आनंदापेक्षाही मोठा
एक असा आनंद आहे….
तो त्यालाच मिळतो
जो स्वतःला विसरून
इतरांना आनंदित करतो.
Good Thoughts In Marathi On Life
मराठी सुंदर विचार – जीवनाचे दही
नमस्कार मित्रांनो…..
जर जमलेले अगदी पांढरे शुभ्र दही पाहिले तर तोंडाला पाणी सुटतो…
आणि त्या दह्याला खाण्याची खूप प्रबळ इच्छा होते…!
परंतु… जर त्या दह्यात चमचा बुडवला तर ते दही मोडणार…
थोड्याच वेळात पूर्ण पाणी पाणी होणार…
हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असते…!
म्हणून दही मोडणार नाही या करिता जर दहित मी चमचा
बुडवलाच नाही तर…?
जर ते दही एक दोन दिवस तसेच राहिले तर ते आंबट होईल…!
आणखीन काही दिवस दह्याला तसेच ठेवले तर पूर्ण दही
खराब होऊन जाईल…
मग काय उपयोग त्या जमलेल्या दह्याचा…?
पांढऱ्या शुभ्र मस्त लागलेल्या दह्याचा…?
मग असाच विचार मनात आला….
जीवनाचेही काही असेच असते… नाही का…?
दह्यासारखेच मस्त जमलेले जीवन, जगण्यासाठी
नक्की आवडेलच…! परंतु जर ते जीवन तसेच जमलेले राहिले…
तर त्यातली गोडी निघून जाईल. पुर्णतः पानचट होईल.
पुर्णतः ते वायाच जाणार…!
त्यापेक्षा दर रोज जीवनाचे दही नव्याने विरजायचे…
जीवनाची गोडी चाखायला तर हवीच…!
जीवन जगायला तर हवेच…!
दिवसभर ते दही वेगवेगळ्या प्रकारे अनुभवायचे…!
कधी साखर मिसळावी….
तर कधी मीठ मिसळावे….
कधी दह्याला कोशिंबिरीत मिसळावे…
तर कधी बुंदीत मिसळावे..
तर कधी कोणत्याही भाजीच्या ग्रेव्हीत मिसळावे…!
कधी मनसोक्त जेवण झाल्यावर ताक म्हणून प्यावे…!
मला ताकाचा…. आपल्यात पाहिजे तितके पाणी सामावून
घेण्याचा गुणधर्म खुप खुप आवडतो.
म्हणजेच कोणताही अतिरेक झाला
तर आयुष्य पांचटच होतेच…!
प्रत्येक दिवसाच्या जगण्याची ची कला आपल्याला
वाढविता आली पाहिजे.
पण एक नियम अगदी काटेकोरपणे पाळायचा…!
तो म्हणजे दह्याला पूर्ण संपवायच्या आधी…
दररोज थोडेसे विरजण बाजूला काढून ठेवायचेच…!
उद्याचे दही लावायला…
झोपण्यापूर्वी… दिवसभरात जगलेल्या संपूर्ण क्षणांचे
परत नव्याने दही विरजायचे…
मला माहित आहे की… दररोज ही भट्टी जमेलच असे नाही…
परंतु, समजा कधी नासलेच… किंवा कधी कडवटपणा आलाच…
तर नाउमेद न होता… नव्याने सुरुवात करायचीच…
मग त्याकरिता जर दुसऱ्यां कडूनही विरजण मागावे लागले
तरी पण त्यात कमीपणा मानायचा नसतो…
मात्र दही दररोजच्या रोज ताजेच लावायचे हं…!
जीवन कसे चवीने जगायचे…!
Good Thoughts In Marathi On Life
मराठी सुंदर विचार – जीवनाचे दही
जीवनात फक्त स्वप्न फुकट पडतात…
बाकी सगळ्यांसाठी किंमत मोजावी लागते…!
जीवनात कठीण परिस्थितीशी संघर्ष केल्यानंतर
एक बहुमोल संपत्ती विकसित होते…
ती म्हणजे आत्मविश्वास.
जरी तुम्हाला यशस्वी होण्याची
खात्री नसेल…
तरीही संघर्ष करण्याची प्रेरणा
नक्कीच असली पाहिजे.
