Good Thoughts Marathi | सुविचार | डोक्यातील धुळ झटकता आली पाहिजे

2
1234
Good Thoughts In Marathi - सुविचार - डोक्यातील धुळ झटकता आली पाहिजे - suvichar
Good Thoughts In Marathi - सुविचार

Good Thoughts In Marathi – सुविचार – डोक्यातील धुळ झटकता आली पाहिजे. 

Good Thoughts In Marathi - सुविचार - डोक्यातील धुळ झटकता आली पाहिजे - suvichar - vb good thoughts
Good Thoughts In Marathi – सुविचार – डोक्यातील धुळ झटकता आली पाहिजे – suvichar

आज सहज घराजवळील बगीच्या मध्ये फिरायला गेलो, तिथे एक जुना मित्र भेटला.

खूप वर्षा नंतर भेट झाली,
 मागील एक वर्षा पासून तो दररोज येतो आणि जवळपास १ तास योगासन करतो,
जवळच त्याने नवीन घर बांधले होते, पण भेट आज झाली. तिथल्याच एका बाकावर 
बसून गप्पा सुरु झाल्या.
जुन्या सुखद-दुखद आठवणी ताज्या झाल्या, त्यातच त्याने सांगितले की, विजय १५ वर्षापूर्वी
सतीश मला वाकडा बोलला होता तो आजही मनातुन जातच नाही. हे एकताच मला एकदम
हसु आले पण… त्याला वाईट वाटेल म्हणून हसु आवरले, 
काही वेळ गप्पा मारून आपापल्या घराचा पत्ता समजावत दोघेही आपापल्या 
घरी जाण्यासाठी निघालो.

मी घरी आलो आणि विचार करायला लागलो.

आपले शरीर निरोगी रहावे म्हणून आपल्या शरीराची काळजी घेणारा माणूस 
पंधरा वर्षांचा कचरा मनात सुरक्षित ठेवतो.
हा मूर्खपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात.

एकदा आपल्या जीवनाकडे बघा… लक्षात ठेवण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात
पण आपण आपल्या डोक्यात वाईट गोष्टींचा भरपूर साठा करत असतो. 

कित्येकदा बोलता बोलता कुणी त्याच्या मनात काहीही नसतांना 
सहजच काही बोलून जाते… आणि ते आपल्या मनाला लागते. 
पण आपण तो त्याच वेळी झटकुन टाकत नाही.
 
जसे आपल्या कपड्यावर कुटून तरी धुळ आली कि लगेच आपण आपला कपडा 
झटकुन टाकतो, आणि जर का धुळ जास्त असली तर आपण त्याच वेळी
कापड काढुन झटकतो, कारण आपल्याला वाटते कि कुणी आपल्या अंगावर
धुळ पाहून काय म्हणेल. तसेच आपल्यालाही धुलेची किळस वाटते.

त्याचप्रमाणे आपल्याला कुणी किळस वाटणारे शब्द बोलले तर तेही आपल्याला

धुळे सारखे झटकता आले पाहिजे.

आपले डोके काही स्टोर रूम नाही… ज्यात वाटेल त्या गोष्टी आपण साठवून ठेवाव्यात.
जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आपले डोके आहे.

या डोक्यात आपले लहानपण, आपले तरुणपण, त्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी जपतो.
वेळोवेळी आपल्याला आपला डोके ते स्मरणही करून देतो. 
आपण त्या स्मरणरंजनात रमून जातो.


कधी आपल्या डोळ्यात पाणी येते तर कधी आपल्या ओठांवर हसू येते. 
जगतांना आपल्याला एवढा चांगला आधार देणारे डोके… 
याला आपण नाही त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो.
आपण आपल्या डोक्यावर सतत अन्याय करत राहतो.

डोक्याला वाचा नसते. तो मुक बधिर असतो. त्याला काहीही कळत नाही. पण…..  हृदयाला मात्र मन असते. त्याला तरी ते कळले पाहिजे. 
जीवनात काही माणसे असतात जे स्पर्धेसाठी आपल्याशी शत्रुत्व घेतात 

ती गोष्ट वेगळी आहे. अशावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढले पाहिजे. 
पण ९०-९५ टक्के गोष्टी अशा असतात की… त्या आपल्या आयुष्यात 
फारशा गंभीर नसतात. त्या वेळीच सोडता आल्या पाहिजेत.

आपले डोके सृजनशील आहे. त्यातच त्याला गुंतवून ठेवले पाहिजे. 
ज्या गोष्टी सृजनशील गोष्टींशी निगडीत नाहीत त्यांना वर्तुळाबाहेर ठेवले पाहिजे. 
आपले मन आनंदी असने, आपले घर, आपले जवळचे मित्र आनंदी असने,
हेच तर आयुष्य आहे. या पलीकडे काय असू शकते….?

पावसाच्या दिवसात पाणी गढुळ येतो, त्यावेळी आपण त्या गढुळ पाण्यावर
तुरटी फिरवितो, काही वेळातच पाण्यातील गाळ खाली बसते आणि
आपल्याला स्वच्छ पाणी मिळतो.

आयुष्यातही मन गढुळ करणारे अनेक पावसाळे येत राहतील  
अशावेळी त्या मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवता आली पाहिजे….

प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here