Friendship Quotes in Marathi ,
100+ मैत्रीवर सुंदर सुविचार
नमस्कार मित्रांनो, आज या लेखात तुमच्यासाठी काही निवडक
friendship quotes in marathi, मैत्रीवर सुविचार, आणले आहेत.
हा मराठी मधील friendship status marathi, एक मैत्री सुविचार संग्रह,
तुमच्या सोबत शेयर करीत आहोत.
आशा आहे नक्कीच आवडतील. आवडल्यास आपल्या मित्रांना
शेयर करायला विसरू नका.
मित्र एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या कठीण काळात
सदैव आपल्या पाठीशी उभी असते आणि आपल्या यशामध्ये
सर्वोत्कृष्ट मित्र नेहमी आपल्या आनंदात सहभाग घेतात.
म्हणून आज या पोस्ट मध्ये काही सुंदर आणि आनंदायी….
बेस्ट फ्रेंडशिप स्टेटस मराठीमध्ये, मराठीमध्ये फ्रेंडशिप कोट्स ,
सुविचार , शेयर करीत आहोत. हे friendship status ,
आपल्या मित्रांना नक्कीच शेयर करा.
Friendship Quotes in Marathi ,
100+ मैत्रीवर सुंदर सुविचार
कोणतेही नाते नसतांनाही
जे नाते निर्माण होते ती मित्रता…
मैत्री असते.
जगात कुणीही आपले नसतांना
एकाएक जी आपली होतात
ती मैत्री असते.
एखादी गोष्ट आपल्या आई – वडिलांपेक्षाही
ज्यांच्या सोबत शेअर करावीशी वाटते….
ती मैत्री असते.
लहान लहान आपली गुपिते ज्यांना माहिती असते
ती मैत्री असते. आणि आयुष्य संपेपर्यंत
जी विसरायला लावत नाही ती मैत्री असते.
आपल्या जीवनातील
एक महत्वपूर्ण भाग म्हणजे मित्र…..
मित्रांना आपण कसल्याही
परिस्थितीत गमवूच शकत नाही.
असाच काही सुंदर क्षणी जर मित्राची आठवण आली तर
हे friendship quotes in marathi, मैत्रीवर सुविचार, सुंदर विचार ,
त्यांना पाठवू शकता. आणि तुम्ही आमच्या आयुष्यात
किती महत्वपूर्ण आहात हे सांगू शकता.
जन्म एका टिंबासारखा असतो…
जीवन एका ओळीसारखे असते….
प्रेम एका त्रिकोणा प्रमाणे असते….
परंतु मैत्री वर्तुळासारखी असते….
की ज्याला शेवट नसतो….!
बहरू दे आपल्या मैत्रीचे नाते…
भरलेले मन रिकामे होऊ दे
राहू दे अशीच तुझ्या मैत्रीची साथ
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.
मैत्री नावाच्या नात्याची…
वेगळीच असते जाणीव.
भरून काढते जीवनात
प्रत्येक नात्यांची उणीव….
जर मैत्री करत असाल….
तर पाण्यासारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा.
मैत्री या शब्दाचा अर्थ खूप मस्त….
जेव्हा दोन लोक भेटतात….
तेव्हा मैत्री होते..
♥
चांगले मित्र हे हात आणि
डोळ्या सारखे असतात
जेव्हा हातांना यातना होतात
तेव्हा डोळे रडतात आणि
जेव्हा डोळे रडतात…..
तेव्हा हात अश्रू पुसतात.
खरा मित्र तर तो असतो….
जो वाईट वेळेत आपल्या सोबत असतो.
तो नाही…. जो फक्त रात्रंदिवस आपला
सोबत राहतो. आणि आवश्यकता
असली की…. दिसत ही नाही….!
रक्ताच्या नात्यात नसेल इतकी
मैत्रीच्या नात्यात ओढ राहते.
जरी कशी ही असली…
तरी शेवटी मैत्री गोड असते.