मनाची अवस्था | जगातील सुंदर व्यक्ती | आनंदी व्यक्ती
एकदा एका श्रीमंत माणसाने एका संतश्रींना आपल्या घरी जेवण्याचे
निमंत्रण दिले. परंतु त्या दिवशी एकादशी असल्याने संतश्रींना उपवास होता.
त्यामुळे त्यांचे जाणे काही जमले नाही.
श्रीमंत माणसाच्या निमंत्रणाचे मान ठेवण्यासाठी संतश्रींनी आपल्या
दोन शिष्यांना त्या श्रीमंत माणसाकडे जेवण करण्यासाठी पाठवून दिले.
परंतु जेव्हा ते दोन शिष्य श्रीमंत माणसाकडून जेवण करून परत
आश्रमात आले… तेव्हा त्यातला एक शिष्य दुःखी आणि दुसरा
प्रसन्न होता.
संतश्रींनी त्यांना पहिले तर थोडे आश्चर्य वाटले म्हणून संतश्रींनी
एका शिष्याला विचारले, “बाळा इतका का दुःखी आहेस.
घरमालकाकडून काही चुकले का… की जेवणात काही
फरक केला का….?”
” नाही गुरुवर “
मग त्यांनी बसण्यात फरक केला का….?
” नाही गुरुवर “
घरमालकाने दक्षिणेमध्ये काही फरक केला का….?
“नाही गुरुवर…. दक्षिणा बरोबर पाच रुपये मला आणि
पाच रुपये दुसऱ्याला ” दिली
आता तर संतश्रींना आणखीनच आश्चर्य झाले आणि शिष्यांना विचारले….
मग काय कारण आहे….? जो तू इतका दुःखी आहेस….?
तेव्हा दुःखी शिष्य बोलला, ” गुरुवर… मी तर असा विचार करायचो की…
ते मान्यवर खूप श्रीमंत आहेत. कमीत कमी २१ रुपये दक्षिणा देतील.
परंतु त्यांनी पाच रुपये दिले… म्हणून मी दुःखी आहे.
संतश्रींनी दुसऱ्याला विचारले…. तू इतका का प्रसन्न आहेस….?
तेव्हा दुसरा म्हणाला…. गुरवर मला माहित होते की ते श्रीमंत माणूस
खुप कंजूष आहेत… एक रुपयापेक्षा जास्त दक्षिणा देणार नाहीत….
परंतु त्यांनी पाच रुपये दिलेत…. म्हणून मी खूप प्रसन्न आहे.
मित्रांनो….
आपल्या मनाची हीच अवस्था आहे. संसारात घटना या समान रुपी
घडत असतात…. परंतु कुणी त्या घटनांद्वारे सुख प्राप्त करीत असतो…!
तर कुणी दुःखी होत असतो….! परंतु खरेतर दुःख… अथवा सुख….
हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते….!
म्हणून इच्छा पूर्ण झाली नाही तर दुःख…. आणि इच्छा पूर्ण झाली
तर सुख…. परंतु जर कोणतीही इच्छाच नसेल तर आनंदच आनंद….!
लोक ज्या शरीराला सुंदर समजतात… मेल्या नंतर तेच शरीर सुंदर का
वाटत नाही…? त्याला घरी न ठेवता जाळून का टाकतात….?
ज्या शरीराला सुंदर मानतात….फक्त त्याची त्वचा काढून टाका. तेव्हा
वास्तव दिसेल की…. आत काय आहे….?
आत फक्त रक्त…. रोग…. मळ आणि कचरा भरलेला आहे….!
मग हे शरीर सुंदर कसे असेल….?
शरीरात कोणती ही सुंदरता नाही…. तर सुंदर असतात ते व्यक्तीचे कर्म….
त्याचे विचार…. त्याची वाणी… त्याची वागणूक…. त्याचे संस्कार आणि
त्याचे चारित्र्य….! ज्याच्या जीवनात हे सर्व आहे तोच व्यक्ती जगातली
सर्वात सुंदर व्यक्ति आहे.
Good Thoughts In Marathi On Life – सुंदर विचार
25+ Best Marathi Suvichar | सुविचार मराठी