जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम – changle vichar

1
221
जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम - changle vichar
जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम - changle vichar

जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम पालक म्हणून
वाचायलाच हवे – changle vichar marathi

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये मुलांसाठी changle vichar सांगितले आहेत.
हे चांगले विचार तुम्ही पालक म्हणून वाचा. तसेच हे changle vichar वाचून
मुलं नक्की शहाणे होतील.

तुमची मुलं बाहेर ज्या पद्धतीने वागतात त्यांना ज्या सवयी आहेत किंवा चार
लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांची वागणूक कशी आहे यावरून लोक तुमच्या मुलांचे
संस्कार ठरवतात. तुम्ही त्यांना कोणत्या वातावरणात वाढवला आहे ते ठरवतात.
मुलांच्या वागण्यामुळे कोणी तुम्हाला ऐकवले तर तुम्हाला खजील झाल्यासारखे
वाटते.

मुलांना शिस्त लावायची संस्कार द्यायचे तर काय करायचे….? या पोस्ट मध्ये
आपण असे काही नियम बघणार आहोत जे मुलांना योग्य संस्कार देतील आणि
बिघडवण्यापासून वाचवतील. पोस्ट ला शेवट पर्यंत नक्की वाचा. अर्ध्यात सोडू नका.
शेवटचा नियम तर खूप जास्त खास आहे.

changle vichar

1) मुलांना शिस्त लावण्याची त्यांच्यावर संस्कार करण्याची योग्य वेळ म्हणजे
त्यांच्या लहानपणापासून असते. तसे तर जन्माला येण्याच्या अगोदर पासून
आपल्याकडे संस्कार देण्याची रीत आहे. ज्याला की आपण गर्भसंस्कार म्हणतो.
मुलं पोटात असतांनाही नऊ महिने आईने चांगली पुस्तके वाचणे, चांगले विचार
ऐकणे, चांगले विचार ग्रहण करणे, यावर आपल्याकडे भर असतो. यालाच आपण
गर्भसंस्कार म्हणतो.

पण बरेच पालक लोक चूक करतात असे म्हणून की अजून तर तो लहान
आहे. त्याचे लाड करण्याचे दिवस आहेत. असे म्हणून आपण लहान
वयात त्यांचे प्रमाणापेक्षा जास्त लाड करतो. आणि मोठे झाल्यानंतर मुलांवर
संस्कार करायचे म्हटले…. त्यांना शिस्त लावायची म्हटले तर ते हातातून निघून
गेलेले असतात.

त्यावेळेस ना आपल्याकडे वेळ असतो ना मुलांकडे वेळ असतो. जसे ओली
काठी वाकवली तर ती वागते पण सुकलेली काठी ही वाकवायचा प्रयत्न
केला तर ती वाकत नाही ती थेट मोडते तिचे दोन तुकडे होतात. अगदी तसेच
आहे.

लहान मुलांवर संस्कार करायचे हे त्यांच्या कोवळ्या वयापासून सुरुवात
होतात. एक ते पाच वर्ष हा मुलांचा सगळ्यात जास्त अनुकरण करण्याचा
आणि शिकण्याचा काळ असतो. या वयात सुरू केलेली शिकवण ही
हळूहळू रुजवली जात असते. आणि ती कायमस्वरूपी राहू शकते.

changle vichar

2) वयात यायच्या अगोदरच म्हणजेच नको त्या वयात तुम्ही मुलांचे मित्र बनू
नका. मुलांचे आई-वडील म्हणूनच त्यांना संस्कार द्या. मुलांच्या वयाची वर्गवारी
आपण अशा पद्धतीने करू शकतो. 0 – 5 जन्मापासून ते पाच वर्षापर्यंत
प्रेमाने लाडाने वाढवायचे. 5 – 15 पुढची दहा वर्ष शिक्षण घेत असतांना
कठोर शिस्तीने. आणि 15 ते 25. अनुशासन आणि नियमात वाढवायला
हवे आणि 25 या वयात आई-वडिलांनी मुलांचे मित्र व्हायला हरकत नाही.