खरेच मैत्री असते….
पिंपळाच्या पाना सारखी.
त्यांची किती ही जाळी झाली…
तरी ती मनाच्या पुस्तकात
जपून ठेवावीशी वाटते….!
माझी मैत्री समजायला
तुला थोडा वेळ लागणार.
परंतु ती कळल्यावर….
तुला माझे वेड लागणार……!
Friendship Quotes in Marathi | 100+ मैत्रीवर सुंदर सुविचार
जीवन नावाची स्क्रीन
जेव्हा लो बॅटरी दाखवते आणि
नातेवाईक नावाचा चार्जर
मिळत नाही…. तेव्हां
पावरबँक बनून जे तुम्हांला
वाचवतात ते म्हणजे. मित्र…..!
जन्माने रक्ताची नाती मिळतात….
मनाने मानलेली नाती जुळतात.
परंतु… जी बंधने
नाती नसतांनाही जुळतात….
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
मैत्री म्हणजे मायेची साठवण
मनाने मनाला दिलेली
प्रेमाची आठवण.
हा धागा नीट जपायचा असतो
तो कधी विसरायचा नसतो.
कारण ही नाती तुटत नाहीत
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात.
Friendship Quotes in Marathi | 100+ मैत्रीवर सुंदर सुविचार
मैत्री म्हणजे पान नसते सुकायला
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला
मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला
मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना आधार द्यायला.
एक दिवस देव म्हणाला…
किती ह्या मैत्रिणी तुझ्या….
यात तू स्वत: ला हरवशील….
मी म्हणाले भेट तर
एकदा येउन यांना….
तू पुन्हा वर जाणे विसरशील…!
सूर्यासारखे तेज असावे
चंद्रासारखी प्रखरता असावी
चांदण्यासारखी शीतलता असावी
आणि तुझ्यासारखी मैत्री असावी.
काही नाती बनत नसतात…
ति आपोआप गुंफली जातात.
मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात
काहि जण हक्काने राज्य करतात
त्यालाच तर “ मैत्री ” म्हणतात.
मैत्रीच्या नात्याने
ओंजळ माझी भरलेली….
तुझ्या सोबतीने
जीवनाची नव्याने
वाट फुललेली….
दुःखामध्ये बुडलेली
रात्र होती काळोखी…
प्रकाश बनुनी
तुझी सावली होती
सोबत खुललेली.
मैत्रीच्या सहवासात
संपूर्ण जीवन सफल होते.
जसे ईश्वराच्या चरणी पडून
फ़ुलांचेही निर्माल्य होते.
मैत्री हसणारी असावी….
मैत्री चिडवणारी असावी…
प्रत्येक क्षणाचा
आनंद धेणारी असावी….
एकवेळेस ती भांडणारी असावी….
परंतु कधीच बदलणारी नसावी….!
नकळत काही शब्द
कानावर पडतात.
दूर असुनही कुणी उगाच
जवळ वाटतात.
ही मैञीची नाती खरे तर
अशीच असतात….
जीवनात येतात आणि
जीवनच बनून जातात.
Friendship Quotes in Marathi | 100+ मैत्रीवर सुंदर सुविचार
आयुष्यात दोनच मित्र कमवा.
एक “ श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी
युध्द न करताही तुम्हाला विजयी बनविणार
आणि दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे
असतांना ही तुमच्यासाठी युध्द करणार.
मैञीला नसतात शब्दांची बंधने
त्याला असतात…
ती केवळ हदयाची स्पंदने
मैञी व्यक्त करण्यासाठी
कधी कधी शब्द अपुरे पडतात…
परंतु अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.
समोरच्याच्या मनाची काळजी
तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता….
याची जाणीव म्हणजे मैत्री……
चांगल्या मैत्रीला….
वचन आणि अटींची गरज नसते.
फक्त दोन माणसे पाहिजे असतात….
एक जो निभाऊ शकेल… आणि
दुसरा… जो त्याला समजु शकेल.
मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा.
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा.
मैत्री माझी समजायला
तुला थोडा वेळ लागणार.
परंतु ती कळल्यावर
तुला माझे वेड लागणार.
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
मैत्री एक अनमोल भेट आयुष्याची
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा
मैत्री एक अतूट सोबत जीवनाची.
काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात.
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात….!
निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार….
कारण…. त्यालाही मैञीचा
छंद हवा असतो.
देव पण न जाणो
कोठून कसे नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना हृदयात
स्थान देतो.
ज्यांना कधी ओळखतही नसतो.
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो.
सागराचे पाणी कधी आटणार नाही.
मनाची आठवण कधी मिटणार नाही.
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी….
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर
तुला अनेक मित्र भेटतील. पण
हदयाच्या एका बाजुस
जागा मात्र माझी असु दे.
मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा.
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असे एक मंदीर करा.
काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी
रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोड घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला
खराखूरा भास म्हणजे मैत्री.
मरताना घेतलेला
शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.
बंधना पलीकडे एक नाते असावे…
शब्दांचे बंधन त्याला नसावे.
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा….
दु:खाला तिथे थारा नसावा.
असा एक गोडवा आपल्या मैत्रीत असावा.
हृदय असे तयार करा की….
त्याला कधी तडा जाणार नाही.
हास्य असे तयार करा की….
ह्रदयाला त्रास होणार नाही.
स्पर्श असा करा की…
त्याने जखम होणार नाही.
मैत्री अशी करा की….
त्याचा शेवट कधी होणार नाही.
मैत्री असावी चंदनासारखी….
सुगंध देणाऱ्या फुलासारखी….
जशी तुटलेल्या ताऱ्याला
आधार देणाऱ्या धरतीसारखी….
प्रकाशाचे तेज घेऊन
सावलीसारखी कोमल असावी.
Friendship Quotes in Marathi | 100+ मैत्रीवर सुंदर सुविचार
हसतच कुणीतरी भेटत असते…
नकळत आपल्यापेक्षाही
आपलेसे वाटत असते…
केंव्हा कोण जाणे
मनात घर करुन राहत असते…
ते जोपर्यंतजवळ आहे त्याला
फूलासारखे जपायचे असते…
दूर गेल्यावरही आठवण म्हणून
मनात साठवायचे असते…
याचेच तर नाव “मैत्री”असे असते…!
मिञ-मैञिणी हे असेच असतात
पाखरासारखे….
कुठून तरी उडत उडत येतात.
मनामध्ये हळव्या प्रेमाचे घरटे बनवतात
सुख दु:खाची गाणी गुणगुणतात.
आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचे
एक अविस्मरणीय घरटे… मनामध्ये
आठवण म्हणून ठेवून जातात.
एखाद़याशी सहजच हसता हसता
रुसता आल पाहीजे.
त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद
पुसताही आल पाहीजे.
मैत्रीत मान अपमान असे काहीच नसते
आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात
राहता आले पाहिजे.
जर डोळे पुसायला कुणीतरी असेल….
तर रुसायला बरे वाटते.
जर ऐकणारे कुणीतरी असेल….
तर मनातले बोलायला बरे वाटते.
जर कौतुक करणारे कुणीतरी असेल…
तर थकेपर्यंत राबायला बर वाटते.
जर नजर काढणारे कुणीतरी असेल…
तर नटायला बरे वाटते.
जर आपल्य़ा सारखा एक मित्र असेल….
तर मरेपर्यंत जगायला बरे वाटते.
मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे
आठवण येण्याचे कारण पाहिजे
तू फोन कर अथवा नको करू
परंतु तुझा एक प्रेमळ संदेश
दररोज यायलाच पाहिजे.
टीप | Friendship Quotes in Marathi | 100+ मैत्रीवर सुंदर सुविचार
शैलेश एका हॉटेलमध्ये वेटर चा काम करीत होता. दररोजप्रमाणे आज ही तो
टेबल वर आलेल्या चार ग्राहकाचे ऑर्डर घेण्यासाठी जवळ आला.
