Good Thoughts In Marathi On Life
एक खूप मोलाचा संदेश | सुंदर विचार
जेव्हा समुद्राच्या किनाऱ्यावर एक मोठी लाट आली तेव्हा त्या लाटेने जातांना…
किनाऱ्यावर खेळत असलेल्या एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत
घेऊन गेली…..
हे बघितल्यावर तो मुलगा तिथल्या वाळुवर आपल्या नाजूक बोटाने लिहीतो कि
समुद्र हा चोर आहे.
त्याच समुद्राच्या दुस-या बाजुला एक मासे पकडणारा भरपूर मासे पकडतो…!
तो वाळुवर लिहीतो कि… समुद्र हा पालनकर्ता आहे.
एक तरूण मुलगा समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते कि…
समुद्र हा खुनी आहे.
त्याच समुद्राच्या एका दूस-या किना-यावर एक गरीब म्हातारा…
ज्याची म्हातारपणाने कंबर वाकलेली असते… तो आपल्या वाकलेल्या
कंबरेने किनाऱ्यावर फिरत असतो… फिरता – फिरता म्हाताऱ्याला
एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर
लिहीतो कि… समुद्र हा दाता आहे.
अचानक एक मोठी लाट येते आणि लिहीलेले सर्वकाही पुसले जाते
लोकांना काहीही म्हणू द्या… परंतु अथांग…! विशाल समुद्र…! हा आपल्या
लाटांमध्ये मस्त राहतो…
आपली भरती आणि ओहोटी… समुद्र आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो.
जीवनात जर विशाल… अथांग…. असे समुद्र बनायचे असेल… तर
कुणाच्याही बोलण्याकडे… टोमण्यांकडे लक्ष न देता… तुम्हाला जे करायचे
आहे… ते आपल्याच पद्धतीने करायचे… भूतकाळातील मुळीच विचार
करत बसू नये.
यश अपयश… मिळणे अथवा न मिळणे… सुख किंवा दुख…. या सगळ्यात
कधीही मन विचलित होऊ देऊ नये.
जर हे आयुष्य सुख, शांति ने भरलेले असते…
तर माणूस जन्माला येतांना रडलाच नसता…!
जन्माला येतांना रडणे… आणि मेल्यानंतर रडवीने… यामधील
संघर्षमय वेळेलाच कदाचित आयुष्य म्हणतात…!
Good Thoughts In Marathi – एक खूप मोलाचा संदेश – सुंदर विचार
श्री राम
मी तुमच्यामुळे सुखात आहे…
कारण तुमचे गोड नाव
माझ्या मुखात आहे…!
सहजच सुचलेले – छान विचार मराठी – Sunder Vichar
दोन दिवसांपूर्वी मी what’s app वर एक post वाचली…
post मोठी होती पण त्यात महत्वाचा मुद्दा असा होता की…
सरसर सरसर माळ जपली
तरी पण त्यात श्री राम काही आले नाही…
मी थोडा वेळ विचार केला आणि मला जे वाटले ते
थोडक्यात तुमच्या सोबत शेयर करीत आहे…
मित्रांनो मला असे वाटते की आपण सरसर माळ जपल्यावर
भगवंत कसा येईल…?
आता आपलेच उदाहरण घ्या… समजा कुणी आपल्याशी खूप
घाईघाईत आणि दुर्लक्ष केल्याप्रमाणे बोलले तर आपल्यालाही
ते आवडत नाही…
त्याउलट कुणी अगदी शांततेने… प्रेमाने बोलल तर जास्त भावते
आणि बरे हि वाटतेय…!
तसेच भगवंताचेही सरसर नाव…. किंवा स्तोत्र वाचण्यापेक्षा
आपण जी काही देवाची भक्ती करतो…
जो काही वेळ देवासाठी देतो तो फक्त देवाचा
आणि आपलाच असावा..
जेणेकरून आपली भक्ती भगवंता पर्यंत पोहोचेल…!
जर आपल्या मन… बुद्धी… कर्मात…. भगवंत असेल
तर आपल्या माळेत नक्कीच राम येईल….
जय श्री राम
Good Thoughts In Marathi | एकत्र या | मराठी सुंदर विचार
आज बाजारात मी एका फळांच्या दुकानात केळी घेण्यासाठी गेलो…
दुकानदाराला मी एक डझन केळी चा भाव विचारला…
दुकानदार म्हणाला चाळीस रुपये साहेब…
दुकानदाराच्या किलो काट्याच्या जवळ काही केळी विखरून
पडलेली होती.
मी दुकानदाराला विखुरलेल्या केळीचा भाव विचारला…
दुकानदार म्हणाला… वीस रूपये डझन
मी म्हणालो : या केळींचा निम्मा भाव का…? हि केळ खराब आहेत काय…?
दुकानदार म्हणाला…. हि पण केळी चांगलीच आहेत साहेब… फक्त ह्या केळी
गुच्छातून तुटलेल्या आहेत…
साहेब ह्या केळी जर गुच्छातच राहिल्या असत्या तर याचाही भाव
चाळीस रुपये डझनच राहिला असता…
आपन या केळी निःसंकोचपणे घ्या…
त्याच क्षणी मला समजले की…. जो व्यक्ती आपला संघटन…
आपला गट… आपला समाज… आणि आपला परिवार
याच्या पासुन वेगळा होतो… त्या व्यक्तीची किंमत…
अर्ध्यापेक्षाही कमी होऊन जाते…!
एक विनंती आहे कि… आपले कितीही मतभेद झाले… मनभेद झाले…
तरीपण आपण आपला परिवार… गट… संघटन… समाज… आणि मित्र…
ह्यांच्याशी नेहमी जुडलेले रहा… संपर्कात राहा… सगळ्यांसी मिळून
मिसळूनच रहा.
मित्रांनो…
सोबत या… सोबत रहा…
सोबतच काम करा…
एकमेकांवर प्रेम करा…
एकमेकांचा आदर करा…
एकमेकांना मदत करा…
Good Thoughts In Marathi | एकत्र या | मराठी सुंदर विचार
जगणे हि महाग झाले आहे | बालपण
Childhood | सुंदर विचार
मोठे झाल्यावर कळले की
खेळणी महाग नसतात…
बालपणच खूप महाग असतो….!
मला आठवीत आहे…
आम्ही खूप मोठे होत पर्यंत
लहानच होतो. तेव्हा सगळे काही
स्वस्तच होते… बालपणही….!
आपल्या बालपणात बालपणाला मनसोक्त उपभोग घेतला.
कुठेही गेले तरीपण उन्हात…. पावसात…. मातीत…. नदीवर….
घराच्या समोरील आणि मागील दोन्ही अंगणात…
गावाबाहेरील मोकळ्या जागेत… सर्वत्र बालपणरुपी हिरव्या
गवताची चादर सगळीकडे पसरलेली राहत असे.
परंतु आता तसे नाही आहे….!
आता तर मुले लहानपणातच खूप मोठी होऊन जातात.
भरपूर महाग झाले आहे बालपण…!
आई पूर्वी खूप स्वस्त होती….. ती पूर्ण वेळ आईच असायची…
लहानपणी सकाळ झाल्यावर झोपेतून उठवण्यापासून
आंघोळ…. जेवण…. शाळा… खेळ… संध्याकाळी जेवण…
झोपे पर्यंत… आईच होती… रागवायची… प्रेम करायची…
मारायची…
भीती दाखवून जेवायला लावायची…. पूर्ण वेळ आईच असायची….
सगळीकडे आईच दिसायची. ही आई आता मम्मी झाली आहे…
आणि मम्मी खूप महाग आहे…!
मम्मी जॉब करते… सकाळी लवकर उठून घाईघाईने
कामे आवरून जॉब वर जाते.
पूर्ण वेळ मम्मी फक्त रविवारलाच उपलब्ध असते…!
मामा – मावशीचे गाव आता राहिले नाहीत…! प्रेमळ मामा – मामी,
मावशी – मावशा, आत्या – मामा आता पूर्वीसारखी नाते राहिले नाहीत….
पूर्वी सगळे आपली वाट पाहायचीच…
आता सगळ्यांना कुणीही नकोसे झाले आहे….! हा सगळा परिस्थितीचा
दोष आहे. तेव्हा बालपणाच्या सोबतच मित्र हि खूपच स्वस्त होते….!
आपल्या हाताची दोन बोटे त्याच्या हाताच्या बोटांवर टेकवून
साधे बट्टी म्हटले की नेहमीची मित्रता होत असे.
शाळेच्या निळ्या हाफ पेंट मध्ये खोचलेला पांढरा शर्ट बाहेर काढून
त्यात संत्रा गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी
वाटून खाल्ली की झाली पार्टी…!
आताच्या मुलांना तर आधीच घरून सूचना असते….
बेटा डोंट शेअर युअर टिफिन कळले…!
आता मित्रता खूपच महाग झालेली आहे.
ते दिवस म्हणजे हेल्थला आरोग्य म्हणायचे दिवस होते….!
सायकलचा एक जुना फाटकासा टायर आणि बांबूची
एक दीड हात काठी इतक्याच भांडवलावर संपूर्ण गावाला
धावत फेरी घालतांना तबियत अगदी स्वस्तात मस्त होऊन जायची….!
जुन्या कापडाने घट्ट बांधून बनवलेल्या कापडी बॉलने
आप्पाधाप्पी खेळत असतांना आपली पाठ स्वस्तातच
इतकी मजबूत झालेली आहे की… आयुष्यात कशीही परिस्थिती
आली तरी कधी ही पाठ वाकली नाही…! आणि आता इम्युनिटी बूस्टर
औषधी भरपूर महाग झालेली आहेत असे म्हणतात….!
पूर्वी ज्ञान…. शिक्षण…. पुस्तके…. इत्यादी किती स्वस्त होते.
केवळ वरच्या वर्गातल्या मुलाशी बोलनी करून ठेवून….
द्वितीय संत्रान परिक्षा झाली की त्याचीच पुस्तके अर्ध्या किंमतीत
मिळून जात असत. आणि जुन्या वह्यांची उरलेली
कोरी पाने काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची.