जर तुम्ही मुलांचे प्रमाणपेक्षा जास्त लाडच करत राहिलात तर मुलं
बिघडतात आणि वय वर्ष 25 च्या नंतर जेव्हा मुलांकडून काही चुकीच्या
गोष्टी घडतात तेव्हा मुलं तुम्हाला त्या गोष्टीसाठी जबाबदार धरतात की
योग्य वयात आम्हाला तुम्ही थांबवले का नाही म्हणून…. मुलं वाया जाण्याचा
दोष त्यांची वाया जाण्याची जबाबदारी ही मुलं पूर्णपणे तुमच्यावर ढकलतात.
म्हणून लाड करायच्या वयात लाड करा आणि जिथे मैत्रीपूर्ण राहायला हवे
त्या वयात मैत्रीपूर्ण रहा.

changle vichar वाचण्यासाठी खाली क्लिक करा. 

best lines – quotes in Marathi चांगले संस्कार, changle vichar

3) मुलं तुमची योग्यता पारखत असतात तुमचे अनुकरण करत असतात आणि
त्यानुसार तुमच्याशी व्यवहार करत असतात. जर तुम्ही मुलांचे फक्त आई वडील
आहात म्हणून मुलांनी तुम्हाला मान द्यायला हवा… आदर द्यायला हवा… असे
तुम्ही समजत असाल….. तर तुम्ही चुकीचे आहात.

मुलांच्या काळानुसार त्यांच्या जनरेशन नुसार तुम्हाला स्वतःला काही नवीन
गोष्टी शिकून घ्याव्या लागतात. मुलांनी विचारलेले प्रश्न त्यांच्या शंकांचे निरसन
जर तुम्ही करू शकले नाही तर तुम्हाला काही येत नाही. असे मुलं समजतात
आणि तुमचा आदर कमी व्हायला लागतो. बरेचसे पालक मुलं ऐकत नाहीत
अशी तक्रार करतात..

पण जर मुलं ऐकतच नाहीत म्हणून तुम्ही त्यांना शिस्त लावणे सोडून देत
असाल… त्यांच्यासमोर नमतं घेत असाल… तर तुम्ही चूक करत आहात.

4) मुलांकडून आपल्या पद्धतीने काम काढून घेण्याच्या किंवा आपल्या
पद्धतीनें त्यांना वागायला सांगण्याच्या चार पद्धती आहेत. सगळ्यात अगोदर
हे मुलांना सांगा की तुम्हाला काय हवे आहे. नंबर दोन ते कशा पद्धतीने हवा
आहे. तिसरी गोष्ट नाही केले किंवा नाही ऐकले तर काय होईल… त्यांची परिणाम
काय असतील आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः ती गोष्ट मुलांना करून दाखवा
जी तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे…..! या चार पद्धतीने तुम्ही मुलांना गोष्टी
शिकवत असाल तर मुलं तुमच्या शब्दा बाहेर असणार नाहीत..

मुलांना आरडा ओरडा आदळ आपट करून जर सांगायल गेलात तर मुले
रडतील… घाबरतील… आणि तुमचेऐकणार नाही. या उलट वरील चार
पद्धतीने जर तुम्ही मुलांना सांगितले तर मुलं तुमचे म्हणणे ऐकतील.

मुलांना शिक्षा करायची तर त्यांना मारू नका… ओरडू नका….
त्याऐवजी त्यांचे टीव्ही बघणे बंद करा… मोबाईल बंद करा…. त्यांना
खाण्यामध्ये मेथी… पालक… जमतील तेवढ्या पालेभाज्या खायला द्या.
या शिक्षेचे चार फायदे होतील… एक तर मुलांची बॉडी डिटॉक्स होईल.
शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक त्यांच्या शरीराला मिळतील.
कुठलेही आढेवेढे न घेता…मुलांची बुद्धी… मुलांचे डोके डिटॉक्स होईल.
काय केल्यानंतर आपल्याला ही शिक्षा मिळते हे त्यांच्या लक्षात येईल.
चुका कमी करतील.. अशी शिक्षा केल्याने तुम्हाला पुन्हा शिक्षा करण्याची
वेळ येणार नाही.

