला सांगते की…आपण काय आहोत.
परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की…. जग काय आहे.

छोटसे आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा
जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.

Best Motivational Thoughts In Marathi – मराठी सुविचार

स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्याच्या चुका दाखवून
आपले व्यक्तिमत्व सिद्ध होतं नसते….!

सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे.
आयुष्यात सावकाश चाला काही हरकत नाही. पण चालतांना असे चालायचे
की आपल्या कर्तृत्वाचीआणि मनमिळावू स्वभावाची… आत्मिक समाधान
लाभलेल्या मनाची…आणि दैदिप्यमान यशाची…. सोनपावले सदैव मागे
उमटली पाहिजे.

मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचे सौंदर्य
खुलून दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले
तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही.

सुविचार मराठी – चांगले विचार

Best Motivational Thoughts In Marathi –
मनाला आनंदीत करणारे सुंदर सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

हे सुविचार एकदा नक्की वाचून बघा

Relationship Quotes On Marathi | नाती सुविचार | Nati Suvichar
नाते सुविचार | Marathi Suvichar Quotes On Relationship
कसे कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात | सुंदर कथा | marathi story
कसे कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात |
सुंदर कथा | marathi story
कसे कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात |
सुंदर कथा

एका राजा आपल्या राज्यात सुखाने राहत होता. त्याची प्रजा सुध्दा सुखी होती.
राजाविरोधी कोणत्याही प्रकारची तक्रार जनतेत पहायला मिळत नव्हती.

असेच एक दिवसराजा स्वतःची कुंडली पाहत होता आणि कुंडली पाहता पाहता
त्याच्या मनात एक विचार आला की आपण ज्या दिवशी जन्म घेतला असेल त्या
दिवशी या जगात बाकी लोकांनी सुध्दा जन्म घेतलाच असेल. पण बाकीचे लोक
माझ्यासारखे राजा का बनले नाहीत. आणि तो या प्रश्नाचा विचार करायला लागला…

तो अस्वस्थ झाला होता. आणि त्याने लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या सर्व मंत्र्यांची सभा बोलावली.
राजाचे असे अचानक बोलावणे ऐकून सगळे भयभीत झाले आणि दुसऱ्या दिवशी सभेत लगेच
हजर झाले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण सभा मंत्र्यांनी भरली तेव्हा राजाने त्याच्या मनात आलेल्या
प्रश्नाला सभेत मांडले.

त्याने सर्व मंत्र्यांना विचारले की जेव्हा माझा जन्म झालेला असेल तेव्हा राज्यात किंवा
जगात बऱ्याच लोकांचा जन्म झालेला असेल. मग माझ्या जन्माच्या वेळी जन्मलेले
व्यक्ती राजा का बनले नाहीत. कोणत्याही मंत्र्याजवळ या प्रश्नाचे उत्तर नव्हते.

तेव्हा सभेतील एका वृध्द व्यक्तीने राजाला सांगितले की राजा आपल्या या प्रश्नाचे उत्तर
जंगलात एक बाबा राहतात ते देऊ शकतात. राजाने क्षणाचाही विलंब न करता
जंगलात धाव घेतली. आणि तो जंगलात त्या बाबाच्या शोधात गेला.

Best Motivational Thoughts In Marathi – मराठी सुविचार

बरेच दूर जंगलात गेल्यानंतर त्याला ते बाबा दिसले. ते बाबा कोळसे खात होते.
पण त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते. म्हणून तो बाबा जवळ गेला आणि
त्याने त्याच्या मनातील प्रश्न बाबांना विचारला. तेव्हा बाबांनी त्याला सांगितले की
माझ्याजवळ तूझ्या या प्रश्नाचे उत्तर नाही आहे. हे ऐकून राजा निराश झाला
पण बाबाने त्याला सांगितले की याच जंगलात समोर आणखी एक बाबा राहतात
त्यांना जाऊन विचार त्यांच्याजवळ तुझ्या प्रश्नाचे उत्तर भेटून जाईल.

राजा लगेच त्या जंगलात समोर दुसऱ्या साधू बाबाच्या शोधात निघाला. जंगलात
थोडा पुढे गेल्यानंतर त्याला एक साधू बाबा दिसला. तो साधू बाबा माती खात होता.
राजाला पाहून आश्चर्य वाटले पण त्याला त्याविषयी काही देणेघेणे नव्हते. त्याला
त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते. तो बाबा जवळ गेला आणि त्याने आपला प्रश्न विचारला
तेव्हा त्या बाबा ने सुध्दा त्याला सांगितले की या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही. पण
तुला जर उत्तर पाहिजे असेल तर शेजाराच्या गावात एक विद्वान व्यक्ती राहतो…
जो सर्वकाही जाणतो. त्याच्याजवळ जाऊन हा प्रश्न विचार. तो विद्वान त्याच्या जीवनाचे
शेवटचे काही क्षण जगत आहे. लवकर गेलास तर तुला प्रश्नाचे उत्तर मिळेल.

राजाला ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर राग आला होता. पण काय करणार त्याला त्याच्या
प्रश्नाचे उत्तर हवे होते. त्याने जवळच्या गावाकडे धाव घेतली आणि गावात पोहचला.
त्याने गावात त्या व्यक्तीविषयी विचारले तेव्हा राजाला लोकांनी त्या व्यक्तीजवळ पोहचवले.
राजा त्याच्याजवळ गेला आणि त्याला मनातील प्रश्न विचारला तेव्हा त्या व्यक्तीने राजाला
प्रश्नाचे उत्तर देतांना सांगितले की…

मागच्या जन्मात आपण चार भाऊ होतो आणि चौघे एकदा एका जंगलात रस्ता
भटकलो होतो. आणि आपल्या जवळील खायच्या वस्तू सुध्दा संपायला आल्या होत्या.
आपल्याजवळ थोडेशेच पीठ शिल्लक होते. ज्यामध्ये फक्त चार भाकरी झाल्या होत्या.
तेवढ्यात आपल्या जवळ एक भुकेला व्यक्ती आला होता आणि त्याने आपल्याजवळ
अन्नाची मागणी केली होती. पण आपल्यापैकी मोठ्याने त्या व्यक्तीला असे म्हणत दूर
केले की… तुला मी ही भाकरी दिली तर मी काय कोळसे खाऊ का….? तसेच दुसऱ्याने
म्हटले की तुला भाकरी दिली तर मी काय माती खाऊ का…? मी सुध्दा त्याला नकार
दिला होता. पण तुम्ही त्याला तुमच्या हिश्याची भाकरी खायला दिली होती आणि त्याने
तुम्हांला आशीर्वाद देऊन तो तेथून निघून गेला होता.

आता राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. त्याला कळले होते
की केलेल्या चांगल्या कर्मामुळे तो आज त्या ठिकाणी होता तर या
गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळते की कर्माचे फळ हे मिळतेच
ते चांगले असो की वाईट. म्हणून आपल्या हातून चांगले कर्म होतील असे
काम करा. कारण कर्माचे फळ एक ना एक दिवस नक्की मिळतेच.

पाच मिनिटे वेळ काढून नक्की ऐका….
कसे कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात |
सुंदर कथा | marathi story

गोष्ट आवडल्यास Like, Share करा. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी
चैनल ला subscribe करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here