आता मात्र पाटीची जागा फोन ने घेतली आहे…
आज ऑनलाईन शिक्षण न परवडणारे झालेले आहे.
इतकेच काय…. मित्रांनो….
कालपरवा पर्यंत तर मरण ही तरी स्वस्तच होते….
परंतु आता तर मरण ही पाच – सात लाखांचे बिल झाल्याशिवाय
येईनासे झाले आहे….!
म्हणूनच म्हणत आहे…. जोवर आहोत तोवर आठवत रहायचे….
नाहीतर आठवणीत ठेवायला ही कुणीही नसणार….!
Good Thoughts In Marathi On Life
एक खूप मोलाचा संदेश | सुंदर विचार
प्रवचन करीत असतांना समोर बसून प्रवचन ऐकत असलेल्या भाविकांमधून
एका तरुणाला गुरुजी बोट दाखवून उभे राहायला सांगतात.
तरुण मुलगा उभा झाल्यावर गुरुजी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात करतात.
गुरुजी म्हणाले :- बाळा जर तु कुठे फिरायला गेला आहेस. फिरत असतांना
तिथे एखादी सुंदर मुलगी समोरून येतांना दिसली. तर तु काय करणार…?
तरुण म्हणाला – मुलगी दिसल्यावर मी त्या मुलीचा व्यक्तिमत्व बघणार.
गुरुजीं म्हणाले – ती मुलगी समोर गेल्यानंतरही तू मागे वळून पाहणार का….?
तरुण म्हणाला – हो गुरुजी… परंतु जर माझी बायको माझ्यासोबत नसेल तरच…
( बसलेले सगळे भाविक हसतात )
आता परत गुरुजींनी विचारले – मला सांग बाळा तुला तो सुंदर चेहरा किती दिवस
आठवणीत राहणार…?
तरुण म्हणाला – पाच ते दहा मिनिटे अथवा दुसरा सुंदर चेहरा दिसे पर्यंत.
गुरुजी त्या तरुणाला म्हणाले – बाळा आता तु एक कल्पना कर….
तू सूरत वरून मुंबईला जात आहेस… आणि मी तुला एक पुस्तक असलेले पाकीट दिले
आणि तुला सांगितले की…. हे पाकीट मुंबईतील या महान माणसाकडे पोहोचवावे…!
आता बाळा तो पाकिट पोहोचवण्यासाठी तू त्या माणसाच्या मुंबईतील घरी पोहचलास….
जेव्हा त्या माणसाचे तू घर बघितले तेव्हा तुला कळले की या माणसाचा तर
खूप मोठा बंगला आहे आणि हा माणूस तर अब्जाधीश आहे.
त्यांच्या बंगल्याच्या पोर्च मध्ये दहा वाहने उभी आहेत आणि पांच वॉचमन
बंगल्याच्या बाहेर उभे आहेत. तू आपल्या येण्याची माहिती पॅकेटसह पाठवली.
माहिती मिळताच ते साहेब स्वतः बाहेर आले आणि तुला नमस्कार केला.
त्यांनी तुझ्या कडून ते पॅकेट घेतले. नंतर तू परत जाण्याची परवानगी घेतली
तेव्हा त्या साहेबांनी तुला विनंती केली की… आत चला आणि सोफ्यावर
तुझ्या सोबतच जवळ बसले आणि काही वेळ बोलून दोघेही जेवायला बसलात.
चांगले जेवण दिले. आता तू परत होत आहेस… आणि ते साहेब विचारतात की
आपण माझ्या घरी कसे आलात….? तू म्हणालास – लोकल ट्रेन मध्ये.
हे समजल्यावर त्या साहेबांनी आपल्या ड्रायव्हरला तुला तुझ्या गंतव्यस्थानावर
घेऊन जाण्यास सांगितले. आणि तू तुझ्या ठिकाणी पोहोचणार इतक्यात
त्या अब्जाधीश साहेबाने तुला फोन केला आणि विचारले – दादा आपण
आरामात पोहोचलात का…..!
आता सांग बाळा… तू त्या अब्जाधीश गृहस्थांची आठवण किती दिवस ठेवणार….?
यावर तो तरुण मुलगा म्हणाला – गुरुजी….! त्या माणसाला तर मी जीवनभर
विसरणारच नाही, मरे पर्यंत माझ्या आठवणीत राहणार.
त्या तरुण मुलाच्या माध्यमातून सगळ्या भाविकांना संबोधित करतांना
गुरुजी म्हणाले – ” हेच आयुष्याचे वास्तव आहे.”
सुंदर चेहरा काही वेळासाठी आपल्या आठवणीत राहतो…
परंतु सुंदर वागणूक जीवनभर आठवणीत राहते.
हाच आयुष्याचा गुरुमंत्र आहे…
तुमच्या चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्या पेक्षा तुमच्या वागण्याच्या
सौंदर्यावर आपले लक्ष अधिक केंद्रित करा.
तुमचे जीवन स्वतःसाठी आनंददायी आणि इतरांसाठी
अविस्मरणीय प्रेरणादायी बनेल.