Good Thoughts In Marathi – changle vichar  

5) आई वडील नोकरी करत असतील किंवा दोघेही काही ना काही काम करत
असतील तरीही आपल्या व्यस्त वेळेतून महिन्यातून कमीत कमी 30 तास तरी
फक्त आणि फक्त मुलांसाठी वेळ काढा. मुलांसाठी असलेल्या वेळात तुम्ही तुमचे
कुठलेच काम करणार नाही तो वेळ फक्तत्यांच्यासाठी असेल याची काळजी घ्या.
मग तो वेळ तुम्ही प्रत्येक दिवसातून थोडा वेळ काढा किंवा एक दिवसाआड किंवा
हप्त्यातून एक पूर्ण दिवस असा काढा काही हरकत नाही. हा वेळ जेवणाच्या
व्यतिरिक्त चा वेळ असायला हवा आणि हा वेळ दोघांनी द्यायला हवा फक्त आईने
किंवा फक्त वडिलांनी नाहीतर दोघांचाही वेळ हवा. तुमच्याकडे वेळ नाही म्हणून
तुम्ही पैशाने खरेदी करून मुलांना भौतिक वस्तूमध्ये…. त्यांच्या खेळण्यांमध्ये….
त्यांचा आनंद शोधायला लावत असाल तर न वस्तूंची किंमत राहणार आहे….
न तुमच्या भावनांची किंमत राहणार आहे…. मुलं असंवेदनशील होत जातील…!

जर तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवला नाही तर तुमच्या आवडीनिवडी…
तुमचे नियम…. तुमची व्हॅल्यू…. तुमचे संस्कार…. तुमची नितीमत्ता….
तुमचे गुण… हे त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही आणि पुन्हा तीच वेळ
फिरून तुमच्याकडे येईल जेव्हा मुले पैसे कमवायला लागतील तेव्हा
ते तुम्हाला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतील तेव्हा त्यांच्याकडे तुम्हाला
देण्यासाठी वेळ नसेल.

मुलांना आपल्याकडून पाच गोष्टी हव्या असतात. आपण त्यांची काळजी
करणे त्यांचे आपल्यावर अवलंबून असणे…. निस्वार्थ प्रेम आपल्याकडून
मिळणारे गायडन्स… आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य. या
सगळ्या गोष्टी त्यांना देण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवणे जरुरी
आहे.

6) मुलांना शिस्त लावत असतांना त्यांच्यावर संस्कार करत असतांना
घरातल्या मोठा माणसांचा म्हणजे त्यांच्या आजी- आजोबांचाही
त्यामध्ये सहभाग असू द्या. काही गोष्टी पालक म्हणून आपण त्यांना
नाही समजावू शकत ते मुलं आपल्या आजी आजोबांकडून समजून घेऊ
शकतात..

हे changle vichar ही वाचा नक्की आवडतील आणि तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील.

life changing motivational quotes in Marathi | changle vichar

7) सगळ्याच गोष्टी लाडात होत नाही काही गोष्टींसाठी मुलांना रागावणे
गरजेचे आहे. आणि मुलांना रागवतांना हे लक्षात घ्या. तुम्ही रागावला त्यांना
शिक्षा केली तर तुम्ही लगेच त्यांना मनवायला… त्यांच्याशी गोड बोलायला
जाऊ नका. तुमच्या रागाचा तुमच्या शिस्तीचा थोडा तरी परिणाम त्यांच्यावर
होऊ द्या..

मुलांना कधी रागावलेच नाही…. नुसता लाड केला तर मुलांना मेंटल प्रेशर
घेण्याची क्षमता येणार नाही. बाहेरचे जग हे आपल्यापेक्षाही खूप कठोर आहे
आणि ते सहन करण्याची ताकद त्यांच्यात आणायची असेल तर फक्त लाड
करून जमणार नाहीत. आणि या उलट रोज ओरडून फक्त त्यांच्यावर रागवून
काम होणार नाही. अशाने मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुमचा राग
आणि तुमचा लाड यात तुम्हाला बॅलन्स ठेवता यायला हवे.

Good Thoughts In Marathi – changle vichar

8) मुलांना शिकवण्यासाठी लाखो गोष्टी आहेत पण सगळे तुम्ही एकदाच देऊ शकत
नाही. यासाठी तुम्हाला साधा… सोपा… आणि सरळ मार्ग म्हणजे…. तुम्ही त्यांना या सात
गोष्टी शिकवा. शरीर (व्यायामाचे महत्व) विनम्रता…. प्रतिष्ठा…. कला…. धन….परिश्रम….
आणि दुनियादारी…..

