Birthday Wishes For Daughter In Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

3
1864
Birthday Wishes For Daughter In Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुलीच्या-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-लाडक्या-लेकीचा-वाढदिवस-congratulation-on-your-daughter

Birthday Wishes For Daughter In Marathi |
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाडक्या लेकीचा वाढदिवस…!
प्रिय अश्र्विनी….. २७/०६/२००७ ला इवलीशी चिमणी होऊन
तु आमच्या घरात आलीस आणि माझे पूर्ण आयुष्यच बदलले…!
आज त्याला 13 वर्ष पूर्ण झाली. आता तू किती भराभर सगळे बदलत…
किती लवकर मोठी होत आहेत… वयाने आणि समजूतदार पणे.
तुझ्या जन्मानंतर जवळपास महिने मी तुला हातात घेतले नाही.
तुला हातात घ्यायची भीती वाटायचीएका हातावर झोपणारी तू
पायाचा झोका करुन खेळणारी तु आज माझीच आई सारखी माया
प्रेम आणि काळजी करतेस.
 
13 म्हणजे हे काही फार मोठे वय नाही, पण तु तर लहान पणा पासून ते
आता पर्यंत कधी हे पाहिजे किंवा ते पाहिजे म्हणून हट्ट केलेला आठवत नाही.
तसाच कधी रड़ा पड़ केलेले ही आठवत नाही. तरीही तुझ्याच किलबिलाटाने
पूर्ण घर भरून जायचे….
बेटा… तू खेळण्यापेक्षा पुस्तकातच जास्त रमलीस... दुस-या मुलांसारखे
टिव्ही मध्ये गुंगु राहण्यापेक्षा जेंव्हा तु हातात पेन्सिल घेऊन द्रविंग वहीत चित्र 
रेखाटण्यासाठी बसतेस तेंव्हा मी खूप सुखावतो…
 
किती गुणी आणि समंजस आहेस तू…. आज हे लिहीत असतांना तुझ्या 
जन्मापासून ते आज पर्यंतचे काही प्रसंग आठवले….

Birthday Wishes For Daughter In Marathi |
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 
तुझ्या जन्माच्या वेळी दवाखान्यात जागून काढलेली ती रात्र आठवली.
सध्या कामामुळे तुला जास्त वेळ देता येत नाही तरीही तुझी आठवण 
रोज येते आणि आपल्यावर जीवापाड़ प्रेम करणारी ही लेक एक दिवस 
लग्नानंतर आपल्याला सोडून जाणार या साध्या कल्पनेनेच मला रडू येते.
 
मागच्या वर्षी तुझ्या वाढ दिवसाला घरी थांबता आले नाहीतेंव्हा तुला फोन वर
बोलताना विचारले होते, बेटा तुला काय गिफ्ट आणू…?
तर तु बोलली पप्पा काही नकोतुम्ही काम संपवून या मग आपण केक कापु,
तुझे ते शब्द एकूण डोळ्यात पाणी आले... म्हणूनच आज खास सुट्टी घेऊन 
तुझ्या सोबत थांबणार आहे…
मस्त दिवसभर तुझा वाढदिवस साजरा करणार आहे…
 
तुझ्या कडे पाहिले की खरोखर लक्षात येते की खरच मूली खुप ग्रेट असतात
आणखी एक आठवण… मागच्या वर्षी तुझ्या वाढदिवसाला असेच काहीस 
लिहिलेले वाचून तु पोटाला बिलगली आणि रडतच म्हणाली होतीस
पप्पा मी कुठे जाणार नाही हो तुम्हाला सोडुन पण असे काही लिहु नका
कारण वाचून मला ही रडू येत आहे
अगदी माझ्या सारखीच आहेस तु हळवी आहे…
तुझा बाप म्हणून तुझ्यासोबत वाढणे हे ही खूप आनंददायी आहे…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा…
Happy Birthday Beta

Birthday Wishes For Daughter In Marathi |
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुलीच्या-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-लाडक्या-लेकीचा-वाढदिवस-congratulation-on-your-daughter-happy-birthday-marathi-wishes-wadhdivas-shubhecha
मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – लाडक्या लेकीचा वाढदिवस…! 

 

बेटा आज तू खूप मोठी झालीस हे अगदी खरे आहे…
पण मुले कधीही आई – वडिलांसमोर मोठी असतात का…!
मुलांच्या 
सर्व लहान-मोठ्या चुकांना क्षमा करणे...
अनेक दोष असूनही त्यांचा प्रेमपूर्वक स्वीकार करणे...
आयुष्यात येणाऱ्या दुखं यांच्याशी लढा घ्यायला शिकवीत
एक व्यक्ती म्हणून त्यांचा सर्वांगीण विकास घडविणे...
याकरिताच तर प्रत्येक आई वडील धडपडत असतात.
बेटा, तू खुप मोठी हो… किर्तीवंत हो
आमचा आशीर्वाद तर नेहमीच तुझ्या पाठीशी आहे…!
वाढदिवसानिमित्त खूप खूप  शुभाशिर्वाद!
जीवनाचा प्रत्येक क्षण हा विशेष असतो
आणि प्रत्येक व्यक्ती
तो क्षण विशेष पद्धतीने जगतोही…
तुझ्या
ही जीवनात असे विशेष क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत 
आहेच
माझी
 लाडकी लेक
तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

 

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या

 

तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी

 

माझी फक्त हीच इच्छा आहे

 

तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा

 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 

माझ्या लाडक्या लेकीला

Birthday Wishes For Daughter In Marathi |
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुलीच्या-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-लाडक्या-लेकीचा-वाढदिवस-congratulation-on-your-daughter-happy-birthday-marathi-wishes
मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – लाडक्या लेकीचा वाढदिवस…! 
तुला तुझ्या जीवनात
सुख आनंद आणि यश लाभो. 
तुझे जीवन हे उमलत्या फुलांसारखे 
फुलून जावो त्याच्या सुगंध 
तुझ्या जीवनात दरवळत राहो 
हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त 
ईश्वर चरणी प्रार्थना. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मुलीच्या-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-लाडक्या-लेकीचा-वाढदिवस-congratulation-on-your-daughter-happy-birthday-marathi-wishes
मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – लाडक्या लेकीचा वाढदिवस…! 

 

तो क्षण देखील क्षणभर आपला असतो 

 

आणि क्षणातच मग परका होतो.
क्षण मोलाचे जगुन घे… 
सारे काही मागून घे 
जाणाऱ्या त्या क्षणांना 
आठवणींचीचे मोती दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here