असेच जीवन जगावे म्हणत..
माणुसकीचा धडा शिकवून गेला.
Corona – marathi Kavita – Good Thoughts
असेच जीवन जगावे म्हणत.. माणुसकीचा धडा शिकवून गेला. Corona – marathi Kavita – Good Thoughts |
कोरोना
माझा माझा करता शेवटी
आयुष्य संपुन जातो.
अहंकाराच्या उन्मादाने माणूस
पार वेडा होऊन जातो.
आज कोरोनाने दाखवून दिले…
काहीच शेड्युल बिझी नसतो.
आपणच शोधतो आपले काम
अख्ख आयुष्य निघून जातो…!
आयुष्याचा अर्थ असतो कसा
आज मला कळतोय…!
काहीच गरजा नसतात जीवनात…
विनाकारणच जीव पळतोय
सर्व व्हीलर गाड्या आता
कशा धूळखात पडल्या…
ब्रॅण्डेड कपड्याच्या घड्या
पार घड्याच राहून गेल्या…!
शेवटी जवळचाच किरानावाला
लॉक डाऊन च्या वेळी कामी येतो…!
ब्रॅण्डेड ब्रॅण्डेड करता करता माणसा
कुठे ब्रॅण्डेड कामात येतो…?
कठीण समय येता नेहमी
आपलेच कामात येतात…
विदेशी कंपन्या मात्र…
नेहमी वाटून खातात.
पैसा, पद, प्रतिष्ठा फक्त
जीवनी क्षणापूरते असते…
साधे जीवन जगावे परी
तेच चिरकाल टिकते…
निसर्गाच्या साम्राज्यापुढे
कधी कुणाचे चालत नाही…
मीच माझा कर्माचा संगाती
फळ नेहमी तेच मिळत राही.
कमीत कमी का होईना
कोरोना खूप काही शिकवून गेला…
असेच जीवन जगावे म्हणत…..
माणुसकीचा धडा शिकवून गेला.
✍✍
श्री..एम. टी. जैतवार.
कारंजा 9764091209