Good Thoughts in Marathi
प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार
एक माणूस आपल्या मालकाला न सांगता एक दिवस तो कामावर
गैरहजर राहिला… याचे मालकाला खूप वाईट वाटले की ह्या माणसाने
मला न सांगता सुट्टी मारली.
नंतर मालकाला विचार आला… जर मी याचा पगार वाढविला तर हा
नक्कीच मन लावून काम करणार… आणि गैरहजरही राहणार नाही.
तो माणूस दुसऱ्या दिवशी कामावर हजर झाला तर त्याला मालकाने
काहिच म्हटले नाही आणि महिना भरल्यानंतर त्याला त्याची जुनी पगार
आणि काही पैसे वेगळे दिले… यावर तो माणूस काहीही बोलला नाही…
आपले पैसे घेऊन निघून गेला…
आठ महिन्यानंतर पुन्हा तसेच घडले…. मालकाला न सांगता कामावर
गैरहजर राहीला… यावेळी मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने
विचार केला कि… याचा पगार वाढवून काही फायदा नाही आहे…
याला कामाची काही जवाबदारी नाही आहे…
हा काही सुधारणार नाही…
या महिन्याची पगार देतांना मालकाने त्याला त्याचा जुनाच पगार दिला…
वाढीव पैसे दिले नाहीत…
यावेळी ही तो काहीही बोलला नाही… त्याने कोणतीही तक्रार केली नाही…
आणि चुपचाप जायला निघाला… याचे मालकाला खूप आश्चर्य वाटले…
शेवटी मालकानेच त्याला विचारले…
बापु कसा रे तु…? मागील वेळी तु न सांगता सुट्टी घेतली…
तुझा पगार वाढविला… तु काहीही बोलला नाहीस…
या महिन्यात पुन्हा न सांगता सुट्टी घेतली म्हणुन मी तुझा पगार
कमी केला…! यावेळी तु काहीही न बोलता जात आहेस…!
हे काही समजले नाही मला….!
Good Thoughts in Marathi
प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार
यावेळी त्या कामगार माणसाने जे उत्तर दिले ते अगदी मनाला
भिडणारेच होते…
कामगार माणूस म्हणाला…
साहेब पहिल्यांदा ज्यावेळी मी तुम्हाला न सांगता सुट्टी
घेतली त्यावेळी मला मुलगा झाला. होता… मी दवाखान्यात होतो…
आपण मला पगार अधिक दिला.. तर मी विचार केला की…
भगवंताने माझ्या मुलाचा खाण्याचा खर्च पाठविले आहे…. आणि
या महिन्यात ज्यावेळी मी सुट्टी घेतली त्यावेळी माझी आई वारली
होती…
आता आपण माझा पगार कमी केलात… तर मी असे मानत आहे की…
माझ्या आईने आपला वाटा आपल्या सोबत नेला…
मग मी कशाला पगाराची काळजी करू…? हि जवाबदारी तर
भगवंताने स्वत:च घेतलीं आहे…!
मित्रांनो…
जर कुणी असे विचारले की… आयुष्यात काय कमविले…?
आणि काय गमावले…? तर निःसंकोचपणे सांगा
मित्रा…
जे मी गमावले ते माझे अविचार होते….!
आणि जे कमावले ती माझ्या भगवंताची
कृपा होती…!
भगवंताचे आणि माझे खुप सुंदर नाते आहे…
मी जास्त काही मागत नाही आणि
भगवंत मला काही पडु देत नाही…
आणि यालाच आपला प्रारब्ध म्हणतात….!
आयुष्य हे खुप सुदंर आहे… अगदी आनंदाने जगा…!
Good Thoughts in Marathi | प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार
निवांतपणे वाचा हे मराठी सुविचार स्टेटस | मनाला खूप आनंद देतील
50+ Marathi Quotes | प्रेरणादायक सुविचार मराठी
[…] […]
[…] हे हि वाचायला आवडेल :- प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार […]
[…] प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार […]