सुंदर विचार मराठी, तुमचा अभिप्राय | Good thought In Marathi
भर उन्हात रस्त्यावर चालत आहात… घामाने चिंब झालेले आहात…
आणि तहानभुकेने अगदी व्याकुळ झालेले आहात. आता तुम्ही रस्त्यावर
चांगल्या पैकी सावली असलेले झाड शोधून तुम्हाला पाणीही हवे आहे.
इतक्यात तुम्हाला समोर एक झाड दिसत आहे. त्या झाडाजवळ जाताच
समोरच्या घरी पहिल्या मजल्यावर खिडकीत उभ्या असलेल्या माणसाकडे
तुमचे लक्ष जाते आणि तो माणूस तुम्हाला पाणी पाहिजे का…? असे विचारते…!
त्या क्षणी तुम्हाला काय वाटेल…? त्या माणसाबद्दल तुमचा अभिप्राय काय
असणार…?
मग तो माणुस खिडकी बंद करून तुम्हाला खाली गेट जवळ यायचा
इशारा करतो… घाईघाईने तुम्ही तिथे जाता पण नंतरची 10 मिनटे
कोणीही तिथे येत नाही…!
आता तुम्हाला त्या माणसा बद्दल काय वाटणार…?
हे तुमचे दुसरे अभिप्राय असणार आहे…
काही वेळाने तो माणूस तिथे येते आणि म्हणतो… माफ करा…
मला जरा उशीर झाला पण तुमची अवस्था बघून मी तुम्हाला
नुसत्याच पाण्याऐवजी लिंबू पाणी आणले आहे…!
आता तुमचे त्या माणसा बद्दल अभिप्राय काय असणार…?
आता तुम्ही एक घोट लिंबू पाणी घेता आणि तुमच्या लक्षात येते की…
अरे च्या…! यामध्ये साखर तर अजीबातच नाही आहे…!
आता तुमचे त्या माणसा बद्दल अभिप्राय काय असणार…?
तुमचा उतरलेला चेहरा पाहून तो माणूस खिशातून हळूच एक
साखरेचा छोटा पाऊच काढतो आणि म्हणतो… तुम्हाला साखर
चालते कि नाही… आणि किती चालते…
तुम्हाला जास्त गोड आवडत असेल कि नाही हा विचार करून
मी मुद्दामच आधी साखर घातली नाही आहे.
आता तुमचे त्या माणसाबद्दल काय अभिप्राय झाले असणार…!
आता विचार करा अवघ्या दहा ते वीस मिनिटातच तुम्हाला तुमचे
अभिप्राय… तुमचे विचार भरभर बदलावे लागत आहेत…!
अगदीच सामान्यातल्या सामान्य परिस्थितीत क्षणात आपले विचार…
आपले अभिप्राय… पूर्णतः चुकीचे ठरू शकतात.
तर मग कोणाबद्दल फारशी काहीच माहिती नसतांना…
तो माणुस पुढे कशा वागणार आहे… हे माहीत नसतांना…
फक्त वरवर पाहूनच त्याच्याबद्दल तातडीने समजूत करून घेणे
किती योग्य आहे…?
हे असे आहे की… जो पर्यंत समोरचा तुमच्या अपेक्षेप्रमाणे
वागत आहे…. तोपर्यंतच तो चांगला असतो…!
नाहीतर वाईट तर तो आहेच….?
सुंदर विचार मराठी, तुमचा अभिप्राय | Good thought In Marathi