तुम्ही मुलाना या सात गोष्टींबद्दल शिकवले तर यात बऱ्याचशा गोष्टी
मुलं शिकतील आणि तुमच्याकडून आवश्यक गोष्टी सुटणारही नाहीत.
आणि मुलांना हे सगळे शिकवण्यासाठी अगोदर तुम्हाला या गोष्टी आत्मसात
कराव्या लागतील. कारण मुलं ते करत नाही जे तुम्ही त्यांना सांगता… मुलं ते
करतात जे तुम्ही करत असतात. म्हणून… मुलांना जे काही शिकवायचा आहे ते
स्वतः मध्ये आणा. मुलं तुमच्याकडे बघून ते आपोआप शिकतील… या सात
गोष्टींना विस्ताराने जाणून घ्यायचे म्हटले तर पोस्ट खूप मोठी होईल म्हणून या
पोस्ट मध्ये इतकेच. तुम्हाला जर हे विचार आवडले असतील आणि शेवटच्या
मुद्यातील या 7 विषयाबद्दल विस्ताराने वाचायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये
तसे कळवा. मी त्यावर अजून एक व्हिडियो बनवणार पोस्ट लिहणार आणि पोस्ट ला लाईक
शेअर आणि ब्लॉग ला तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू
नका.

जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम पालक म्हणून
वाचायलाच हवे – changle vichar marathi

अतिशय महत्त्वाच्याआई वडिलांसाठी २१ सुचना

आपली मुले जर चांगली घडवायची असतील तर प्रत्येक
आई-वडिलांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवे.

changle vichar 

१) मूल हि गुंतवणुकीचे साधन नाहीत माझ्या म्हातारपणाची
काठी म्हणून मुलांकडे पाहू नका.

जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम - changle vichar
जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम – changle vichar

२) आपल्या मुलांची गरज समजून घ्या.

३) रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा.

४) घरात मुलांसमोर आदळ आपट करू नका. त्याचा वाईट परिणाम
मुलांवर होऊ शकतो.

५) आई साठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे.

६) मुलांदेखत कुठलेही व्यसन करू नका.

७) ऑफिस मध्ये जातांना बॉस म्हणून जा. पण घरी येताना वडील म्हणून या.

८) मुलांना कधीही नकारात्मक बोलायचे नाही. नालायका…. गधडा….
वगैर सारखे शब्द वापरणे टाळावे.

९) मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई….
मुलांना काही ठराविक धोका घेऊ द्यावा. यामुळे मुलांच्या मनातील
भीती दूर होण्यास मदत होईल. जसे की झाडावर चढणे.

changle vichar

१०) कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून
घ्या. मूल कितीही लहान असेल तरी….! Process समजावून सांगा. यावरून
मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल.

११) मुलांच्या Progress बुक कडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला हवा.

१२) समाजात घडणाऱ्या तरुण मुले हत्या… आत्महत्या यांसारख्या गोष्टी करतात याची
मूळ लहान वयातील संस्कारांवर अवलंबून असतात…. यासाठी घरातील ‘बाबां’नी
ऑफिस मध्ये कामाच्या ठिकाणी झालेला अपमान… लॉस…. घरी कुटुंबाशी शेयर करा.
मूल कितीही वयाचे असेल तरीही…! यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि त्यास
लढा देण्यास मदत होईल.

Good Thoughts In Marathi – changle vichar  

१३) आयुष्यात तुम्हाला चांगले गुरू भेटले कि तुम्ही बदलू शकता. वयाच्या कोणत्याही
टप्प्यावर हा बदल शक्य आहे. त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले
गुरू व्हा.

१४) मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा.

१५) रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल मुलांसोबत बोला.

१६) मुलाना घालून पाडून बालू नका…मूल तुम्हाला हळूहळू Avoide करतील.

१७) मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा.
चांगले काम केलेले असेल तर कौतुक करावे.

changle vichar

१८) मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा कितीही काम असेल तरी मुलांना
लहानपणीचे बाबा आठवणार आहेत…पैसे नाही.

१९) मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत….
मूल खोट बोलायला शिकतात .

१८) तू जर असे केलस तर मी सोडून जाईन. तुला एकटे सोडून देईल
असे मुलांशी कधीही बोलू नये.

१९) मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक असावे.

२०) यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असते.

२१) आपल्या मुलांचे आदर्श बना.

जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम – changle vichar

हे ही changle vichar वाचायला नक्की आवडतील.
best lines | quotes in Marathi, चांगले संस्कार, changle vichar

Good Thoughts In Marathi – changle vichar 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here