टेबलावर बसलेल्या त्या चारही ग्राहकांना पाहून शैलेश थक्क झाला.
शैलेश त्या चेहऱ्यांना जवळपास वीस वर्षानंतर आज पाहत होता.
त्या चारही माणसांनी कदाचित शैलेश ला ओळखले नव्हते अथवा
आपली ओळख दाखवत नव्हते.
त्या चार माणसांपैकी दोघे जण आपल्या मोबाईल मध्ये व्यस्त होते
आणि दुसरे दोघे आपल्या लॅपटॉप मध्ये व्यस्त होते. कदाचित ते नुकत्याच
झालेल्या सौद्याची आकडेमोड चालली होती.
शाळेतील मित्र आयुष्यात खुप समोर निघून गेले होते… आणि स्वतः मात्र
कॉलेज पर्यंत सुद्धा पोहचू शकला नव्हता.
शैलेश ने त्यांची ऑर्डर घेवून त्यांनी जे काही मागितले ते सर्व शैलेश ने
खूप प्रेमाने वाढले. परंतु शैलेश ने स्वतःची ओळख लपवून ठेवली.
ते चारही व्यापारी मित्र आपले जेवण संपवून हॉटेलातून निघून गेले.
शैलेश मनात विचार करीत होता की… ते आता इकडे परत कधी न आले
तर चांगले….!
शाळेतील मित्रांना स्वतःच्या निष्फलते मुळे आपली साधी ओळख सुद्धा
दाखवता आली नाही म्हणून शैलेश ला फार वाईट वाटले.
मॅनेजर थोडा वैतागल्या सारखा ओरडत म्हणाला….. शैलेश ते टेबल साफ
करायला सांग. चौघांनी पाच हजाराचा बिल केला, परंतु एक रुपयाही
टीप म्हणून ठेवून गेले नाहीत.
शैलेश ने टेबल साफ करायला दुसऱ्या मुलाला सांगितले आणि टेबलाकडे शैलेश चे
लक्ष गेले… टेबलावर एक नेपकिन पेपर वेगळीच घडी करून ठेवला होता. तो पेपर
शैलेश ने उचलला…. त्या नॅपकिन वर त्या चार व्यापारी मित्रांनी काहीतरी लिहून
ठेवले होते.
त्यावर लिहिले होते….
मित्र शैलेश, तुला टीप द्यायला आमचा जीव झाला नाही रे. ह्या हॉटेल च्या बाजूलाच
आम्ही एक कारखाना विकत घेतला आहे. म्हणजे आता या हॉटेलात येणे जाणे
सुरू तर राहीलच. तू आमच्या बरोबर जेवायला बसला नाही आहेस… उलट
आम्हाला तू वाढतो आहेस….. हे कसे वाटते….?
अरे मित्रा…. शाळेत तर आपण एकमेकाच्या डब्ब्यातून खाणारे…. तुझा ह्या नोकरीचा
आजचा शेवटचा दिवस…. कारखान्यातील कॅन्टीन तर कुणाला तरी चालवलीच
पाहिजे ना…?
तुझेच शाळेतील मित्र.
खाली कंपनीचे नाव आणि फोन नंबर लिहिला होता.
आत्तापर्यंत मिळालेल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या टीप ला शैलेश ने
ओठांना लावून तो कागद आपल्या खिशात व्यवस्थित ठेवला.
हाच खऱ्या मित्रांचा गुण आहे.
सुंदर टीप | This is the quality of real friends ,
Good Thoughts In Marathi | sunder vichar marathi
[…] Friendship Quotes in Marathi | 100+ मैत्रीवर सुंदर सुविचार […]
[…] Friendship Quotes in Marathi | 100+ मैत्रीवर सुंदर सुविचार […]
[…] Friendship Quotes in Marathi […]