Good Thoughts In Marathi – आयुष्य खुप सुंदर आहे – सुंदरतेने जगा – Marathi Suvichar
Good-Thoughts-In-Marathi-आयुष्य-खुप-सुंदर-आह -सुंदरतेने-जगा-Marathi-Suvichar |
आपल्या देशात 21 दिवसाचा ब्रेक आहे…! तसे पहिले तर
असा ब्रेक पूर्ण जगासाठीच आवश्यक होता.
थांबा जरा 21 दिवस घरीच… काही बिघडत नाही.
कुठे धावत आहोत आपण…?
कशासाठी धावत आहोत आपण…?
नेमके काय मिळवाचे आहे आपल्याला…?
याचा शांत मनाने थोडा विचार करा.
आपल्या आई वडिलांना वेळ द्या…. आपल्या मुलांना वेळ द्या…
आपले मित्र मंडळी.. नातेवाईकांना वेळ द्या.
खरे तर… हीच आपली खरी संपत्ती आहे.
आपण निर्जीव संपत्ती कमावण्याच्या नादात,
आपली सजीव संपत्ती हरवत चाललो आहोत.
आपण काय खातो…? कसे वागतो…? कसे राहतो…?
या निसर्गाने आपल्याला एवढे दिले…! पण आपण निसर्गाला काय देतो…?
हा सगळा विचार करण्याची वेळ आली आहे.
आरोग्य म्हणजे नक्की काय आहे…?
आपली नक्की स्पर्धा कोणती…?
या नाशवान शरीराची किती काळजी घेतो…?
दया… करुणा… काही आहे की नाही…? कि फक्त स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी
इतरांचे कोणतेही किवा कुणाचेही अस्तित्व मान्यच करायचे नाही का….?
आज खरेच थोडा वेळ थांबून विचार करायची वेळ आली आहे.
अजूनही वेळ गेलीली नाही.
थोडा विचार करूया…! आपले आयुष्य नक्की शिल्लक तरी किती आहे…
याचा आणि त्यात आपल्याला नेमके मिळवायचे काय आहे…!
सृष्टीचा उत्पत्ती, स्थिती आणि लय हा तर नियम आहेच.
अशी वेळ हजारो वेळा आली आहे… आणि हजारो वेळा ही युगे हि बदललेली आहेत.
विठोबा गेली 28 युगां पासून विटेवरी उभा आहे.
आता आपल्यालाही झोपेतून उठून जागे व्हायची वेळ आली आहे.
स्वतः ला वेळ द्या…!
छंदांना वेळ द्या…!
निसर्गाला वेळ द्या…!
आरोग्याला वेळ द्या…!
नात्यांना वेळ द्या…!
समाजाला वेळ द्या…!
प्राणिमात्रांना वेळ द्या…!
आणि हो…
कोरोनालाही वेळ द्या…!
तो ही बिचारा त्याची वेळ झाल्यावर निघून जाईल…
कारण… तुमच्यासाठी कोणालाही वेळ नाही…
किमान तुम्ही तरी स्वतःला वेळ द्या.
आयुष्य खुप सुंदर आहे… सुंदरतेने जगा…!